AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ENG vs IND : इंग्लंडने टॉस जिंकला, भारताची बॅटिंग, कर्णधार बदलला, प्लेइंग ईलेव्हनमध्ये 3 बदल, बुमराहबाबत मोठा निर्णय

England vs India 5th Test Toss And Playing 11 : अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी टेस्ट सीरिजमधील पाचव्या आणि अंतिम कसोटी सामन्यासाठी इंग्लंड आणि टीम इंडिया दोन्ही संघांनी प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल केले आहेत.

ENG vs IND : इंग्लंडने टॉस जिंकला, भारताची बॅटिंग, कर्णधार बदलला, प्लेइंग ईलेव्हनमध्ये 3 बदल, बुमराहबाबत मोठा निर्णय
Ben Stokes and Shubman Gill IND vs ENG TestImage Credit source: Bcci
| Updated on: Jul 31, 2025 | 3:50 PM
Share

इंग्लंड विरुद्ध इंडिया यांच्यातील पाचवा आणि अंतिम कसोटी सामना हा लंडनमधील केनिंग्टन ओव्हलमध्ये आयोजित करण्यात आाला आहे. इंग्लंड या मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे. त्यामुळे इंग्लंडला हा सामना बरोबरीत राखल्यानंतरही मालिका विजयाची संधी आहे. तर दुसऱ्या बाजूला भारतासाठी हा सामना करो या मरो असा आहे. इंग्लंडला मालिका जिंकण्यापासून रोखायचं असेल तर भारताला कोणत्याही स्थितीत हा सामना जिंकणं महत्त्वाचं आहे. या सामन्याला भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर 3 वाजता टॉस होणं अपेक्षित होतं. मात्र पावसामुळे टॉसला 4 मिनिटं विलंब झाला. दुपारी 3 वाजून 4 मिनिटांनी टॉस झाला. इंग्लंडच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. कर्णधार ओली पोप याने फिल्डिंगचा निर्णय घेत भारताला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे.

इंग्लंडचा कर्णधार आऊट

इंग्लंड आणि टीम इंडिया दोन्ही संघांनी या पाचव्या सामन्यासाठी अंतिम 11 मध्ये भरभरुन बदल केले आहेत. या पैकी काही बदल हे दुखापतीमुळे करण्यात आले आहेत. इंग्लंडने सामन्याच्या 24 तासांआधीच प्लेइंग ईलेव्हन जाहीर केली होती. त्यानुसार नियमित कर्णधार बेन स्टोक्स याला खांद्याच्या दुखापतीमुळे पाचव्या सामन्यातून बाहेर व्हावं लागलं आहे.त्यामुळे स्टोक्सच्या जागी ओली पोप हा या सामन्यात इंग्लंडच्या नेतृत्वाची धुरा सांभाळणार आहे.

तसेच इंग्लंडने स्टोक्स व्यतिरिक्त वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर, लियाम डॉसन आणि ब्रायडन कार्स या तिघांना डच्चू दिला आहे. इंग्लंडने जेकब बेथेल, गस एटकीन्सन, जेमी ओव्हरटन आणि जोश टंग यांना संधी दिली आहे.

टीम इंडियातही 4 बदल

दरम्यान भारतीय संघाच्या अंतिम 11 मध्ये 4 बदल करण्यात आले आहेत. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याला वर्कलोड मॅनजमेंटनुसार विश्रांती देण्यात आली आहे. बुमराहच्या जागी प्रसिध कृष्णा याला संधी देण्यात आली आहे. प्रसिधचं यासह कमबॅक झालं. करुण नायर याचंही कमबॅक झालंय.  ऋषभ पंत याच्या जागी ध्रुव जुरेल याचा समावेश करण्यात आला आहे. तर अंशुल कंबोज याला डच्चू देत आकाश दीपला संधी देण्यात आली आहे.

इंग्लंड टॉसचा बॉस

पाचव्या कसोटीसाठी इंग्लंड प्लेइंग ईलेव्हन : झॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप (कर्णधार), जो रूट, हॅरी ब्रूक, जेकब बेथेल, जेमी स्मिथ (विकेटकीपर), क्रिस वोक्स, गस एटकिन्सन, जेमी ओव्हरटन आणि जोश टंग.

टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, शुबमन गिल (कर्णधार), करुण नायर, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, आकाश दीप, प्रसिध कृष्णा आणि मोहम्मद सिराज.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.