Top 5 Marathi Serial | मालिकांच्या शर्यतीत ‘देवमाणूस’ची एंट्री, पाहा या आठवड्याच्या अव्वल मालिका

माहिती स्त्रोत : https://www.barcindia.co.in/data-insights#currencydata (महाराष्ट्र-गोवा - ग्रामीण आणि शहरी) आठवडा – 22

1/6
गेल्या अनेक आठवड्यांपासून स्टार प्रवाहच्या मालिकांची बाजी असलेल्या टीआरपी शर्यतीत झी मराठीच्या ‘देवमाणूस’ या मालिकेने एंट्री घेतली आहे.
2/6
वडील आणि मुलीच्या नात्यावर आधारित ‘मुलगी झाली हो’ ही मालिका 22व्या आठवड्यात प्रथम क्रमांकावर आहे.
3/6
जयदीप आणि गौरीची ही गोड प्रेमकथा प्रेक्षकांना खूप भावली आहे. ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ ही मालिका दुसऱ्या क्रमांकावर आहे.
4/6
‘रंग माझा वेगळा’ ही मालिका सध्या एका मोठ्या निर्णायक वळणावर आली आहे. ही मालिका टीआरपी यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे.
5/6
‘देवी सिंग’ला शिक्षा देण्यासाठी आता दिव्या मॅडमच्या मदतीला आलीय आर्या देशमुख, या नव्या ट्वीस्टसह ‘देवमाणूस’ ही मालिका चौथ्या क्रमांकावर आहे.
6/6
नवऱ्याच्या स्वप्नांना सत्यात उतरवण्यासाठी कीर्ती जीवचं रान करतेय. ‘फुलाला सुगंध मातीचा’ ही मालिका टीआरपी यादीत पाचव्या क्रमांकावर आहे.