AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 World Cup : अ गटात भारतच टॉपला असणार, जरी दोन नंबरला राहिला तरी! जाणून घ्या आयसीसीचा नियम

टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील अ गटातून भारताने सुपर 8 फेरीत क्वॉलिफाय केलं आहे. आता या गटात भारतीय संघ दुसऱ्या स्थानी आला तरी टॉप असल्याचं गणलं जाईल. अजूनही या फेरीतील सामने होणार असून उलथापालथ होऊ शकते. भारतीय संघाची दुसऱ्या स्थानावर घसरण होऊ शकते. मात्र असं असलं तरी भारताला अव्वल संघ म्हणून गृहीत धरलं जाईल. का आणि कशासाठी आयसीसीचा नियम समजून घ्या

T20 World Cup : अ गटात भारतच टॉपला असणार, जरी दोन नंबरला राहिला तरी! जाणून घ्या आयसीसीचा नियम
| Updated on: Jun 14, 2024 | 5:06 PM
Share

टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील सुपर 8 फेरीत धडक मारण्यासाठी संघांमध्ये चढाओढ सुरु झाली आहे. जय पराजयाच्या गणितावर पुढचं सर्व चित्र स्पष्ट होणार आहे. अ गटात भारतासोबत पाकिस्तान, अमेरिका, आयर्लंड आणि कॅनडा हे संघ आहेत. या गटातून भारताने सुरुवातीचे तीन सामने जिंकून सुपर 8 फेरीतील स्थान निश्चित केलं आहे. तर दुसऱ्या संघासाठी अजूनही चार संघांमध्ये चुरस आहे. त्यामुळे या गटातून टॉप संघात उलथापालथ होण्याची शक्यता आहे. मोठा उलटफेर झाल्यास भारताची दुसऱ्या स्थानावर घसरण होऊ शकते. मात्र असं असलं तरी भारतीय संघाला अव्वल संघ म्हणूनच गणलं जाईल. आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळाने क्रमवारीच्या आधारे पहिल्या फेरीसाठी पाच संघांचे चार गट केले आहे. असंच गणित सुपर 8 फेरीसाठी असणार आहे. त्यामुळे एखाद्या संघाने खराब कामगिरी केली तरीही वेळापत्रकात फारसा बदल होणार नाही.

आयसीसी क्रमवारीनुसार, अ गटात भारत हा अव्वल संघ आहे. तर पाकिस्तान, आयर्लंड, कॅनडा आणि अमेरिका हे संघ दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर आहेत. त्यामुळे या गटात भारताची घसरण खालच्या क्रमांकावर झाली तरी अव्वल मानला जाईल. पाकने गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले तरी त्या संघाला दुसऱ्या स्थानावरील संघ म्हणून गणला जाईल.

भारत सुपर 8 फेरीसाठी पात्र ठरला असून 20 जून रोजी अफगाणिस्तानविरुद्ध म्हणजेच क गटातील दुसऱ्या संघासोबत खेळेल. ड गटातील दुसऱ्या संघासोबत भारताचा सामना 22 जूनला आहे. पण अजूनही दुसऱ्या क्रमांकाचा संघ काही ठरलेला नाही. तर या गटातून दक्षिण अफ्रिका संघ पात्र ठरला असून अव्वल स्थानीच राहणार आहे. तर भारताचा 24 जूनचा सामना ऑस्ट्रेलियासोबत असल्याचं निश्चित आहे. ब गटात क्रमवारीनुसार इंग्लंड हा संघ अव्वल स्थानी आहे. जर इंग्लंडचा संघ क्वॉलिफाय होण्यास अपयशी ठरला तर स्कॉटलँड संघाला अव्वल धरलं जाईल.

सुपर 8 फेरीत एकूण दोन गट असणार आहे. या गटात अ आणि ब गटातील टॉप टीम असतील. तर दुसऱ्या गटात क आणि ड गटातील टॉप संघ असतील. हे संघ आपल्यात गटात प्रत्येकी तीन सामने खेळतील. प्रत्येक गटातील अव्वल स्थानी असलेले दोन संघ उपांत्य फेरीत स्थान मिळवतील.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.