AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shweta Tiwari: श्वेता तिवारीसोबत अफेअरच्या चर्चा, घटस्फोटाने घाबरून अभिनेता म्हणाला, मी आमिर खानसारखा नाही..

Shweta Tiwari: अभिनेत्री श्वेता तिवारीसोबत विशालचं अनेकदा नाव जोडलं गेलं. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने यावर मनमोकळी प्रतिक्रिया दिली आहे. त्याचसोबत लग्नाबद्दल त्याचे काय विचार आहेत, याविषयीही त्याने स्पष्ट शब्दांत सांगितलं आहे.

| Updated on: Aug 14, 2026 | 7:51 PM
Share
अभिनेत्री श्वेता तिवारी ही टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील आघाडीची आणि अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री आहे. गेल्या अनेक वर्षांपासून तिने विविध मालिकांमध्ये भूमिका साकारून स्वत:चा मोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे. श्वेता तिच्या कामासोबतच खासगी आयुष्यामुळेही सतत चर्चेत असते. टीव्ही इंडस्ट्रीतील कोणत्या ना कोणत्या अभिनेत्यासोबत तिचं नाव सतत जोडलं जातं.

1 / 5
गेल्या काही वर्षांपासून श्वेता तिवारीचं नाव अभिनेता विशाल आदित्य सिंहशी जोडलं जातंय. आता 'टेली चक्कर'ला दिलेल्या एका मुलाखतीत विशालने डेटिंगच्या चर्चांवर मौन सोडलं आहे. विशालने स्पष्ट केलं की श्वेता आणि तो फक्त चांगले मित्र आहेत. त्यापेक्षा जास्त त्यांच्यात काहीच नाही.

2 / 5
या मुलाखतीत विशालला जेव्हा त्याच्या 'रिलेशनशिप स्टेटस'बद्दल विचारलं गेलं, तेव्हा त्याने 'सिंगल' असल्याचं सांगितलं. लग्नाबद्दल बोलताना तो पुढे म्हणाला, "एखाद्यासोबत राहायचं असेल तर लग्न करण्याची काय गरज आहे? ज्याप्रकारे हल्ली घटस्फोटांचं प्रमाण वाढतंय, ते पाहून मला लग्नच करायचं नाहीये. लग्न करून घटस्फोट द्यायचा नाहीये. जगात जे घडतंय, ते माझ्यासोबतही घडेल."

3 / 5
"मी आमिर खानसारखा नाही. जोपर्यंत लग्न परफेक्ट होत नाही, तोपर्यंत एकानंतर एक लग्न करतच राहण्यासारखा मी नाही. एकच आयुष्य आहे, एकच लग्न करेन. मला लग्नाच अपयश नको आहे. त्यामुळे मी लग्नच करणार नाही. आजूबाजूचे अनुभव पाहता माझी लग्न करण्याची इच्छाच होत नाही", अशा शब्दांत विशाल व्यक्त झाला.

4 / 5
याविषयी त्याने पुढे सांगितलं, "लोक मला सांगतात की तीन वर्षांनंतर प्रेम ओसरतं. त्यानंतर फक्त एकमेकांशी जुळवून घेणंच महत्त्वाचं ठरतं. तेव्हा माझ्या लक्षात आलं की जर मी माझ्या पत्नीवर प्रेम करत नसेन, तर माझं तिच्याशी जुळवून घेणं शक्यच होणार नाही. जर ती माझ्यावर प्रेम करत नसेल, तर तीसुद्धा माझ्याशी जुळवून घेणार नाही. जोपर्यंत तुम्हाला खरोखरच कोणासोबत जवळीक साधण्याची इच्छा होत नाही, तोपर्यंत लग्नाला काही अर्थ नाही. मी कधीही लग्न करणार नाही."

5 / 5
Follow Us
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट...
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट... नेमकं काय सांगितलं?
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर देवस्थानाकडून तब्बल...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM फडणवीसांसोबत महत्त्वाची भेट
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही;
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही; कट रचणारी तिसरी व्यक्ती कोण?
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस..
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस किंवा तत्सम पदावर मिळणार नोकरी
पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
Video : पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? राजकीय वर्तुळात चर्चा
Video : एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? शिवसेनेच्या नेत्यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
सियाला सरप्राईज देण्यासाठी केतनने चक्क... वडील विशाल अग्रवालांनी...
सियाला सरप्राईज देण्यासाठी केतनने चक्क... वडील विशाल अग्रवालांनी स्वतः दिली डोकं चक्रावणारी माहिती
नाशिक कालिका यात्रेतील रहाट पाळण्याच्या लिलावावर अनियमिततेचे आरोप