"एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मांना राज्यमंत्री पद द्या"

एन्काऊंटर स्पेशालिस्ट माजी पोलीस अधिकारी आणि शिवसेनेचे उमेदवार प्रदीप शर्मा (Pradeep Sharma Ministry) यांना राज्यमंत्री पद द्या, अशी मागणी सामाजिक संघटनांनी केली आहे.

Pradeep Sharma Ministry, “एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मांना राज्यमंत्री पद द्या”

नालासोपारा : एन्काऊंटर स्पेशालिस्ट माजी पोलीस अधिकारी आणि शिवसेनेचे उमेदवार प्रदीप शर्मा (Pradeep Sharma Ministry) यांना राज्यमंत्री पद द्या, अशी मागणी सामाजिक संघटनांनी केली आहे. पंचशिल सेवा संघाचे अध्यक्ष नविन लादे यांनी ही मागणी केली आहे. प्रदीप शर्मा यांचा विधानसभा निवडणुकीत बविआच्या क्षितीज ठाकूर यांच्याकडून दारुण पराभव झाला (Pradeep Sharma Ministry) होता.

पंचशिल सेवा संघाचे अध्यक्ष नविन लादे यांनी नुकतंच शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना निवदेन पत्र दिलं आहे. या पत्रात त्यांनी प्रदीप शर्मा यांचं राजकीय पुनर्वसन करावं. तसेच त्यांना एखादं राज्यमंत्री पद द्यावं, अशी मागणी केली आहे.

नालसोपारा, वसई आणि विरारसोबत, ठाणे पालघर जिल्ह्यातील गुन्हेगारी, दहशत, जनतेची आर्थिक फसवणूक मोडीत निघावी यासाठी सामाजिक संघटनांनी ही मागणी केली (Pradeep Sharma Ministry) आहे.

प्रदीप शर्मा यांनी शिवसेनेकडून विधानसभा निवडणूक लढवली होती. मात्र बहुजन विकास आघाडीचे उमेदवार क्षितीज ठाकूर यांच्याकडून त्यांचा दारुण पराभव झाला. प्रदीप शर्मा यांना 1 लाख 06 हजार 139 मतं मिळाली. तर क्षितीज ठाकूर यांना 1 लाख 49 हजार 807 मतं मिळाली. क्षितीज ठाकूर यांनी प्रदीप शर्मांचा 43 हजार 729 मताधिक्यांनी पराभव केला.

विधानसभेचा निकाल

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये (Maharashtra Vidhansabha Election Result) भाजपने मुसंडी मारत 105 जागा मिळवल्या आहेत. मात्र 145 ची मॅजिक फिगर एकहाती गाठण्यात भाजपला अपयश आलं आहे. शिवसेना 56 जागांसह दुसऱ्या स्थानावर आहे.

भाजप राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरलेला असला, तरी लोकसभा निवडणुकांच्या वेळी दिसलेली भाजप-शिवसेना महायुतीची लाट ओसरत चालल्याचं चित्र दिसत आहे.

(Maharashtra Vidhansabha Election Partywise Result)

भाजप – 105
शिवसेना – 56
राष्ट्रवादी – 54
काँग्रेस – 44
बहुजन विकास आघाडी – 03
प्रहार जनशक्ती – 02
एमआयएम – 02
समाजवादी पक्ष – 02
मनसे – 01
माकप – 01
जनसुराज्य शक्ती – 01
क्रांतिकारी शेतकरी पक्ष – 01
शेकाप – 01
रासप – 01
स्वाभिमानी – 01
अपक्ष – 13

एकूण – 288 (Maharashtra Vidhansabha MLA List 2019)

महायुती – 162
(भाजप (105), शिवसेना (56), रासप (01), रिपाइं, रयत क्रांती संघटना, शिवसंग्राम)

महाआघाडी – 105
(राष्ट्रवादी (54), काँग्रेस (44), बहुजन विकास आघाडी (03), शेकाप (01), स्वाभिमानी (01), समाजवादी पक्ष (02)

संबंधित बातम्या : 

एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांची निवडणूक अधिकाऱ्याला धमकी, गुन्हा दाखल

प्रदीप शर्मांवर पैसे वाटल्याचा आरोप, बविआ आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये राडा

एक जोडीदार संसदेत, एक विधीमंडळात

विधानसभा निकालानंतर अमित शाहांचा उद्धव ठाकरेंना फोन

36 आमदारांचा पत्ता कट करुन दुसऱ्यांना तिकीट, यंदाचा निकाल काय?

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *