AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महेंद्रसिंह धोनी आणि रवींद्र जडेजा यांच्यात काय झालं? सीएसके सीईओंनी अखेर सोडलं मौन

आयपीएल 2023 स्पर्धा सुरु असताना धोनी आणि जडेजा यांच्यात वादाच्या बातम्या पुढे आल्या होत्या. त्या दोघांमध्ये नेमकं काय झालं असावं, असा प्रश्न क्रीडाप्रेमींना पडला होता. अखेर यावर सीईओंनी मौन सोडलं आहे.

| Updated on: Jun 22, 2023 | 5:34 PM
Share
आयपीएल 2023 स्पर्धेचं जेतेपद महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सने जिंकलं. चेन्नईचं धोनीच्या नेतृत्वाखाली पाचवं जेतेपद आहे. पण असं असलं तरी रवींद्र जडेजा आणि एमएस धोनी यांच्यात वाद असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या.

1 / 11
रवींद्र जडेजा आणि महेंद्रसिंह धोनी यांचं काही जमत नाही अशी चर्चा रंगली होती. दिल्ली विरुद्धच्या सामन्यात मैदानावर धोनी आणि जडेजा यांच्यात झालेल्या संभाषणानंतर ही चर्चा सुरु झाली होती.

2 / 11
चेन्नईने दिल्लीला त्या सामन्यात पराभूत केलं खरं पण रवींद्र जडेजाने 4 षटकात 50 धावा दिल्या होत्या. त्यामुळे कर्णधार महेंद्रसिंह धोनीने मैदानावरच त्याला झाडल्याचं सांगण्यात येत होतं.

3 / 11
दोघांमध्ये बिनसल्याची चर्चा रंगली असताना जडेजाची सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत आली. कर्माची फळं भोगावी लागतील, अशी पोस्ट त्याने इंस्टाग्रामवर लिहिली होती. "कर्माची फळं लवकरच भोगावी लागतील आता किंवा नंतर..पण नक्कीच भोगावी लागतील." पोस्ट करताना 'नक्कीच' असं लिहिलं होतं.

4 / 11
दुसरीकडे, चेन्नईच्या चाहत्यांनी महेंद्रसिंह धोनीची फलंदाजी पाहण्यासाठी रवींद्र जडेजाला लवकर विकेट सोडण्यास सांगणार फलक दाखवले होते. यामुळे रवींद्र जडेजा चांगलाच नाराज झाला होता.

5 / 11
गुजरात विरुद्धच्या सामन्यात अपस्टॉक्स मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअरचा पुरस्काराने गौरविण्यात आल्यानंतर रवींद्र जडेजाने धोनीच्या चाहत्यांना सुनावलं होतं. सोशल मीडियावर पोस्ट करत लिहिलं होतं की, "अपस्टॉक्सला माहिती आहे पण चाहत्यांना नाही."

6 / 11
रवींद्र जडेजाच्या सोशल मीडिया पोस्टनंतर तो नाराज असल्याचं समोर आलं होतं. पण सीएसकेचे सीईओ काशी विश्वनाथ यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं. तसेच सर्व अफवांचं खंडन केलं आहे. धोनी आणि जडेजा यांच्यात तसं काहीच झालं नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

7 / 11
जडेजाने चांगली गोलंदाजी केली. फलंदाजीचा विचार केला तर ऋतुराज गायकवाड, कॉनव्हे, मोईन अली, अजिंक्य रहाणे, शिवम दुबे असे खेळाडू होते. त्यात जडेजाची फलंदाजी येईपर्यंत पाच सहा चेंडू शिल्लक असायचे.

8 / 11
जडेजानंतर धोनी मैदानात उतरणार हे सर्वांना माहिती असायचं. त्यामुळे जडेजाने लवकर आउट व्हावं असं चाहत्यांना वाटायचं. त्यामुळे कदाचित जडेजा दुखावला गेला असेल, असं सीईओ विश्वानथनने ईएसपीएस क्रिक इन्फोला सांगितलं.

9 / 11
दिल्ली विरुद्धच्या सामन्यानंतर मी जडेजाशी बोलत होतो. मात्र त्या संभाषणाला वेगळंच रुप दिलं गेलं. पण तसं काहीच नव्हतं. मी त्याच्याशी फक्त त्या सामन्याबद्दल बोलत होतो.

10 / 11
ड्रेसिंग रुममध्ये काय होतं हे सर्वांना माहिती आहे. काहीच अडचण नाही. जडेजाला धोनीबद्दल कायम आदर आहे. जेतेपदानंतर जडेजाने याबाबत सांगितलं सुद्धा आहे. विजयी खेळी त्याने धोनीला समर्पित केली होती. यावरून सर्वकाही स्पष्ट होतं, असं त्यांनी सांगितलं.

11 / 11
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले...
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले....