Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Delhi Election Results 2025 LIVE : दिल्ली विधानसभा निवडणूक निकालानंतर अरविंद केजरीवाल यांची पहिली प्रतिक्रिया

| Updated on: Feb 08, 2025 | 4:58 PM

Delhi Election Results 2025 LIVE Counting and Updates in Marathi : दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल आज लागले असून भाजपचा दणदणीत विजय झाला आहे. 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली. राष्ट्रीय राजधानीतील सर्व 70 विधानसभा जागांवर 5 फेब्रुवारी रोजी मतदान झाले होते. दिल्लीत 60.54 टक्के मतदान झाले होते. दिल्ली निवडणुकांसह देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. प्रत्येक महत्वाचे अपडेट्स तुम्हाला इथे वाचायला मिळतील.

Delhi Election Results 2025 LIVE : दिल्ली विधानसभा निवडणूक निकालानंतर अरविंद केजरीवाल यांची पहिली प्रतिक्रिया

LIVE NEWS & UPDATES

  • 08 Feb 2025 04:58 PM (IST)

    राहुल गांधी यांनी आपल्याविरोधात लढावे- बाबनकुळे

    राहुल गांधी यांच्यात हिम्मत असेल तर त्यांनी 2029 च्या विधानसभेत माझ्याशी सामना करावा, असे खुले आव्हान भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी थेट राहुल गांधी यांना दिला. दिल्लीकरांनी आप पक्षाला आणि काँग्रेसला चांगलेच धुतले आहे. आता ईव्हीएम मशीन सेट होती, असा आरोप काँग्रेस आणि संजय राऊत करायला सुरुवात करतील. अशी खोचक टीका त्यांनी केली.

  • 08 Feb 2025 04:37 PM (IST)

    नांदेडच्या आश्रम शाळेतील 59 विद्यार्थ्यांना विषबाधा

    नांदेडच्या आश्रम शाळेतील 59 विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे. विद्यार्थ्यावर नांदेडच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. शाळेतील २० विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर आहे.

  • 08 Feb 2025 04:08 PM (IST)

    पिकअप – टाटा मॅजिकची धडक, 11 विद्यार्थी जखमी

    नांदेडमध्ये पिकअप – टाटा मॅजिकचा अपघात झाला. या अपघातात अकरा शाळकरी विद्यार्थी जखमी झाले. त्यांना नांदेडच्या शासकीय रुग्णालयासह खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. टाटा मॅजिकचा वाहनचालक गंभीर जखमी आहे.

  • 08 Feb 2025 03:45 PM (IST)

    दिल्लीकर हे केजरीवाल यांच्या सत्तेला कंटाळले होते: संजय सावकारे,वस्त्रोद्योग मंत्री

    वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी दिल्ली निकालावर मत मांडत केजरीवाल यांच्यावर टीका केली आहे. ” दिल्लीकर हे केजरीवाल यांच्या सत्तेला कंटाळले होते.दिल्लीकरांचे आश्वासन केजरीवालांनी पूर्ण केले नाही.पंतप्रधान मोदीजी आणि अमित शहांवर दिल्लीकरांनी विश्वास ठेवला. भारतातील दिल्ली हे केंद्रबिंदू आहेत या ठिकाणी भाजपचा विजय होणे याचा आनंद आहे. काँग्रेसचा सगळीकडे सपाया होत चाललाय.”असं म्हणतं त्यांनी टोले लगावले आहेत.

  • 08 Feb 2025 03:27 PM (IST)

    हितेंद्र ठाकूर आणि मिलिंद नार्वेकर यांच्या भेटीचे नेमकं कारण समोर आलं

    हितेंद्र ठाकूर आणि मिलिंद नार्वेकर यांची भेट झाल्यानंतर अनेक चर्चा रंगू लागल्या. मात्र आता ठाकूर यांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांनी सांगितलं की, ” विधानपरिषदेवर आमदार म्हणून निवडून आल्यानंतरपासून त्यांची जीवदानी देवीचे दर्शन घेण्याची त्यांची इच्छा होती. मिलिंद नार्वेकर यांनी जीवदानीचे दर्शन घेतले तसेत जाताना मला भेटून गेले आहेत याचे वेगळे काही औचित्य नव्हते” असं म्हणत त्यांनी या भेटीचे कारण स्पष्ट केलं आहे.

  • 08 Feb 2025 02:57 PM (IST)

    दिल्लीचा सर्वांगीण विकास करणार आम्ही कोणतीही कसर सोडणार नाही- पंतप्रधान मोदी

    पंतप्रधान मोदी म्हणाले की, राजधानी दिल्लीचा सर्व बाजूंनी विकास करू आणि लोकांचे जीवन विकासाकडे नेण्यात कोणतीही कसर सोडणार नाहीत.

  • 08 Feb 2025 02:26 PM (IST)

    जनतेने दिलेला कौल मंजूर आहे- केजरीवाल

    दिल्लीत भाजपाने जोरदार मुसंडी मारत आपचा दारूण पराभव केला आहे. या नंतर दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पराभव स्वीकारला आहे. तसेच जनतेने दिलेला कौल मान्य असल्याचं म्हंटलं आहे.

  • 08 Feb 2025 02:15 PM (IST)

    ‘आप’ दारूमध्ये गुंतली होती, वाईट प्रतिमेमुळे कमी मते मिळाली- अण्णा हजारे

    सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे म्हणाले की, मी बऱ्याच काळापासून सांगत आहे की निवडणूक लढवताना उमेदवाराचे आचरण, विचार आणि चारित्र्य शुद्ध असले पाहिजे.  दारुमुळे त्यांची प्रतिमा खराब होती, त्यामुळे त्यांना कमी मते मिळाली.

  • 08 Feb 2025 02:09 PM (IST)

    मनीष सिसोदिया जंगपुरा मतदारसंघातून पराभूत

    दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाचा पराभव झाला आहे. आम आदमी पक्षाचे उमेदवार आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया येथून निवडणूक हरले आहेत. भाजपचे तरविंदर सिंग विजयी झाले आहेत.

  • 08 Feb 2025 12:51 PM (IST)

    दिल्लीत ‘आप’ला मोठा धक्का, अरविंद केजरीवालांचा पराभव

  • 08 Feb 2025 12:23 PM (IST)

    दिल्लीत ‘आप’ला मोठा धक्का, मनीष सिसोदियांचा पराभव

    दिल्लीत ‘आप’ला मोठा धक्का बसला आहे. मनोज सिसोदियांचा पराभूत झाले आहेत. जंगपूर विधानसभा मतदारसंघातून मनीष सिसोदियांचा पराभव झाला आहे.

  • 08 Feb 2025 10:57 AM (IST)

    अण्णा फॅक्टर चालला

    समाजसेवक अण्णा हजारे यांनी 15-18 वर्षांपूर्वी दिल्लीत भ्रष्टाचाराविरोधात दिल्लीत मोठे आंदोलन उभारले होते. त्यातून देशात सत्ता पालट झाली. काँग्रेस सत्तेतून गेली. भाजपाने मांड ठोकली. दिल्लीच्या निवडणूक प्रचारात यावेळी अण्णा उतरले. केजरीवाल यांच्या प्रामाणिकपणावरच त्यांनी बोट ठेवलं. केजरीवाल स्वार्थी, बदमाश आणि संधीसाधू असल्याची प्रतिमा ठसवण्यात अण्णा यशस्वी ठरले.

  • 08 Feb 2025 10:52 AM (IST)

    भाजपाच्या मुख्यमंत्र्याच्या नावाची चर्चा

    दिल्लीत भाजपाने जोरदार मुसंडी मारल्यानंतर या विजयाचे श्रेय कुणाला द्यायचे याची चर्चा होत आहे. पक्षातील नेते त्यांच्या आवडीचा नेता मुख्यमंत्री पदी असावा अशी इच्छा व्यक्त करत आहेत.

  • 08 Feb 2025 10:37 AM (IST)

    संयम बाळगा-आतिषी

    भाजपाने मोठी मुसंडी मारली आहे. तर दुसरीकडे दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिषी यांनी कार्यकर्त्यांना थोडासा संयम बाळगा असे आवाहन केले आहे.

  • 08 Feb 2025 10:25 AM (IST)

    दिल्लीत भाजपाकडून जल्लोषाला सुरुवात

    दिल्लीत भाजपाकडून जल्लोषाला सुरुवात झाली आहे. सध्याच्या कलानुसार भाजपाने 42 जागांवर आघाडी घेतली आहे. तर आप 28 जागांवर पुढे आहे. काँग्रेसच्या खात्यात एकही मत गेलेले नाही.

  • 08 Feb 2025 10:14 AM (IST)

    हा तर महाराष्ट्र पॅटर्न, दिल्ली निवडणुकीवर संजय राऊतांची प्रतिक्रिया

    दिल्लीत आप सत्तेतून बाहेर पडत असल्याचे चित्र आहे. त्यावर खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली. जनता भाजपाला मतदान करत नसल्याचे ते म्हणाले. मतदान घोटाळ्याचा महाराष्ट्र पॅटर्न दिल्लीत राबवल्याचा आरोप त्यांनी केला.

  • 08 Feb 2025 10:10 AM (IST)

    बिहारच्या निवडणुकीवर परिणाम

    दिल्लीत डबल इंजिन सरकार अस्तित्वात येत आहे. सर्व काही फुकट देऊन विजय मिळवता येतो, या विचाराला मतदारांनी चोख उत्तर दिल्याचे सुधीरभाऊ मुनगंटीवार म्हणाले. दिल्लीतील निकालाचे सकारात्मक परिणाम बिहारच्या निवडणुकीवर दिसतील असे ते म्हणाले.

  • 08 Feb 2025 10:01 AM (IST)

    दिल्लीकरांचा कौल कुणाला?

    दिल्ली विधानसभा निवडणुकीत २७ वर्षानंतर दिल्लीत कमळ फुलणार असल्याचे कलावरून स्पष्ट होत आहे. आम आदमी पक्षाला मोठा फटका बसल्याचे दिसून येत आहे.

  • 08 Feb 2025 09:49 AM (IST)

    Maharashtra News: सोलापुरात रमाबाई आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त हजारो दिव्यांनी डॉ.आंबेडकर उद्यान उजळले

    रमाबाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने आर एस मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेकडून एक दिवा त्यागाचा उपक्रमातून साजरी करण्यात आली जयंती… डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे हजारो दिव्यांच्या प्रकाशात उजळून निघाला परिसर… रमाबाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने हजारो महिलांच्या उपस्थितीत दीपोत्सव साजरा करण्यात आला… दीपोत्सवाद्वारे रमाबाई आंबेडकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.

  • 08 Feb 2025 09:38 AM (IST)

    Delhi Election Results 2025: और लढो आपस में, ओमर अब्दुलांची पोस्ट

    और लढो आपस में, ओमर अब्दुलांची पोस्ट सध्या तुफान चर्चेत… ओमर अब्दुलांचा काँग्रेस आणि आपला टोला… दिल्ली आपच्या हातून गेली?, इंडिया आघाडीत बिघाडी…

  • 08 Feb 2025 09:31 AM (IST)

    Delhi Election Results 2025: 27 वर्षांनंतर देशाच्या राजधानीत भाजपचं कमळ फुललं

    निवडणूक आयोगाच्या आकडेवाडीनुसार भाजप 24 आणि आप 6 जागांवर पुढे… 27 वर्षांनंतर देशाच्या राजधानीत भाजपचं कमळ फुललं… मोदींच्या उदयानंतर दिल्ली विधानसभेची सत्ता पहिल्यांदा भाजपकडे…

  • 08 Feb 2025 09:14 AM (IST)

    Maharashtra News: मिरा-भाईंदरमध्ये नवीन वर्षात महापालिका प्रशासन सीबीएसई शाळा सुरु करणार

    येत्या एप्रिल महिन्यात त्याची जाहिरात काढून त्यात नर्सरीमध्ये २० आणि ज्युनियर केजीमध्ये २० विद्यार्थ्यांना लॉटरी पद्धतीने प्रवेश देण्यात येणार आहे… भाईंदर पूर्व इंद्रलोक मधील शाळा इमारतीचे बांधकाम या वर्षी पूर्ण झाली आहे..

  • 08 Feb 2025 09:00 AM (IST)

    Delhi Election Result : सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये भाजपला बहुमत

    सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये भाजपला दिल्लीत बहुमत मिळताना दिसत आहे. आम आदमी पार्टीचे अरविंद केजरीवाल यांची संपूर्ण टीम कोलमडली आहे. ती पिछाडीवर आहे. तसेच काँग्रेसची कामगिरी पुन्हा निराशाजनक दिसत असून अवघ्या एका जागेवर आघाडीवर आहे.

  • 08 Feb 2025 08:21 AM (IST)

    Delhi Election Result : आप – भाजपमध्ये कांटे की टक्कर, केजरीवाल, आतिशी आणि सिसोदिया पिछाडीवर

    दिल्लीत पोस्टल मतांची मोजणी सुरू आहे. सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये आप आणि भाजप यांच्यात कांटे की टक्कर दिसून येत आहे. मात्र, काँग्रेसचे खाते अद्याप उघडले नाही. जंगपुरा मतदारसंघातून आपचे उमेदवार मनीष सिसोदिया पिछाडीवर असून तसेच नवी दिल्लीतून अरविंद केजरीवाल आणि कालकाजी मधून आतिषी या पिछाडीवर आहेत.

  • 08 Feb 2025 08:06 AM (IST)

    Delhi Election Result : पोस्टल मतमोजणीला सुरूवात, कोण आघाडीवर ?

    दिल्ली विधानसभा निवडणुकीतील मतदानानंतर पोस्टल मतमोजणीला सुरूवात झाली असून पहिला कल हाती आला आहे. सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये बुरारी आणि देवालीमध्ये ‘आप’ पुढे आहे, तर पडपडगंजमध्ये भाजप आघाडीवर आहे.

  • 08 Feb 2025 07:52 AM (IST)

    Delhi Election Result : अरविंद केजरीवाल पुन्हा मुख्यमंत्री बनतील – आतिषी यांना विश्वास

  • 08 Feb 2025 07:42 AM (IST)

    Delhi Election Result : दिल्लीत पुन्हा कमळ फुलणार, भाजप उमेदवाराला विश्वास

    “जसा देश विकसित भारत बनत आहे, त्याचप्रमाणे दिल्लीतही कमळ फुलणार आहे. आपची हॅटट्रिक होणार नाही. ” असे दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालावर भाजप नेते आणि मालवीय नगरचे उमेदवार सतीश उपाध्याय म्हणाले

  • 08 Feb 2025 07:28 AM (IST)

    Delhi Election Result : भाजपने 68 जागांवर लढवली निवडणूक

    दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला थोड्याच वेळात सुरूवात होणार आहे. या निकालाच्या ट्रेंडवरून, पुढील पाच वर्षे कोणाची सत्ता राहणार हे दुपारपर्यंत स्पष्ट होईल. आप आणि काँग्रेसने सर्व 70 मतदारसंघात उमेदवार उभे केले, तर भाजपने 68 जागा लढवल्या आणि जनता दल (युनायटेड) आणि लोकतांत्रिक जनशक्ती पार्टी (रामविलास) या मित्रपक्षांसाठी दोन जागा सोडल्या.

    एकूण 699 उमेदवारांनी ही निवडणूक लढवली ज्यात 603 पुरुष, 95 महिला आणि थर्ड जेंडर मेदवार आहे. 5 फेब्रुवारी रोजी दिल्लीत एकूण 60.5% मतदान झालं.

  • 08 Feb 2025 07:06 AM (IST)

    Delhi Election Results : दिल्लीत भाजप विरुद्ध आप, 8 वाजल्यापासून सुरू होणार मतमोजणी

    दिल्लीतील 70 विधानसभा जागांसाठी झालेल्या निवडणूक लढतीचा निकाल काही तासांतच लागणार आहे. 1998 पासून विरोधी पक्ष असलेल्या सत्ताधारी आप आणि भाजप यांच्यात मुख्य लढत असल्याचे मानले जात आहे, परंतु काँग्रेसही काही अनपेक्षित निकालांसह ही लढत बदलू शकते. सकाळी 8 वाजता मतमोजणी सुरू होईल आणि 9.30 पर्यंत सुरुवातीचा कल येणं अपेक्षित आहे.

दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल आज लागले असून 27 वर्षांनतर राजधानीत कमळ फुललं आहे. भाजपची विजयी वाटचाल असून सत्ताधारी आम आदमी पक्षाचा दारूण पराभव झाला आहे. धक्कादायक म्हणजे अरविंद केजरीवाल यांनाही पराभवाचा धक्का बसला आहे.  राष्ट्रीय राजधानीतील सर्व 70 विधानसभा जागांवर 5 फेब्रुवारी रोजी मतदान झाले होते. दिल्लीत 60.54 टक्के मतदान झाले होते. 2020 च्या तुलनेत यावेळी दिल्लीत 2 टक्के कमी मतदान झाले आहे. निवडणुकीत 60.92 टक्के महिलांनी मतदान केले. बहुतांश एक्झिट पोलमध्ये भाजपचे सरकार स्थापनेचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.  आता भाजपचा मुख्यमंत्री कोण याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. निवडणूक निकालाशी संबंधित प्रत्येक अपडेट्स या ब्लॉगमध्ये वाचण्यास मिळतील. लेटेस्ट अपडेटसाठी वाचत रहा हा ब्लॉग.

Published On - Feb 08,2025 7:03 AM

Follow us
नाशिकमध्ये रिक्षा चालकाची गुंडागिरी; व्हिडिओ व्हायरल
नाशिकमध्ये रिक्षा चालकाची गुंडागिरी; व्हिडिओ व्हायरल.
ऐवढा मोठा तो नाही, जेवढा दाखवला गेला..; खोक्याबद्दल धसांच मोठं विधान
ऐवढा मोठा तो नाही, जेवढा दाखवला गेला..; खोक्याबद्दल धसांच मोठं विधान.
सुरेश धस खोक्याच्या घरी पोहोचले, कुटुंबाने सांगितली आपबिती
सुरेश धस खोक्याच्या घरी पोहोचले, कुटुंबाने सांगितली आपबिती.
'राऊतांच्या मेंदूचे दोन तुकडे झालेत अन्...', भाजप नेत्याची टीका
'राऊतांच्या मेंदूचे दोन तुकडे झालेत अन्...', भाजप नेत्याची टीका.
आधी शिंदे-दादांना मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली अन् आता म्हणताय, 'मी तर..'
आधी शिंदे-दादांना मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली अन् आता म्हणताय, 'मी तर..'.
चंद्रकांतदादांच्या ऑफरवर विशाल पाटील म्हणाले, 'विचार वेगळे असले तरी..'
चंद्रकांतदादांच्या ऑफरवर विशाल पाटील म्हणाले, 'विचार वेगळे असले तरी..'.
प्रकरणाला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न सुरू; धनंजय देशमुखांचा आरोप
प्रकरणाला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न सुरू; धनंजय देशमुखांचा आरोप.
राणेंवर कारवाई करा, ठाकरेंचा नेता भडकला, 'त्या' वक्तव्यावरुन CMला पत्र
राणेंवर कारवाई करा, ठाकरेंचा नेता भडकला, 'त्या' वक्तव्यावरुन CMला पत्र.
औरंगजेब आव्हाडांचा दैवत? जितूमियाँ म्हणत शिवसेनेच्या खासदाराचा घणाघात
औरंगजेब आव्हाडांचा दैवत? जितूमियाँ म्हणत शिवसेनेच्या खासदाराचा घणाघात.
औरंगजेबाच्या कबरी जवळ बंदोबस्त वाढवला
औरंगजेबाच्या कबरी जवळ बंदोबस्त वाढवला.