Taliye Landslide : उद्ध्वस्त तळीये गावच्या पुनर्वसनाची जबाबदारी ‘म्हाडा’ने स्वीकारली, सरकार बांधून देणारी घरं कशी असणार?

जितेंद्र आव्हाड यांनी मोठी घोषणा केली आहे. कोकणामध्ये दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेमुळे बाधित झालेलं तळीये हे गाव पूर्ण वसविण्याची जबाबदारी म्हाडाने स्वीकारली आहे, अशी माहिती जितेंद्र आव्हाड यांनी दिलीय. काही फोटोही त्यांनी ट्वीट केले आहेत.

1/5
डोंगराचा कडा कोसळून महाड तालुक्यातील अख्खं तळीये गाव उद्ध्वस्त झालं. गावातील 32 घरं दरडीखाली गाडली गेली. मातीच्या ढिगाऱ्याखालून आतापर्यंत 43 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. ढिगाऱ्याखाली अजून अनेक मृतदेह असल्याची शक्यता जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

2/5
अशावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज तळीये गावची परिस्थिती पाहिली. त्यावेळी त्यांनी गावाच्या पुनर्वसनाचा शब्दही दिला. त्यानंतर आता जितेंद्र आव्हाड यांनी मोठी घोषणा केली आहे. कोकणामध्ये दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेमुळे बाधित झालेलं तळीये हे गाव पूर्ण वसविण्याची जबाबदारी म्हाडाने स्वीकारली आहे, अशी माहिती जितेंद्र आव्हाड यांनी दिलीय.

3/5
'कोकणामध्ये दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेमुळे बाधित झाले तळीये ता. महाड हे पूर्ण गाव वसविण्याची जबाबदारी म्हाडाने स्विकारली आहे. मा. मुख्यमंत्री महोदयांनी जो शब्द दिला कि कोणालाही अडचण भासू देणार नाही. ती पूर्ण करायला ही सुरुवात आहे. ही सूचना मला पवार साहेबांनी केली होती', असं ट्वीट करत जितेंद्र आव्हाड यांनी तळीये ग्रामस्थांना बांधून दिल्या जाणाऱ्या घरांची फोटो ट्वीट केले आहेत.

4/5
यात तळीये ग्रामस्थांना बांधून दिल्या जाणाऱ्या घरांचा नकाशा देण्यात आला आहे. आव्हाड यांनी एकूण चार फोटो ट्वीट केले आहेत. त्यात 1BHK घराचा प्लॅन देण्यात आला आहे.

5/5
आव्हाड यांनी केलेल्या ट्वीटमध्ये स्लॅबच्या घराचा आणि कौलारू घराचा नकाशा देण्यात आला आहे. त्यामुळे आपलं सर्वस्व गमावलेल्या तळीयेतील ग्रामस्थांचे अश्रू पुसण्याचा प्रयत्न सरकार त्यांना घरं बांधून देत करणार आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI