उपराष्ट्रपती निवडणूक : मतदानाचा हक्क बजावण्यासाठी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग व्हीलचेअरवरून संसदेत दाखल

भारताच्या नवीन उपराष्ट्रपतीच्या निवडीसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) उमेदवार जगदीप धनखर आणि विरोधी पक्षांच्या संयुक्त उमेदवार मार्गारेट अल्वा यांच्यात लढत आहे.

Aug 06, 2022 | 1:01 PM
प्राजक्ता ढेकळे

|

Aug 06, 2022 | 1:01 PM

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मतदान करण्यासाठी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग सोमवारी व्हीलचेअरवर बसून संसद भवनात पोहोचले. 89 वर्षीय मनमोहन सिंग हे  गेल्या वर्षी कोविड-19 ची लागण झाल्यापासून आजारी आहेत.

1 / 6
मनमोहन सिंग हे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्यावेळी  संसर्गाच्या विळख्यात होते. तापानंतर अशक्तपणाआल्याने त्यांना ऑक्टोबर 2021 मध्ये त्यांना ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) मध्ये दाखल करण्यात आले होते.

2 / 6
आज ते मतदानासाठी संसदेच्या आवारात पोहोचले तेव्हा पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने उभे राहात मतदानाचा हक्क  बजावला .

3 / 6

उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी आज  सकाळी १० वाजता संसद भवनात मतदानाला सुरुवात झाली. यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वप्रथम मतदानाचा हक्क बजावला.

4 / 6
उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी  भारतीय जनता पक्षाचे (भाजप) राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा,  संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, खासदार पियुष गोयल यांनी मतदान केले.

5 / 6

 सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरू राहणार आहे. दुपारी 1 वाजेपर्यंत 83 टक्के मतदान झाले. या कालावधीत 616 खासदार आणि नऊ आमदारांनी मतदानाचा हक्क बजावला. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) उमेदवार द्रौपदी मुर्मू यांचा संयुक्त पुरोगामी आघाडीचे (यूपीए) उमेदवार यशवंत सिन्हा यांच्याशी सामना आहे. 21 जुलै रोजी मतमोजणी होणार आहे.

6 / 6

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें