AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rcb Mohammed Siraj Home | आरसीबी टीम मोहम्मद सिराज याच्या घरी, मारला हैदराबादी बिर्याणीवर ताव

हैदराबाद विरुद्धच्या सामन्याआधी विराट कोहली याच्यासह आरसीबीच्या संपूर्ण टीमने मोहम्मद सिराज याच्या नव्या घरी भेट दिली. सर्व सहकाऱ्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

| Updated on: May 16, 2023 | 8:49 PM
Share
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू टीम 18 मे रोजी सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध सामना खेळणार आहे. हा सामना राजीव गांधी स्टेडियम हैदराबाद इथे खेळवण्यात येणार आहे. प्लेऑफच्या हिशोबाने दोन्ही संघांसाठी महत्वाचा आहे. मात्र त्याआधी आरसीबीच्या सर्व खेळाडूंनी लोकल बॉय मोहम्मद सिराज याच्या घरी भेट दिली. सिराजने आपल्या सहकाऱ्यांना नव्या घरी येण्याचं आमंत्रण दिलं होतं. हैदराबाद विरुद्धच्या सामन्यानिमित्ताने हा योग जुळून आला.  यावेळेस सिराजच्या सहकाऱ्यांनी हैदराबादी बिर्याणीवर आडवा हात मारला.

1 / 7
आरसीबीचा माजी कर्णधार आणि स्टार बॅट्समन विराट कोहली याने सिराजच्या कुटुंबियांसोबत फोटो काढला. आतापर्यंत आपण ज्यांना टीव्हीवर खेळताना पाहिलं ते सर्व दिग्गज क्रिकेटर आपल्या घरी आल्याने सिराज कुटुंबिय भारावून गेले होते.

2 / 7
सिराजच्या घरी विराटसह कोच संजय बांगर, कॅप्टन फाफ डु प्लेसिस, वेन पार्नेल,  केदार जाधव आणि जवळपास सर्वच खेळाडूंनी भेट दिली. यावेळेस बऱ्याच खेळाडूंनी हैदराबादी  बिर्याणीवर आडवा हात मारला. आरसीबीच्या ट्विटर हँडलवरुन हे फोटो पोस्ट करण्यात आले आहेत.

3 / 7
सिराजचं नवं घर अगदी प्रशस्त असं आहे. सिराजच्या या घरात आरसीबीचे सहकारी मजा करताना दिसत आहे. आयपीएल स्पर्धेच्या धावपळीत या खेळाडूंनी काही क्षण सहकाऱ्याची घरी आनंदाने घालवले.

4 / 7
नव्या घरातील एका भागात सिराजने जिंकलेल्या ट्रॉफी ठेवलेल्या दिसून येत आहेत. तसेच सिराजने घरात विराट कोहली याच्यासोबतचा फोटो आणि बॉर्डर गावसकर ट्रॉफी जिंकल्यानंतरच्या ऐतिहासिक क्षणाचा फोटो फ्रेम करुन ठेवला आहे.

5 / 7
सिराज एका फोटोत अनुज रावत याला आपलं घर दाखवताना दिसतोय. रावतने  राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात नाबाद 29 धावांची खेळी करत फिनीशिंग टच दिला होता.

6 / 7
दरम्यान मोहम्मद सिराज याने आयपीएल 16 व्या मोसमात आरसीबीसाठी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. सिराजने 12 सामन्यात 16 विकेट्स घेतल्या आहेत. सिराजची 21 धावांच्या मोबदल्यात  4 विकेट्स ही सर्वोत्तम कामगिरी राहिली आहे. सिराजकडून हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात होम ग्राउंडमध्ये अशाच कामगिरीची अपेक्षा असणार आहे.

7 / 7
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.