AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापलं, पण प्रेरणा आणि संकल्पक शहाजीराजे होते; वाचा शहाजीराजेंनी कोणते कष्ट घेतले ?

छत्रपती शिवाजी महाराज (Shivaji Maharaj) यांची स्वत:च्या कर्तृत्वावर स्वराज्याचा झेंडा अटकेपार फडकवला. त्यांनी मावळ्यांची फौज निर्माण करुन मुघलांना सळो की पळो करुन सोडले. शिवाजी महाराज यांचे वडील शहाजी महाराज यांचे स्वराज्य निर्मितीत मोठे योगदान राहिलेले आहे. शिवाजी महाराज यांच्यावर जिजामाता यांनी बालपणी संस्कार दिले.

शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापलं, पण प्रेरणा आणि संकल्पक शहाजीराजे होते; वाचा शहाजीराजेंनी कोणते कष्ट घेतले ?
shahaji raje bhosale (फोटो सौजन्य विकीपिडिया)
| Edited By: | Updated on: Jan 23, 2022 | 7:08 AM
Share

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज (Shivaji Maharaj) यांनी स्वत:च्या कर्तृत्वावर स्थापन केलेला स्वराज्याचा झेंडा पुढच्या काळात अटकेपार फडकला. शिवाजी महाराज यांचे वडील शहाजीराजे यांचे स्वराज्य निर्मितीत मोठे योगदान राहिलेले आहे. शिवाजी महाराज यांच्यावर जिजामाता यांनी बालपणी संस्कार केले. तर शहाजी महाराज (Shahaji Raje Bhosale) यांनी शिवरायांना स्वराज्य निर्मितीसाठी लागणारं धाडस आणि पाठबळ दिलं. स्वराज्य निर्मितीसाठी शिवरायांना शहाजी महाराजांकडूनच प्रेरणा मिळालेली होती. शहाजीराजेंनी शिवरायांना कसे प्रेरित केले यावर थोडा प्रकाश टाकुया.

आदिलशहा आणि शहाजाहान बादशहा यांच्यात तह

शहाजीराजे यांनी आदिलशाही तसेच निजामाकडे सुभेदार म्हणून मोठे पराक्रम केले. त्यांनी पुण्यासारख्या भागात मराठी जनतेला आपला पराक्रम तर दाखवला होताच पण त्याचबरोबर कर्नाटकातदेखील त्यांनी आपले कर्तृत्व गाजवले होते. 1636 मध्ये शहाजीराजे यांनी पेमगिरी किल्ला शहाजहान बादशहाच्या स्वाधीन केला. यानंतर आदिलशहा आणि शहाजाहान बादशहा यांच्यात तह झाला. भीमेपलीकडील निजामशहाचा मुलूख मोगलांस तर अलीकडील आदिलशहास द्यावा असे ठरले. त्याचबरोबर आदिलशहाने शहाजीराजांना जहागीर द्यावी असेही ठरले.

शहाजीराजे यांनी स्वराज्याची योजना आखली

फेब्रुवारी 1637 मध्ये शहाजीराजे हे पत्नी जिजाबाई, मुलगा संभाजी व बाल शिवाजींसह विजापूरला गेले. येथे या सर्वांना शहाजीराजे यांनी स्वराज्य संपादनाचा मनोदय सांगितला. येथूनच शिवाजी महाराज यांच्या मनात स्वराज्याचे बीज रुजत गेले. शिवाजी महाराज यांचे मोठे बंधू संभाजीराजे यांनी कर्नाटकात स्वराज्य कमवावे आणि शिवरायांनी मातोश्री जिजाबाई यांच्यासह पुण्यात राहून महाराष्ट्रात स्वराज्याची स्थापना करावी, असे शहाजीराजे यांनी सांगितले. त्यानंतर शहाजीराजे 25 फेब्रुवारी रोजी कर्नाटकात आल्यानंतर राजासारखे राहू लागले. तेथे त्यांनी आपले स्वतंत्र असे अस्तित्व निर्माण केले होते.

बंगळुरुहून शिवरायांबरोबर आपले विश्वासू सरदार पाठवले

शिवाजी महाराजांच्या वयाच्या 10 व्या वर्षी शहाजीराजेंनी त्यांना जिजामाता यांच्यासह 1640 मध्ये बंगळुरु येथे आणले. त्यांनी शिवरायांना बंगळुरु येथे दोन वर्षे प्रशिक्षण दिले. या काळात शिवाजी महाराज यांना शहाजीराजे यांच्याकडून स्वराज्य निर्मितीची प्रेरणा तसेच इतर सहाय्य मिळाले. जी गोष्ट शहाजीराजे यांना करणे शक्य झाले नाही. ती गोष्टी आपल्या दोन्ही प्रतापी पुत्रांकडून करुन घेण्यासाठी शहाजीराजे यांनी या काळात प्रचंड मेहनत घेतली. त्यांनी आपल्या पुत्रांसाठी स्वराज्याची योजना आखली. याच स्वराज्य स्थापनेच्या पूर्ततेसाठी त्यांनी बंगळुरुहून शिवरायांबरोबर आपले विश्वासू सरदार पाठवले.

शहाजीराजे यांनी शिवरायांच्या मनावर स्वराज्याचा मंत्र कोरला

शहाजीराजे यांनी स्वराज्य निर्मितीत दिलेल्या योगदानाचे वर्णन करताना प्रा. शेजवलकर यांनी खालीलप्रमाणे सांगितलेले आहे. “शिवराय बंगळुरुमध्ये शहाजीराजे यांच्या सानिध्यात होते, तेव्हा त्यांच्या संस्कारक्षम मनावर शहाजीराजे यांनी स्वराज्याचा महामंत्र कोरला. नंतर बंगळुरुहून पुण्याला परत येताच शिवाजी महाराज यांनी स्वराज्य स्थापनेच्या दिशेने हालचाली सुरु केल्या होत्या.

शहाजीराजे यांची स्वराज्य स्थापनेत काय भूमिका होती हे सांगणारी ही फक्त जुजबी माहिती आहे. मुळात शहाजीराजे यांचे कार्य, त्यांनी शिवाजी महाराजांना केलेले मार्गदर्शन हे अमूल्य होते. शहाजीराजेंच्या मुशीतून शिवाजी महाराज घडले. शहाजीराजेंचे धाडस, त्यांचे कर्तृत्व, लढाऊ वृत्ती पुढे शिवाजी महाराज यांच्यात वाढत गेली आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी पुढे काय काय पराक्रम केले हे आपण सर्व जाणतोच.

(टीप- वरील माहिती महाराष्ट्राचा इतिहास मराठा कालखंड- 1 शिवकाल, लेखक डॉ. वि. ग. खोबरेकर यांच्या पूस्तकातून घेण्यात आली आहे.)

इतर बातम्या :

पाऊस पडल्यावर मातीतून सुगंध का येतो, त्यामागील नेमके कारण काय?

माहेर बाई हक्काचं! 1956 पूर्वीच्या मालमत्तेतही मुलीचा वारसा हक्क मान्य, सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण विकाल

महाराष्ट्रातील उदारमतवादी समाजसुधारक न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.