Photo : ‘वेडिंग बेल्स ‘; बजरंग पूनिया आणि संगिता फोगाट अडकणार लग्न बंधनात

भारताचा नंबर वन रेसलर बजरंग पूनिया बुधवारी लग्न बंधनात अडकणार आहे.(‘Wedding Bells’; Bajrang Punia and Sangita Phogat to tie the knot)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 18:16 PM, 24 Nov 2020
भारताचा नंबर वन रेसलर बजरंग पूनिया बुधवारी लग्न बंधनात अडकणार आहे. महत्वाचं म्हणजे कुस्ती क्षेत्रात नावलौकीक असलेल्या कुटुंबाचा तो जावई होणार आहे. येत्या 25 नोव्हेंबरला तो संगिता फोगाटसोबत लग्न करणार आहे.
'दंगल गर्ल' बबिता फोगाटची बहीण संगिता फोगाट बुधवारी सप्तपदी नाही तर चक्क अष्टपदी घेणार आहे. आठवा फेरा हा 'बेटी बचाओ-बेटी पढाओ'साठी असणार आहे.
सोमवारी संगिताला हळद लागली. हळदीच्या कार्यक्रमाचे फोटो तिनं सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत.
फोगाट कुटुंबाच्या प्रथेप्रमाणेच हे लग्न होणार आहे. कोरोनाचं संकट पाहता हे लग्न अत्यंत साधेपणानं होणार आहे.
बजरंग पूनियानं ऑलिम्पिक 2020 नंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला होता, मात्र कोरोनामुळे ऑलिम्पिक गेम्स झाले नाहीत. त्यामुळे तो आता लग्न करतोय.