दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार आरोपी पत्नी रजिया सुल्तानने आपला गुन्हा कबुल केला आहे. पोलिसांनी तिला ताब्यात घेतले आहे. रझियाचे तिच्या रोमान नावाच्या भाच्याशीच प्रेमसंबंध होते, असे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. रोमानच्या सल्ल्यानुसारच रझियाने नौशदची हत्या केली. अगोदर तिने नौशादवर चाकूने वार केले. त्यानंतर नौशादचा मृतदेह सुटकेसमध्ये भरून तो फेकून दिला.