मध्यरात्रीपासून एसटी कर्मचारी बेमुदत संपावर, कारवाई केली तर परिवहन मंत्र्यांच्या दारात आंदोलन, गोपीचंद पडळकरांचा इशारा

आज मध्यरात्री 12 पासून एसटी कर्मचारी बेमुदत संपावर जात आहेत. एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण होत नाही तोपर्यंत आंदोलन चालूच राहणार, असा इशारा भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिलाय.

मध्यरात्रीपासून एसटी कर्मचारी बेमुदत संपावर, कारवाई केली तर परिवहन मंत्र्यांच्या दारात आंदोलन, गोपीचंद पडळकरांचा इशारा
गोपीचंद पडळकर, आमदार, भाजप
Follow us
| Updated on: Oct 28, 2021 | 2:29 PM

सांगली : ऐन दिवळीच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपाचं हत्यार उपसलं आहे. आज मध्यरात्री 12 पासून एसटी कर्मचारी बेमुदत संपावर जात आहेत. एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण होत नाही तोपर्यंत आंदोलन चालूच राहणार, असा इशारा भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिलाय. इतकंच नाही तर आंदोलन करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली तर मी स्वत: परिवहन मंत्री अनिल परब यांच्या घरासमोर आंदोलन करणार असल्याचं पडळकर यांनी जाहीर केलंय. (ST workers to go on indefinite strike from midnight, MLA Gopichand Padalkar warns Transport Minister Anil Parab)

एसटीचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करणे, पगारवाढ, त्याचबरोबर महागाई भत्त्यात वाढ मिळावी या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांकडून बेमुदत संपाची घोषणा केली आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला पाठिंबा दर्शवत आमदार गोपीचंद पडळकर यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे. एसटीचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण होत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहणार. कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली तर कर्मचारी बायकोचे मंगळसूत्र गहाण ठेवून मुंबईत येतील. जर पोलिसांनी गाडी अडवली तर त्याच ठिकाणी बस सोडून कर्मचारी येतील मी स्वत: परिवहन मंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन सुरु करणार असल्याची घोषणा पडळकर यांनी केलीय.

गेली 15 दिवस झाले सरकार गांजा आणि चरसच्या मागे लागले आहे. पण राज्य सरकारनं एसटी कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा आणि त्यांचं विलिनीकरण राज्य सरकारमध्ये करावं, अशी मागणी पडळकर यांनी माध्यमांशी बोलताना केलीय.

एसटी कर्मचाऱ्यांचं बेमुदत उपोषण

दरम्यान, राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांनी बुधवारपासून पगारासह विविध मागण्यांसाठी बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे. नाशिक, मनमाड, पुणे, नागपूर, सोलापूर या ठिकाणी कर्मचारी आक्रमक झालेले पाहायला मिळाले. आंदोलन तीव्र झाल्यास दिवाळीच्या तोंडावर प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागू शकतो.

नाशिक, मनमाडमध्ये तीव्र पडसाद

नाशिकमधील विविध संघटनांच्या कर्मचाऱ्यांनी या उपोषणास पाठिंबा दिला आहे. नाशिकच्या एन. डी. पटेल रोडवरील एस. टी. डेपोत या कर्मचाऱ्यांनी एकत्र जमले होते. त्यांनी महागाई भत्ता देण्यात यावा, वार्षिक वेतनवाढ ही दोनवरून टक्क्यांवरून तीन टक्के करण्यात यावी. दिवाळीपूर्वी वेतन मिळावे अशी मागणी यावेळी केली. राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास संप करू, असा इशारा इंटकचे नेते जयप्रकाश छाजेड यांनी दिला आहे. दरम्यान, मनमाडमध्येही कामगारांनी बंद पुकारून उपोषण केले. आंदोलनामुळे स्थानकावरून एकही बस सोडण्यात आली नाही. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली.

पुणे, कोल्हापूरमध्येही आंदोलन

पुणे आणि कोल्हापूरमध्येही एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. पुण्यात स्वारगेट परिसरातील एसटी महामंडळाच्या विभागीय कार्यालयाबाहेर संयुक्त कृती समितीतर्फे बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे. कोल्हापूरमध्येही एसटी कर्मचारी आक्रमक झाले आहेत. राज्य सरकारने तातडीने मागण्या मान्य कराव्यात अन्यथा संप पुकारू, असा इशारा त्यांनी दिला आहे.

नागपूर, सोलापूरमध्ये उपोषण सुरू

नागपूरमध्येही एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. मात्र, या काळात एसटी वाहतूक सुरू राहील. प्रवाशांना वेठीस धरणार नाही, अशी भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. सोलापूरमध्ये श्रमिक कृती संघटनेने उपोषण सुरू केले आहे. मात्र, या ठिकाणीही एसटीची वाहतूक सेवा सुरळीत सुरू आहे. आंदोलनात सहभागी झाल्यास कर्मचाऱ्यावर कारवाई करू, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.

इतर बातम्या :

आरोपांच्या मालिकेनंतर एनसीबीची कारवाई थंडावली! तक्रारी आल्यानंतर कारवाया थांबवण्याचे वरिष्ठांचे आदेश

‘समीर वानखेडेंना एकाकी पडू देऊ नका, मविआतील नेत्यांच्या घोटाळ्यावरुनही लक्ष हटायला नको’, भाजप नेत्यांना दिल्लीतून आदेश?

ST workers to go on indefinite strike from midnight, MLA Gopichand Padalkar warns Transport Minister Anil Parab

Non Stop LIVE Update
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.