मोठी बातमी! एकनाथ शिंदेंच्या उमेदवाराच्या पोटात चाकू भोसकला, हल्ल्याने मुंबईत खळबळ
मुंबईतील शिवसेनेचे उमेदवार हाजी सालीन कुरेशी यांच्यावर हल्ला करण्यात आला. बांद्रा येथील ज्ञानेश्वर नगरात हा हल्ला झाला आहे. प्रचारादरम्यान हा हल्ला करण्यात आला आहे.

BMC Election 2026 : सध्या मुंबईत महानागरपालिका निवडणुकीचा प्रचार शिगेला पाहोचला आहे. मतदानाचा दिवस जवळ येत असल्याने पूर्ण ताकदीने प्रचार केला जात आहे. विशेष म्हणजे रात्र आणि दिवस एक करून जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जातोय. एकनाथ शिंदे यांच्या उमेदवारांनी तर पूर्ण ताकद लावली आहे. काहीही झालं तरी मुंबईत महायुतीचाच विजय झाला पाहीजे, असा चंगच एकनाथ शिंदे यांच्या पक्षाने बांधला आहे. असे असतानाच आता शिंदे यांच्या उमेदवारासोबत धक्कादायक घटना घडली आहे. प्रचारादरम्यान शिंदे यांच्या उमेदवारावर मोठा हल्ला झाला आहे. प्रचार करत असतानाच या उमेदवाराच्या पोटाच थेट चाकू भोसकण्यात आला आहे. या घटनेनंतर मुंबईत एकच खळबळ उडाली आहे. सध्या या उमेदवारावर उपचार सुरू आहेत.
नेमका कोणावर हल्ला झाला?
मिळालेल्या माहितीनुसार मुंबईतील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार हाजी सालीन कुरेशी यांच्यावर हल्ला करण्यात आला. बांद्रा येथील ज्ञानेश्वर नगरात ते प्रचाराला गेले होते. मात्र अज्ञात व्यक्तीने त्यांच्यावर हल्ला केला. हल्ले करताना आरोपीने कुरेशी यांच्या पोटात धारदार चाकू भोसकला. हा हल्ला झाल्यानंत कुरेशी यांना लगेच रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर महात्मा गांधी रुग्णालयात उपचार सुरू आहे. याआधी अशा हल्ल्याची काही प्रकरणं समोर आली आहेत. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.
इम्तियाज जलील यांच्या गाडीवरही हल्ला
एकीकडे मुंबईत कुरेशी यांच्यावर हा हल्ला झाल्याचे समोर आलेले असताना दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरातही असाच एक प्रकार आहे. येथे संभाजीनगरचे माजी खासदार तथा एमआयएम पक्षाचे नेते इम्तियाज जलील हे प्रचारासाठी गेले होते. परंतु त्यांच्या कारवर लोकांनी हल्ला केला. एमआयएम पक्षाच्याच कार्यकर्त्यांनी हा हल्ला केल्याचे बोलले जात आहे. जलील यांच्यासोबत असलेल्या लोकांना मारहाण करण्यात आल्याचेही म्हटले जात आहे. तसे काही व्हिडीओ समोर आले आहेत. ही घटना घडल्यानंतर इम्तियाज जलील तक्रार दाखल करण्यासाठी तुरुंगात गेले होते. दरम्यान, आचारसंहिता लागू असताना आणि प्रचाराच्या काळात हिंसेच्या घटना घडत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
