AUS vs IND T20 Super 8 Highlights And Score: टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियावर 24 धावांनी विजय, सेमी फायनलमध्ये धडक

| Updated on: Jun 25, 2024 | 12:25 AM

Australia vs India Super 8 T20 world Cup 2024 Highlights And Score Updates: टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर टी 20 वर्ल्ड कप इतिहासातील चौथा विजय मिळवला आहे. टीम इंडियाने या विजयासह सेमी फायनलमध्ये प्रवेश केला आहे.

AUS vs IND T20 Super 8 Highlights And Score: टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियावर 24 धावांनी विजय, सेमी फायनलमध्ये धडक
team indiaImage Credit source: jay shah x account

आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत टीम इंडियाने कॅप्टन रोहित शर्मा याच्या नेतृत्वात विजयी षटकार लगावला आहे. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर 24 धावांनी मात करत सेमी फायनलमध्ये पाचव्यांदा प्रवेश मिळवला आहे. टीम इंडियाने कांगारुंना विजयासाठी 206 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र टीम इंडियाच्या गोलंदाजांसमोर कांगारुंना 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 181 धावांपर्यंतच मजल मारता आली. आता सुपर 8 मधील अखेरचा सामना हा बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान असा होणार आहे. अफगाणिस्तानला विजय मिळवून सेमी फायनलमध्ये पोहचण्याची संधी आहे. अफगाणिस्तान पराभूत झाली, तरी कांगारु सेमी फायनलसाठी क्वालिफाय करतील. तर बांगलादेशला सेमी फायनलमध्ये पोहचायचं असेल, तर त्यांना मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागेल. त्यामुळे या सामन्याच्या निकालावर सेमी फायनलमध्ये कोण पोहचणार हे ठरणार आहे.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 25 Jun 2024 12:14 AM (IST)

    AUS vs IND Live Score: टीम इंडिया सेमी फायनलमध्ये

    रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाने आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील सेमी फायनलमध्ये प्रवेश मिळवला आहे. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर 24 धावांनी मात केली. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी  206 धावांचं आव्हान दिलं होतं. या धावांचा पाठलाग करताना कांगारुंना 7 विकेट्स गमावून 181 धावाच करता आल्या.

  • 24 Jun 2024 11:35 PM (IST)

    AUS vs IND Live Score: टीम डेव्हिड आऊट

    ऑस्ट्रेलियाने सातवी विकेट गमावली आहे. टीम डेव्हिड आऊट झाला आहे. डेव्हिडने 10 बॉलमध्ये 15 धावा केल्या.

  • 24 Jun 2024 11:30 PM (IST)

    AUS vs IND Live Score: मॅथ्यू वेड आऊट, कुलदीपचा सुपर कॅच

    कुलदीप यादवने अप्रतिम कॅच घेत मॅथ्यू वेडला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला आहे. मॅथ्यू वेडच्या रुपात ऑस्ट्रेलियाने सहावी विकेट गमावली आहे.

  • 24 Jun 2024 11:25 PM (IST)

    AUS vs IND Live Score: डोकेदुखी गेली, ट्रेव्हिस हेड आऊट

    जसप्रीत बुमराहने टीम इंडियाची डोकेदुखी घालवली आहे.  बुमराहने कॅप्टन रोहितच्या हाती ट्रेव्हिस हेडल याला कॅच आऊट केलं. हेडने 43 बॉलमध्ये 76 धावांची खेळी केली.

  • 24 Jun 2024 11:13 PM (IST)

    AUS vs IND Live Score: मार्कस स्टोयनिस आऊट

    ऑस्ट्रेलियाला चौथा झटका लागला आहे. मार्कस स्टोयनिस 4 बॉलमध्ये 2 धावा करुन कॅच आऊट झाला आहे. अक्षर पटेलने त्याची विकेट घेतली. तर हार्दिक पंडयाने कॅच घेतला.

  • 24 Jun 2024 11:09 PM (IST)

    AUS vs IND Live Score: ऑस्ट्रेलियाला तिसरा धक्का, ग्लेन मॅक्सवेल माघारी

    कुलदीप यादवने ग्लेन मॅक्सवेलला क्लिन बोल्ड करत ऑस्ट्रेलियाला तिसरा धक्का दिला आहे. ग्लेनने 12  बॉलमध्ये 20 धावा केल्या.

  • 24 Jun 2024 10:50 PM (IST)

    AUS vs IND Live Score: अक्षर पटेलची एकहाती सुपर कॅच, मिचेल मार्श आऊट

    अक्षर पटेलने शानदार कॅच घेत टीम इंडियासाठी डोकेदुखी ठरत असलेली मिचेल मार्श आणि ट्रेव्हिस हेड ही जोडी फोडली आहे. कुलदीप यादव याच्या बॉलिंगवर अक्षरने बाउंड्री लाईनवर कडक कॅच घेतला. मिचेल मार्श 28 बॉलमध्ये 37 धावा करुन आऊट झाला.

  • 24 Jun 2024 10:36 PM (IST)

    AUS vs IND Live Score: ऑस्ट्रेलियाच्या पावरप्लेमध्ये 65 धावा

    ऑस्ट्रेलियाने पहिल्या 6 ओव्हरमध्ये 1 विकेट गमावून 65 धावा केल्या आहेत. मिचेल मार्श आणि ट्रेव्हिस हेड ही जोडी नाबाद खेळत आहे. तर डेव्हिड वॉर्नरच्या रुपात ऑस्ट्रेलियाने एकमेव विकेट गमावली आहे.

  • 24 Jun 2024 10:10 PM (IST)

    AUS vs IND Live Score: डेव्हिड वॉर्नर आऊट

    टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला पहिला झटका दिला आहे. अर्शदीप सिंहने डेव्हिड वॉर्नरला स्लीपमध्ये सूर्यकुमार यादव याच्या हाती कॅच आऊट केलं.

  • 24 Jun 2024 10:07 PM (IST)

    AUS vs IND Live Score: ऑस्ट्रेलियाची बॅटिंग सुरु, हेड-वॉर्नर मैदानात

    ऑस्ट्रेलियाच्या बॅटिंगला सुरुवात झाली आहे. ट्रेव्हिस हेड आणि डेव्हिड वॉर्नर ही सलामी जोडी मैदानात  आली आहे. टीम इंडियाने कांगारुंना विजयासाठी 206 धावांचं आव्हान दिलं आहे.

  • 24 Jun 2024 10:01 PM (IST)

    AUS vs IND Live Score: टीम इंडियाची जोरदार बॅटिंग, ऑस्ट्रेलियासमोर 206 रन्सचं टार्गेट

    टीम इंडियाने ऑस्ट्रेलियासमोर 206 धावांचं आव्हान ठेवलं आहे. भारताने 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्सच्या मोबदल्यात 205 धावा केल्या. टीम इंडियासाठी कॅप्टन रोहित शर्माने सर्वाधिक 92 धावांचं योगदान दिलं. तर ऋषभ पंत, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या आणि रवींद्र जडेजा या फलंदाजांनी अनुक्रमे 15, 31, 28, 27* आणि 9* अशा धावा केल्या.

  • 24 Jun 2024 09:46 PM (IST)

    AUS vs IND Live Score: शिवम दुबे माघारी

    टीम इंडियाने पाचवी विकेट गमावली आहे. शिवम दुबे 28 धावा करुन आऊट झाला.

  • 24 Jun 2024 09:27 PM (IST)

    AUS vs IND Live Score: टीम इंडियाला चौथा धक्का

    टीम इंडियाने चौथी विकेट गमावली आहे. सूर्यकुमार यादवने 16 बॉलमध्ये 31 धावा केल्या.

  • 24 Jun 2024 09:15 PM (IST)

    AUS vs IND Live Score: रोहितच्या अनमोल खेळीचा अंत

    रोहित शर्माच्या झंझावाती आणि विस्फोटक खेळीचा अंत झाला आहे. रोहित शर्मा 41 बॉलमध्ये 92 धावा करुन आऊट झाला. रोहितने 8 सिक्स आणि 7 फोर ठोकले.

  • 24 Jun 2024 08:55 PM (IST)

    AUS vs IND Live Score: ऋषभ पंत आऊट

    टीम इंडियाने दुसरी विकेट गमावली आहे. ऋषभ पंत 14 बॉलमध्ये 15 धावा करुन आऊट झाला आहे.

  • 24 Jun 2024 08:37 PM (IST)

    AUS vs IND Live Score: रोहित शर्माचं विस्फोटक अर्धशतक, 19 बॉलमध्ये फिफ्टी

    रोहित शर्माने ऑस्ट्रेलिया विरुद्ध विस्फोटक अर्धशतक ठोकलंय. रोहितने 19 बॉलमध्ये 5 सिक्स आणि 4 चौकारांच्या मदतीने आणि 263.16 च्या स्ट्राईक रेटने ही फिफ्टी केलीय.

  • 24 Jun 2024 08:33 PM (IST)

    AUS vs IND Live Score: रोहित-पंत मैदानात, सामना सुरु

    टीम इंडिया-ऑस्ट्रेलिया सामन्याला पावसाच्या व्यत्ययानंतर पुन्हा सुरुवात झाली आहे. रोहित शर्मा आणि ऋषभ पंत जोडी मैदानात आली आहे.

  • 24 Jun 2024 08:26 PM (IST)

    AUS vs IND Live Score: पावसाची एन्ट्री, खेळ थांबला

    टीम इंडिया-ऑस्ट्रेलिया सामन्यात पावसाने एन्ट्री घेतली आहे. त्यामुळे खेळ थांबला आहे. टीम इंडियाने 4.1 ओव्हरमध्ये 1 विकेट गमावून 43 धावा केल्या आहेत.

  • 24 Jun 2024 08:19 PM (IST)

    AUS vs IND Live Score: रोहितकडून मिचेल स्टार्कची धुलाई, ठोकल्या 29 धावा

    टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्माने मिचेल स्टार्कला डावातील तिसऱ्या ओव्हरमध्ये झोडून काढला आहे. रोहितने स्टार्कच्या ओव्हरमध्ये 29 धावा मिळवल्या. रोहितने या ओव्हरमध्ये 4 सिक्स आणि 1 फोर मारला. तर 1 धाव वाईडच्या माध्यमातून मिळाली.

  • 24 Jun 2024 08:10 PM (IST)

    AUS vs IND Live Score: टीम इंडियाला ‘विराट’ धक्का

    टीम इंडियाने पहिलीच आणि मोठी विकेट गमावली आहे. विराट कोहली डावातील दुसऱ्या ओव्हरमध्येच जोश हेझलवूडच्या बॉलिंगवर झिरोवर आऊट झाला. टीम डेव्हिड याने 26 मीटर धावत कॅच घेताला.

  • 24 Jun 2024 08:07 PM (IST)

    AUS vs IND Live Updates: टीम इंडियाच्या बॅटिंगला सुरुवात

    ऑस्ट्रेलिया टीम इंडिया सामन्यााला सुरुवात झाली आहे. ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून टीम इंडियाला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे.  टीम इंडियाकडून  कॅप्टन रोहित शर्मा आणि विराट कोहली ही सलामी जोडी मैदानात आहे.

  • 24 Jun 2024 07:44 PM (IST)

    AUS vs IND Live Updates: ऑस्ट्रेलिया प्लेइंग ईलेव्हन

    ऑस्ट्रेलिया प्लेइंग ईलेव्हन: मिचेल मार्श (कॅप्टन), ट्रॅव्हिस हेड, डेव्हिड वॉर्नर, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, टिम डेव्हिड, मॅथ्यू वेड (विकेटकीपर), पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, ॲडम झाम्पा आणि जोश हेझलवूड.

  • 24 Jun 2024 07:43 PM (IST)

    AUS vs IND Live Updates: टीम इंडिया अनचेंज

    टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कॅप्टन), विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग आणि जसप्रीत बुमराह.

  • 24 Jun 2024 07:43 PM (IST)

    AUS vs IND Live Updates: ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकला

    ऑस्ट्रेलियाने टीम इंडिया विरुद्ध टॉस जिंकला आहे. कॅप्टन मिचेल मार्श याने टीम इंडिया विरुद्ध फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे.

  • 24 Jun 2024 07:10 PM (IST)

    AUS vs IND Live Updates: ऑस्ट्रेलिया टीम

    मिचेल मार्श (कॅप्टन), ॲश्टन आगर, पॅट कमिन्स, टीम डेव्हिड, नॅथन एलिस, कॅमेरॉन ग्रीन, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, ग्लेन मॅक्सवेल, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉइनिस, मॅथ्यू वेड, डेव्हिड वॉर्नर आणि एडम झाम्पा.

  • 24 Jun 2024 07:10 PM (IST)

    AUS vs IND Live Updates: टीम इंडिया

    रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, संजू सॅमसन, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.

  • 24 Jun 2024 07:08 PM (IST)

    AUS vs IND Live Updates: सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

    ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील सुपर 8 मधील सामन्याला रात्री 8 वाजता सुरुवात होणार आहे. तर 7 वाजून 30 मिनिटांनी टॉस होणार आहे. या सामन्यासाठी क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे.

  • 24 Jun 2024 07:05 PM (IST)

    AUS vs IND Live Updates: टीम इंडियाकडे वचपा घेण्याची संधी

    टीम इंडियाकडे ऑस्ट्रेलियाला पराभूत करुन टी 20 वर्ल्ड कपमधून बाहेर करण्यासह वचपा घेण्याची संधी आहे. याच ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला गेल्या वर्षी वनडे वर्ल्ड कप 2023 फायनलमध्ये पराभूत केलं होतं. आता या सुपर 8 मधील सामन्यात पराभूत करत कांगारुंना ऑस्ट्रेलियाला पाठवावं, अशी भारतीय चाहत्यांची इच्छा आहे.

Published On - Jun 24,2024 7:02 PM

Follow us
शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आजच होणार जाहीर, संजय शिरसाट म्हणाले...
शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आजच होणार जाहीर, संजय शिरसाट म्हणाले....
शरद पवारांच्या NCPकडून एबी फॉर्मचं वाटप सुरू, 3 जणांची उमेदवारी फिक्स
शरद पवारांच्या NCPकडून एबी फॉर्मचं वाटप सुरू, 3 जणांची उमेदवारी फिक्स.
झिशान सिद्दीकी वांद्रे पूर्व मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात
झिशान सिद्दीकी वांद्रे पूर्व मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात.
'राऊतांना झोपताना झाडं अन् उठताना डोंगर...', शहाजी बापूंचं प्रत्युत्तर
'राऊतांना झोपताना झाडं अन् उठताना डोंगर...', शहाजी बापूंचं प्रत्युत्तर.
उन्मेष पाटलांना उमेदवारी, ठाकरे गटाकडून होणार अधिकृत घोषणा?
उन्मेष पाटलांना उमेदवारी, ठाकरे गटाकडून होणार अधिकृत घोषणा?.
अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या 'या' नेत्यानं घेतली ठाकरेंची 'मशाल' हाती
अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या 'या' नेत्यानं घेतली ठाकरेंची 'मशाल' हाती.
अमोल मिटकरींना उमेदवारी मिळणार की नाही?, अजितदादांनी तडकाफडकी बोलावलं
अमोल मिटकरींना उमेदवारी मिळणार की नाही?, अजितदादांनी तडकाफडकी बोलावलं.
'भाई को उडा देंगे, 5 करोड दे दो..', म्हणणारा आता म्हणतो, सलमान भाईजान
'भाई को उडा देंगे, 5 करोड दे दो..', म्हणणारा आता म्हणतो, सलमान भाईजान.
'ते 5 कोटी शहाजी बापूंचे? एकच गाडी सापडली अशा..',रोहित पवारांचा निशाणा
'ते 5 कोटी शहाजी बापूंचे? एकच गाडी सापडली अशा..',रोहित पवारांचा निशाणा.
'भाजपच्या यादीत धक्कातंत्र नव्हतं पण आमची यादी...', कोणाचा गौप्यस्फोट?
'भाजपच्या यादीत धक्कातंत्र नव्हतं पण आमची यादी...', कोणाचा गौप्यस्फोट?.