Pankaja Munde Video : ‘मंत्री असले काय, नसले काय मला…’, वेगळा पक्ष स्थापन करण्याच्या चर्चांवर पंकजा मुंडे स्पष्टच म्हणाल्या….

Pankaja Munde Video : ‘मंत्री असले काय, नसले काय मला…’, वेगळा पक्ष स्थापन करण्याच्या चर्चांवर पंकजा मुंडे स्पष्टच म्हणाल्या….

| Updated on: Jul 09, 2025 | 7:16 PM

'मी कशाला पक्ष स्थापन करेन, माझ्या रक्ताच्या प्रत्येक थेंबात राजकारण आहे. दिल्लीमध्ये नरेंद्रजी मोदी यांची सत्ता आहे. राज्यात देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत आणि मी स्वतः मंत्री आहे असं असताना मी नवीन पक्ष का काढेल?'

भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांचा साठा केला तर एक वेगळा पक्षच तयार होईल. वेगळा पक्ष उभा करण्याची ताकद आणि तितकी संख्या गोपीनाथ मुंडे यांच्यावर प्रेम करणाऱ्यांची आहे. फक्त तेच गोळा केले तर वेगळा पक्ष निर्माण होऊ शकतो, असं वक्तव्य भाजपच्या नेत्या मंत्री पंकजा मुंडे यांनी नाशिकमध्ये केलं होते. यानंतर राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र यावर आज पंकजा मुंडे यांनी बीडच्या आष्टीतून स्पष्टीकरण दिलं आहे. ‘मी कशाला पक्ष स्थापन करेन, माझ्या रक्ताच्या प्रत्येक थेंबात राजकारण आहे. दिल्लीमध्ये नरेंद्रजी मोदी यांची सत्ता आहे. राज्यात देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत आणि मी स्वतः मंत्री आहे असं असताना मी नवीन पक्ष का काढेल?’ असा सवालही मंत्री पंकजा मुंडेंनी केला. पुढे त्या असंही म्हणाल्या, मंत्री असले काय, नसले काय मला फरक पडत नाही. माझ्या मंत्रिपदाचे 1825 दिवस उरले आहेत. प्रत्येक दिवस परळीसाठी आहे. मी गुंडासाठी गुंड आणि बंडाला बंड आहे. कोणालाही घाबरत नाही, असं म्हणत असताना स्त्री शिक्षणावरही त्यांनी भाष्य केलं. स्त्री शिकली की समाज शिकतो. मुलींचा सन्मान करा… मुलीच्या पाठीशी उभे रहा बघा आपल्या मुली कशा वंशाचा दिवा बनल्याशिवाय राहणार नाही, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

Published on: Feb 10, 2025 04:55 PM