पहिल्यांदाच संघाचं नेतृत्व सांभाळणाऱ्या रिषभ पंतवर आता सर्वांच्या नजरा आहेत.
1 / 7
केएल राहुलनं गेल्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर भारतीय संघासाठी तीन एकदिवसीय आणि एका कसोटी सामन्यात संघाचे नेतृत्व केलं होतं.
2 / 7
शिखर धवननं गेल्या वर्षी श्रीलंका दौऱ्यावर तीन एकदिवसीय आणि तीन टी-20 सामन्यांमध्ये संघाचं नेतृत्व केलं होतं.
3 / 7
अजिंक्य रहाणेनं नोव्हेंबरमध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या कानपूर कसोटीत संघाचे नेतृत्व केले होते.
4 / 7
विराट कोहलीनं टी-20 विश्वचषकानंतर या फॉरमॅटमधील संघाचे कर्णधारपद सोडले. नंतर कोहलीला एकदिवसीय संघाचे कर्णधारपद गमवावे लागले.
5 / 7
2021- च्या टी-20 विश्वचषकानंतर विराट कोहलीनं राजीनामा दिल्यानंतर रोहित शर्माला T-20 फॉरमॅटचा कर्णधार करण्यात आलं. त्यानंतर एकदिवसीय आणि कसोटी संघाचे कर्णधारपदही सोपवण्यात आलं.
6 / 7
रिषभ पंत एका वर्षात टीम इंडियाचे नेतृत्व करणारा सहावा कर्णधार आहे. यात विशेष म्हणजे या सर्वात कर्णधारांनी राहुल द्रविडच्या कोचिंगमध्ये कर्णधारपदाची जबाबदारी घेतलीय.