अवघ्या एक किलोमीटरची व्याप्ती, ‘मुंबई’पेक्षाही लहान असणारे जगातील ‘हे’ 5 देश!

जगातील सर्वात मोठ्या देशांबद्दल आपल्याला माहित असलेच. परंतु, जगाच्या पाठीवर अस्तित्वात असणारे हे पाच देश चक्क ‘मुंबई’पेक्षाही लहान आहेत.

1/6
जगातील सर्वात मोठ्या देशांबद्दल आपल्याला माहित असलेच. परंतु, जगाच्या पाठीवर अस्तित्वात असणारे हे पाच देश चक्क ‘मुंबई’पेक्षाही लहान आहेत.
2/6
सर्वात लहान ‘टॉप 5’ देशांच्या यादीत ‘सॅन मारिनो’ हा देश पाचव्या स्थानावर आहे. 61.2 चौ.कि.मी. क्षेत्रात पसरलेल्या या देशाची एकूण लोकसंख्या अवघी 33,785 आहे.
3/6
या यादीमध्ये ‘तुवालू’ देशाचे नाव चौथ्या क्रमांकावर आहे. 26 चौरस किलोमीटरमध्ये पसरलेल्या या देशात केवळ 11508 लोक राहतात. फनाफुटी असे या देशाच्या राजधानीचे नाव आहे.
4/6
‘नाउरू’ हा जगातील तिसरा सर्वात छोटा देश आहे. त्याची लोकसंख्या 12704 आहे आणि या देशाच्या राजधानीचे नाव यारेन आहे. हा देश एकूण 21 चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरलेला आहे.
5/6
सर्वात लहान देशांच्या यादीत ‘मोनाको सिटी’चे नाव दुसर्‍या क्रमांकावर आहे. हा देश एकूण 2.02 चौरस किमीमध्ये पसरलेला आहे. या देशची लोकसंख्या 38,682 इतकी आहे.
6/6
जगातील सर्वात छोट्या देशांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर ‘व्हॅटिकन सिटी’ आहे. ख्रिश्चन धर्मियांचा पवित्र देश अशी याची ओळख आहे. 0.49 चौरस किमी क्षेत्रफळात पसरलेल्या या देशाची एकूण लोकसंख्या केवळ 825 आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI