AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs NZ : विराट कोहलीला तिसरं स्थान पुन्हा ठरतंय अनलकी! आठ वर्षानंतर तसंच घडलं

न्यूझीलंडच्या गोलंदाजीसमोर भारतीय गोलंदाजी एकदम पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली. एकही फलंदाज धड कामगिरी करू शकला नाही. विराट कोहलीसह पाच फलंदाजांना तर आपलं खातंही खोलता आलं नाही. न्यूझीलंडविरुद्ध भोपळाही फोडू न शकलेल्या विराट कोहलीच्या नावावर नकोसा विक्रम प्रस्थापित झाला आहे.

| Updated on: Oct 17, 2024 | 3:17 PM
Share
न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत टीम इंडियावर पराभवाची नामुष्की ओढावल्याचं दिसत आहे. कारण पहिल्या डावात भारताचा संपूर्ण संघ फक्त 46 धावांवर बाद झाला आहे. या डावात भारताच्या पाच फलंदाजांना आपलं खातंही खोलता आलं नाही. विराट कोहलीकडून फार अपेक्षा होत्या. पण अपेक्षाभंग झाला.

1 / 6
विराट कोहली आठ वर्षानंतर तिसऱ्या स्थानावर फलंदाजीसाठी उतरला होता. शुबमन गिल या कसोटीत नसल्याने विराट कोहली तिसऱ्या स्थानावर उतरला होता. तसेच सरफराज खानला चौथ्या स्थानावर पसंती दिली गेली.

विराट कोहली आठ वर्षानंतर तिसऱ्या स्थानावर फलंदाजीसाठी उतरला होता. शुबमन गिल या कसोटीत नसल्याने विराट कोहली तिसऱ्या स्थानावर उतरला होता. तसेच सरफराज खानला चौथ्या स्थानावर पसंती दिली गेली.

2 / 6
रोहित शर्मा बाद झाल्यानंतर विराट कोहली फलंदाजीसाठी उतरला. पण 9 चेंडूंचा सामना करत खातंही न खोलता तंबूत परतला. विलिय ओराउरकेच्या गोलंदाजीवर विकेट देऊन बसला. उसळी घेतलेला चेंडू कोहलीच्या ग्लव्ह्जला लागला आणि गलीला क्षेत्ररक्षण करणाऱ्या ग्लेन फिलिप्सच्या हाती गेला.

3 / 6
विराट कोहली यापूर्वी 2016 मध्ये तिसर्‍या स्थानावर फलंदाजीला उतरला होता. वेस्ट इंडिजविरुद्ध त्याला दुहेरी आकडाही गाठता आला नव्हता. तेव्हा त्याने पहिल्या डावात 3 आणि दुसऱ्या डावात 4 धावा केल्या होत्या.

विराट कोहली यापूर्वी 2016 मध्ये तिसर्‍या स्थानावर फलंदाजीला उतरला होता. वेस्ट इंडिजविरुद्ध त्याला दुहेरी आकडाही गाठता आला नव्हता. तेव्हा त्याने पहिल्या डावात 3 आणि दुसऱ्या डावात 4 धावा केल्या होत्या.

4 / 6
2016 पूर्वीही विराट कोहली तीन कसोटी सामन्यात तिसऱ्या स्थानावर उतरला होता. तेव्हा त्याला अर्धशतकी खेळीही करता आली नाही. 2012 मध्ये तिसऱ्या स्थानावर उतरला होता. तेव्हा इंग्लंडविरुद्ध 13 धावांची नाबाद खेळी केली होती.

5 / 6
2013 मध्ये मोहालीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध 34 धावा केल्या होत्या. 2013 मध्ये दिल्लीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध फलंदाजीसाठी उतरला तेव्हा पहिल्या डावात 1 आणि दुसऱ्या डावात 41 धावांची खेळी केली होती.

2013 मध्ये मोहालीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध 34 धावा केल्या होत्या. 2013 मध्ये दिल्लीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध फलंदाजीसाठी उतरला तेव्हा पहिल्या डावात 1 आणि दुसऱ्या डावात 41 धावांची खेळी केली होती.

6 / 6
Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...