PHOTOS : टोकिओ ऑलिंपिकमध्ये भारताला 6 खेळांमध्ये 7 पदकं, ‘हे’ आहेत पदकवीर, एका क्लिकवर

भारताला टोकिओ ऑलिंपिक 2020 स्पर्धेत 6 खेळांमध्ये 7 पदकं मिळाली. यासह टोकिओ ऑलिंपिकचं भारताचं अभियान संपलं. यंदाच्या ऑलिंपिकमधील कामगिरी भारताच्या आतापर्यंतच्या कामगिरीपैकी सर्वोत्तम राहिली.

1/8
भारताला टोकिओ ऑलिंपिक 2020 स्पर्धेत 6 खेळांमध्ये 7 पदकं मिळाली. यासह टोकिओ ऑलिंपिकचं भारताचं अभियान संपलं. यंदाच्या ऑलिंपिकमधील कामगिरी भारताच्या आतापर्यंतच्या कामगिरीपैकी सर्वोत्तम राहिली. याआधी भारताने लंडन ऑलिंपिक 2012 मध्ये 6 पदकं जिंकले होते. भारताने टोकिओत 1 सुवर्ण (Gold), 2 रौप्य (Silver) आणि 4 कांस्य (Bronze) पदक जिंकलंय. भारताला ही पदकं नेमकी कुणी मिळवून दिली याचाच हा खास आढावा.

2/8
भारताला यंदाच्या ऑलिंपिक स्पर्धेत पहिल सुवर्ण पदक मिळवून देणाऱ्या खेळाडूचं नाव आहे नीरज चोप्रा. त्याने भालाफेकीत सर्वोत्तम कामगिरी करत भारताच्या खात्यात हे पदक जमा केलं. 23 वर्षीय नीरजने आपल्या दुसऱ्याच प्रयत्नात 87.58 मीटर भाला फेकत जगाला स्तब्ध केलं. यानंतर भारतीयांचा आनंद पाहण्यासारखा होता. अॅथलेटिक्समध्ये मागील 100 वर्षापेक्षा अधिक काळात भारताचं हे पहिलं ऑलिंपिक सुवर्णपदक आहे. दुसरीकडे व्यक्तिगत खेळात भारतासाठी सुवर्ण जिंकणारा नीरज दुसरा खेळाडू ठरलाय. याआधी तिरंदाज अभिनव बिंद्राने बीजिंग ऑलिंपिकमध्ये 2008 ला पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफलमध्ये सुवर्ण पदक जिंकलं होतं.

3/8
भारताने टोकिओ ऑलिंपिक खेळात पदकाची सुरुवात पहिल्या दिवशीच केली. मीराबाई चानूने वेटलिफ्टिंगमध्ये भारताला सिल्वर मेडल जिंकून दिलं. मणिपूरच्या या खेळाडू महिलेने 49 किलो वर्गात आपली दमदार कामगिरी दाखवली. मीराबाई चानूने ऑलिंपिक स्पर्धेत भारताला वेटलिफ्टिंगमधील दुसरं पदक जिंकून दिलं. याआधी 2000 सिडनी ऑलिंपिकमध्ये कर्णम मल्लेश्वरीने कांस्य पदक जिंकलं होतं.

4/8
टोकिओ ऑलिंपिक स्पर्धेत भारताला रवि दहियाने दुसरं सिल्वर मेडल जिंकून दिलं. या पहिलवानाने पुरुषांच्या 57 किलो वर्गात पराभवाचा सामना केला. यानंतर रविने सिल्वर मेडलवर नाव कोरलं. भारताचं हे कुस्तीमधील दुसरं सिल्वर मेडल आहे. याआधी 2012 मधील लंडन ऑलिंपिकमध्ये सुशील कुमारने सिल्वर मेडल जिंकलं होतं.

5/8
पी. व्ही. सिंधुने भारताला टोकिओ ऑलिंपिकमध्ये पहिलं कांस्य पदक जिंकून दिलं होतं. तिने चीनच्या जियोबाओचा पराभव करत ऑलिंपिकमध्ये सलग दुसरं पदक पटकावलं. याआधी सिंधूने 2016 च्या रिओ ऑलिंपिकमध्ये देखील सिल्वर मेडल जिंकलं होतं. सिंधूच्या आधी सुशील कुमारने ऑलिंपिकमध्ये 2 मेडल जिंकले होते. सिंधूच्या कांस्य पदकाने भारताला सलग तिसऱ्यांदा बॅडमिंटनमध्ये ऑलिंपिक पदक मिळालं.

6/8
टोकिओ ऑलिंपिकमध्ये भारतीय महिला बॉक्सर लवलीना बोरगोहेनने देखील भारताची मान अभिमानाने उंचावली. तिने 69 किलोग्रॅम वर्गात वेल्टर वेट केटेगरीत कांस्य पदक जिंकलं. लवलीनाने आपल्या पहिल्याच ऑलिंपिकमध्ये मेडल जिंकून इतिहास रचलाय. ती ऑलिंपिकमध्ये मेडल जिंकणारी तिसरी भारतीय बॉक्सर ठरलीय. तिच्या आधी 2008 मध्ये विजेंदर सिंह आणि 2012 मध्ये मेरी कॉमने पदक जिंकलं होतं.

7/8
भारतीय कुस्तीपटू बजरंग पूनिया टोकिओ ऑलिंपिकमध्ये सुवर्ण पदकाचे दावेदार असल्याची चर्चा होती. मात्र, सेमीफायनलमधील पराभवामुळे त्यांना कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं. कुस्तीत हे भारताचं टोकिओ ऑलिंपिकमधील दुसरं पदक आणि एकूण पदकांमधील सातवं पदक ठरलं. त्याच्याआधी के. डी. जाधव (1952, कांस्य), सुशील कुमार (2008, कांस्य), सुशील कुमार (2012, रौप्य), योगेश्वर दत्त (2012, कांस्य), साक्षी मलिक (2016, कांस्य) आणि रवि दहिया (2020, रौप्य) यांनी पदकं जिंकली होती.

8/8
भारतीय पुरुष हॉकी टीमने टोकिओ ऑलिंपिकमध्ये यंदा जोरदार कामगिरी केली. त्यांनी जर्मनीचा 5-4 ने पराभव करत कांस्य पदकावर भारताचं नाव कोरलं. हे भारताचं हॉकीतील 41 वर्षांनंतरचं ऑलिंपिक मेडल आहे. तसेच या खेळातील एकूण 12 वं पदक आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI