AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वेस्ट इंडिजने दुसऱ्या कसोटीत टीम इंडियाला झुंजवलं, 42 वर्षानंतर पाहीला इतका वाईट दिवस

India vs West Indies, 2nd Test: भारतीय संघाने दिल्ली कसोटीतील पहिल्या अडीच दिवसांचा खेळ गाजवला. पण तिसऱ्या दिवशीच्या शेवटी आणि चौथ्या दिवशी टी ब्रेकपर्यंत भारतीय गोलंदाजांना रडवलं. शेवटची विकेट घेताना भारतीय गोलंदाजांचा चांगलाच घाम निघाला. टीम इंडियाने 42 वर्षांनी असा दिवस पाहीला.

| Updated on: Oct 13, 2025 | 5:01 PM
Share
वेस्ट इंडिजविरुद्धचा दुसरा कसोटी सामना भारत सहज जिंकेल असं चित्र होतं. फॉलोऑनमध्येच भारतीय गोलंदाज गुंडाळतील असं चित्र होतं. पण तसं झालं नाही. उलट वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांना विकेटसाठी चांगलंच झुंजवलं. फॉलोऑनची नामुष्की टाळून विजयासाठी 121 धावा दिल्या. (Photo-BCCI)

1 / 5
वेस्ट इंडिजने शेवटच्या विकेटसाठी 79 धावांची भागीदारी केली. यामुळे वेस्ट इंडिजचा संघ 390 धावांपर्यंत पोहोचला. 42  वर्षांनंतर भारतीय संघाला वेस्ट इंडिजविरुद्ध अशा दिवसाचा सामना करावा लागला. दुसरीकडे, 2013 नंतर पहिल्यांदाच एखाद्या परदेशी संघाने भारतात दुसऱ्या डावात 350 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. (Photo- PTI)

2 / 5
वेस्ट इंडिजने 1983 नंतर भारतात शेवटच्या विकेटसाठी 50 पेक्षा जास्त धावांची भागीदारी केली आहे. 1983 च्या अहमदाबाद कसोटीत विन्स्टन डेव्हिड आणि जेफ ड्यूजॉन यांनी 51 धावांची भागीदारी केली होती. आता जस्टिन ग्रीव्हज आणि जेडेन सील्स यांनी ही कामगिरी केली आहे. (Photo- WI Cricket Twitter)

3 / 5
2011 नंतर वेस्ट इंडिजने भारताविरुद्ध इतक्या मोठ्या धावसंख्येची ही पहिलीच वेळ आहे. ही भारताविरुद्ध वेस्ट इंडिजची दहाव्या विकेटसाठीची सर्वोच्च भागीदारी आहे. ग्रीव्हजने 85 चेंडूत नाबाद 50 धावा केल्या, तर जेडेन सील्सने 67 चेंडूत 32 धावांचे योगदान दिले. (Photo- BCCI)

4 / 5
भारताने फॉलोऑन देऊन 1961 चा पाकिस्तान विरुद्धचा सामना ड्रॉ केला होता. 1993 मध्ये इंग्लंडविरुद्ध 8 विकेटने सामना जिंकला होता. 2012 मध्ये इंग्लंडविरुद्ध भारताने सामना 9 विकेट राखून जिंकला होता. आता वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यातील निकालाची वाट पाहात आहेत. (Photo- BCCI)

5 / 5
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!.
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न.
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?.
ॐ, स्वस्तिकची 'पंजा'शी तुलना करताच तुषार भोसलेंचा सपकाळांवर हल्लाबोल
ॐ, स्वस्तिकची 'पंजा'शी तुलना करताच तुषार भोसलेंचा सपकाळांवर हल्लाबोल.
शिंदे सेना-भाजपात भडका, संजय शिरसाट यांचा रवींद्र चव्हाणांना थेट इशारा
शिंदे सेना-भाजपात भडका, संजय शिरसाट यांचा रवींद्र चव्हाणांना थेट इशारा.