By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.
पाणी प्या - रात्री ७ ते ८ तास आपलं शरीर डिहायड्रेट झालेलं असतं त्यामुळे उठताच पाणी पिणे अत्यंत महत्त्वाचं. लिंबू पाणी प्यायल्यास उत्तम!
मेडिटेशन - फक्त १० मिनिटांच्या मेडिटेशनने तुम्ही मेंदूला आराम आणि शांत करू शकता. मेडिटेशनने तुमचा दिवस अधिक कार्यक्षम जातो.
दिनक्रम लिहा- तुम्ही डायरीमध्ये दिवसभराचं तुमचं वेळापत्रक लिहू शकता. लिहिण्याने विचारांमध्ये सुसूत्रता येते.
सूर्यप्रकाश - शक्य असल्यास सकाळी सूर्यप्रकाश घ्या, व्हिटॅमिन डी घ्या!
नाश्ता करा- वरील पैकी काहीही तुम्ही विसरू शकता पण चुकूनही नाश्ता करणे विसरू नका
फोन चेक करू नका- उठल्या उठल्या फोन हातात घेऊन बसू नका. तुमचे ईमेल, फोन कॉल्स, मेसेज हे सगळं उठल्या उठल्या चेक करायची गरज नाही.
वाचन - सकाळी उठल्यावर तुम्ही वाचनासाठी देखील वेळ द्यायला हवा. वर्तमानपत्र वाचन असो किंवा एखादं पुस्तक!