Photo : व्हॅकेशन स्पॉट मालदीव; अभिनेत्रींचं बोल्ड फोटोशूटचं डेस्टिनेशन

लॉकडाऊनमध्ये बरेच महिने घरात अडकल्यानंतर आता तुमचे लाडके कलाकार व्हेकेशनसाठी बाहेर पडले आहे. (Vacation spot Maldives, see bold photoshoot of actresses)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 11:34 AM, 24 Nov 2020
लॉकडाऊनमध्ये बरेच महिने घरात अडकल्यानंतर आता बॉलिवूड कलाकार व्हॅकेशनसाठी बाहेर पडले आहेत.
या व्हॅकेशनसाठी त्यांची आवडती जागा ठरली ती म्हणजे मालदीव. नेहा धूपिया, दिशा पाटनी, रकुल प्रीत सिंह आदी बॉलिवूडकर मालदीवला पोहचले आहेत. या ट्रीपचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
दिशा पाटनी बॉयफ्रेन्ड टायगरसोबत मालदीवमध्ये धमाल करत आहे. तिनं हॉट आणि बोल्ड अंदाजातील तिचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. तिचा हा अंदाज तिच्या चाहत्यांना चांगलाच आवडला आहे.
बॉलिवूड अभिनेत्री नेहा धूपियानं पती अंगद बेदी आणि मुलगी मेहर बेदीसह मालदीवमध्ये वेळ घालवला आहे. तिनं फॅमिली व्हॅकेशनचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
अभिनेत्री रकुलप्रीत सिंहसुद्धा तिच्या कुटुंबासोबत मालदीवमध्ये एन्जॉय करत आहे.
अभिनेत्री तारा सुतारिया मालदीवमध्ये तिचा 25 वा वाढदिवस साजरा करत आहे. या वाढदिवसाची झलक तिनं सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे.
आपल्या फिट आणि बॉल्ड अंदाजानं सगळ्यांना घायाळ करणारी अभिनेत्री मंदिरा बेदीसुद्धा मालदीवमध्ये धमाल करत आहे. तिनं तिचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.