Marathi News » Sports » Cricket news » Ind vs sl sri lanka spinner praveen jayawickrama injured 2nd day bengaluru day night test
IND vs SL: दुसऱ्या कसोटीत श्रीलंकेवर संकटांचा डोंगर, अव्वल फिरकी गोलंदाजाला दुखापत, पहिल्या डावात घेतल्या होत्या तीन विकेट
भारत दौऱ्यावर आलेला श्रीलंकन संघ आपल्या खेळाडूंच्या फिटनेसच्या समस्येने हैराण आहे. टी 20 सीरीज दरम्यान आणि त्याआधी श्रीलंकेच्या काही प्रमुख खेळाडूंना दुखापत झाली.
भारत दौऱ्यावर आलेला श्रीलंकन संघ आपल्या खेळाडूंच्या फिटनेसच्या समस्येने हैराण आहे. टी 20 सीरीज दरम्यान आणि त्याआधी श्रीलंकेच्या काही प्रमुख खेळाडूंना दुखापत झाली. बंगळुरुत सुरु असलेल्या कसोटी सामन्या दरम्यान फिरकी गोलंदाज जयविक्रमा दुखापतग्रस्त झाला आहे. यामुळे श्रीलंकन कर्णधार दिमुथ करुणारत्नेच्या अडचणी वाढल्या आहेत. (Photo: File/AFP)
1 / 4
आज रविवारी दुसऱ्या दिवशी भारताचा दुसरा डाव सुरु आहे. रोहित शर्माने मारलेला फटका जयविक्रमाने रोखला. या दरम्यान त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली. त्यामुळे त्याला प्रचंड वेदना होत होत्या. श्रीलंकन टीमच्या फिजियोने जयाविक्रमाची तपासणी केली व त्याला मैदानाबाहेर नेण्याचा निर्णय घेतला. दोन खेळाडूंच्या मदतीने जयविक्रमा पॅव्हेलियनच्या पायऱ्या चढत होता. (Photo: BCCI)
2 / 4
डावखुरा फिरकी गोलंदाज जयविक्रमाला दुखापत झाल्याने श्रीलंकेचा गोलंदाजीचा एक पर्याय कमी झाला आहे. जयविक्रमाने पहिल्या डाव्यात भारताच्या महत्त्वाच्या विकेट काढल्या होत्या. हनुमा विहारी आणि श्रेयस अय्यरसह तीन विकेट काढल्या होत्या. (Photo: BCCI)
3 / 4
या कसोटी मालिकेदरम्यान दुखापत झालेला जयविक्रमा एकमेव खेळाडू नाहीय. मोहाली कसोटी दरम्यान वेगवान गोलंदाज लाहिरु कुमाराला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली. त्यानंतर तो या मालिकेत खेळू शकला नाही. बंगळुरु कसोटीच्या दोन दिवस आधी पाठिच्या दुखण्यामुळे पाथुम निसांकानेही माघार घेतली. (Photo: BCCI)