तब्बल 487 दिवसानंतर रॉजर फेडररचे पुनरागमन, विजयी सलामी देत फ्रेंच ओपनची सुरुवात

प्रसिद्ध टेनिसपटू रॉजर फेडररने (Roger Federer) मागील बराच काळापासून दुखापतीमुळे टेनिसमधून विश्रांची घेतली होती.

1/5
roger-federers
टेनिस विश्वातील वर्ल्ड चॅम्पियन असणाऱ्या स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररने फ्रेंच ओपनमध्ये विजयी सलामी देत टेनिस विश्वात पुनरागमन केले आहे. मागील वर्षभराहून अधिक काळापासून गुडघ्याच्या शस्त्रक्रियेमुळे फेडररने टेनिस सामन्यांतून विश्रांती घेतली होती. (Roger Federer Enters in French Open Returns in Grand Slam Tennis With Win over Denis Istomin)
2/5
Roger-Federer
फेडरर 2020 चे अनेक सामने दुखापतीमुळे खेळू शकला नव्हता. तब्बल 487 दिवसानंतर पुनरागमन करत आपल्याला क्ले कोर्ट नाही तर ग्रास कोर्टवरच खेळायचं असल्याचं फेडररने पुन्हा एकदा सांगितलं
3/5
roger-federer
पुनरागमनाच्या पहिल्याच सामन्यात फेडररने उझबेकिस्तानच्या डेनिस इस्तोमिनला 6-2, 6-4 आणि 6-3 च्या फरकाने नमवत सामना आपल्या नावे केला.
4/5
Australian-Open
फ्रेंच ओपनमध्ये फेडररचा पुढील सामना यूएस ओपन चॅम्पियन क्रोएशियाच्या मारिन चिलिच याच्याशी होणार आहे.
5/5
Federer
फेडररने आतापर्यंत 20 ग्रँड स्लॅम जिंकले असून 2009 मध्ये त्याने फ्रेंच ओपनमध्ये विजय मिळवला होता.