कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे आयपीएलचा 14 वा मोसम 29 सामन्यानंतर स्थगित करण्यात आला. या 29 सामन्यात वेगवेगळ्या टीममधील शानदार अनेक खेळाडूंनी शानदार कामगिरी केली. त्या खेळाडूंबद्दल आपण जाणून घेणार आहोत. गत मोसमात उपविजेता ठरलेल्या दिल्ली कॅपिट्ल्सने या मोसमात शानदार कामगिरी केली. दिल्लीच्या शिखर धवनने 8 सामन्यात 134 च्या स्ट्राईक रेट आणि 54 च्या सरासरीने 3 अर्धशतकांसह 380 धावा केल्या. यासह 29 सामन्यानंतर शिखर ऑरेंज कॅपचा मानकरी ठरला. तसेच वेगवान गोलंदाज आवेश खानने 8 सामन्यात 7.7 च्या इकॉनॉमी रेटने 14 विकेट्स घेतल्या. आवेश या मोसमात सर्वाधिक विकेट्स घेणारा दुसरा गोलंदाज ठरला.