PHOTO: जगातला सर्वांत मोठा ससा चोरीला

2010 साली डॅरियस हा जगातला सगळ्यात मोठा ससा असल्याची घोषणा करण्यात आली होती. | World's largest biggest rabbit darius

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 15:26 PM, 19 Apr 2021
1/5
World's largest giant rabbit darius missing may be stolen from owners garden
जगातला 'सर्वांत मोठा ससा' असा किताब जिंकलेला 4 फूट लांबीचा ससा त्याच्या पिंजऱ्यातून चोरीला गेला आहे. डॅरियस नाव असणारा हा ससा इंग्लंडमधल्या वुर्स्टशायर येथून 10 एप्रिलला चोरीला गेला.
2/5
World's largest giant rabbit darius missing may be stolen from owners garden
हा ससा त्याच्या बगिच्यात होता. हा सशाची नोंद गिनिज बुकात करण्यात आली आहे. हा हरवलेला ससा शोधून आणून देणाऱ्यास एक हजार पौंडांचं बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.
3/5
World's largest biggest rabbit, World's largest giant rabbit, rabbit darius, World's biggest rabbit stolen
या सशाची लांबी तब्बल 129 सेंटीमीटर्स म्हणजे 4 फूट 2 इंच इतकी आहे. याला 2010 साली जगातला सगळ्यांत मोठा ससा असं घोषित केलं होतं.
4/5
World's largest giant rabbit darius missing may be stolen from owners garden
डॅरियस हा फ्लेमिश जाएंट प्रवर्गातील आहे. या प्रवर्गातील ससे आकाराने मोठे असतात. या सशांचे वजन सात किलोपर्यंत असते आणि लांबी 0.7 मीटर असते. पूर्वीच्या काळी मांस आणि फरसाठी या सशांना पाळले जात होते. सध्या त्यांना पाळीव प्राणी म्हणून ठेवले जाते.
5/5
World's largest giant rabbit darius missing may be stolen from owners garden
या सशाच्या मालक अ‍ॅनेट या घटनेमुळे व्यथित झाल्या आहेत. हा ससा 'खूपच म्हातारा झाला आहे आणि आता प्रजननक्षम नाही. ज्यांनी कोणी हा ससा नेलाय, त्यांनी सुरक्षित परत आणून द्यावा अशी विनंतीही त्यांनी केली आहे.