IND vs ENG 1st Test Day 5 Live: पावसामुळे पाचव्या दिवसाचा खेळ रद्द, पहिली कसोटी अनिर्णित

| Updated on: Aug 12, 2021 | 4:14 PM

India vs England 1st Test Day 5 Live Score: भारत आणि इंग्लंड यांच्यात नॉटिंगहॅम इथे सुरु असलेला पहिला कसोटी सामना चांगल्याच रंगतदार स्थितीत पोहचला आहे. भारताची फलंदाजी सुरु आहे.

IND vs ENG 1st Test Day 5 Live: पावसामुळे पाचव्या दिवसाचा खेळ रद्द, पहिली कसोटी अनिर्णित
भारत विरुद्ध इंग्लंड

IND vs ENG 1st Test Day 5 : भारत आणि इंग्लंड या संघात नॉटिंगहॅममध्ये सुरू असलेल्या पहिल्या कसोटीचा पाचवा दिवस पावसामुळे वाया गेला. त्यामुळे ही कसोटी अनिर्णीत सुटली आहे. सामन्याच्या पाचव्या आणि अखेरच्या दिवशी भारताला विजयासाठी 98 षटकांमध्ये 157 धावांची आवश्यकता होती. परंतु पंचांनी आणि मॅच चहापानापर्यंत पाऊस ओसरण्याची वाट पाहिली. परंतु चहापानानंतर पाऊस ओसरण्याऐवजी त्याने अधिक जोर धरला. पाऊस थांबण्याची कोणतीही चिन्ह दिसत नसल्याने पंचांनी सामना न खेळवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे उभय संघांमधील पहिला कसोटी अनिर्णित सुटली आहे. दरम्यान, पहिल्या डावात अर्धशतक आणि दुसऱ्या डावात शतक ठोकणाऱ्या जो रुटला सामनावीराचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

Key Events

जो रुटला सामनावीराचा पुरस्कार

भारत आणि इंग्लंड संघांमधील पहिल्या कसोटी सामन्यात दोन्ही डावात भारताच्या गोलंदाजांनी प्रभावी गोलंदाजी केली. दोन्ही डावात इंग्लंडचा कर्णधार जो रुटव्यतिरिक्त कोणत्याही इंग्लिश फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. रुटने मात्र दोन्ही डावात खिंड लढवली. त्याने पहिल्या डावात अर्धशतककी (64) तर दुसऱ्या डावात शतकी (109) खेळी केली. सामना अनिर्णित सुटल्यानंतर रुटला दोन्ही डावातील चमकदार कामगिरीसाठी सामनावीराचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

बुमराहचा ‘पंच’

पहिल्या डावांक इंग्लंडला 183 धावांत सर्वबाद केल्यानंतर भारतीय गोलंदाजानी दुसऱ्या डावात मात्र खास कामगिरी केली नाही. पण अनुभवी आणि मुख्य गोलंदाज जसप्रीत बुमराहने सर्वात महत्त्वाच्या जो रुटच्या विकेटसह आणखी 4 इंग्लंडचे फलंदाज तंबूत धाडले. ज्यामुळे भारताला काही प्रमाणात कमी असे टार्गेट मिळाले आहे.

LIVE Cricket Score & Updates

The liveblog has ended.
  • 08 Aug 2021 08:58 PM (IST)

    पावसामुळे पाचव्या दिवसाचा खेळ रद्द, पहिली कसोटी अनिर्णित

    भारत आणि इंग्लंड या संघात नॉटिंगहॅममध्ये सुरू असलेल्या पहिल्या कसोटीचा पाचवा दिवस पावसामुळे वाया गेला. त्यामुळे ही कसोटी अनिर्णीत सुटली आहे.

  • 08 Aug 2021 07:31 PM (IST)

    काही मिनिटांच्या विश्रांतीनंतर पाऊस पुन्हा सुरु, खेळ सुरु होण्यास आणखी विलंब

    काही वेळ पाऊस थांबल्याने पंच आणि मॅच रेफ्री मैदान आणि खेळपट्टीची स्थिती पाहून आजच्या दिवसाचा खेळ सुरु करण्याच्या विचारात होते. परंतु पावसाने पुन्हा जोर धरल्याने पुन्हा एकदा अडचणी वाढल्या आहेत.

  • 08 Aug 2021 06:52 PM (IST)

    पाऊस थांबला, निरीक्षण करुन सामन्याला करणार सुुरवात

    नॉटिंघममध्ये सुरु असलेल्या पावसामुळे भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामन्याला मोठा विलंब होत आहे. मात्र नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार पाऊस थांबला असून 7 च्या दरम्यान पंच मैदानात जाऊन निरीक्षण करणार आहेत.

  • 08 Aug 2021 05:22 PM (IST)

    पहिलं सेशन संपूर्ण पाण्यात

    नॉटिंघममध्ये पाचव्या दिवशीचा खेळ पावसामुळे अजूनही सुरु झालेला नाही. पहिल्या सेशनता संपूर्ण खेळ पावसामुळे वाया गेलेला आहे. त्यामुळे निर्धारीत वेळेआधी अर्धा तास लंच ब्रेक घेण्यात आला आहे. अजूनही जोरदार पाऊस सुरु आहे. त्यामुळे सामना कधी सुरु होणार याबाबत काहीच सांगता येणार नाही.

  • 08 Aug 2021 04:49 PM (IST)

    IND vs ENG : सामन्याला मोठा विलंब

    भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या दिवशीच्या खेळाला अजूनही सुरुवात झालेली नाही. पावसाने मैदानात तंबू ठोकल्याने खेळाला मोठा विलंब होत आहे.

  • 08 Aug 2021 03:19 PM (IST)

    IND vs ENG : पाचव्या दिवसावर पावसाचं संकट

    भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या दिवशीचा खेळ सुरु होण्यासाठी काही मिनिटं शिल्लक आहेत. मात्र पावसाची रिपरीप अजूनही थांबली नसल्याने सामना वेळेवर सुरु होणार नाही अशीच चिन्हे दिसत आहेत.

  • 08 Aug 2021 03:05 PM (IST)

    भारतीय फलंदाज विजयासाठी आतुर

    पहिल्या डावातील भारताच्या 95 धावांच्या आघाडीमुळे भारताला सामना जिंकण्यासाठी 209 धावांचेच लक्ष्य होते. त्यातील 52 धावा भारताने केल्यामुळे विजयासाठी आता केवळ भारताला 157 धावांचे लक्ष्य आहे. सोबतच हातात 9 विकेटही असल्याने भारती फलंदाज विजयासाठी आतुर झाले आहेत.

  • 08 Aug 2021 03:01 PM (IST)

    पाचव्या दिवशीच्या खेळावरही पावसांच संकट

    भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या दिवशीचा खेळ सुरु होण्यास काही वेळ शिल्लक असताना मैदानावर काळे ढग आले आहेत. दाट पावसाची शक्यता असून रिमझीम सरी बरसत देखील आहेत.

Published On - Aug 08,2021 2:57 PM

Follow us
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.
तिढा सुटला,रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या उमेदवारीवर सामंतांकडून मोठा निर्णय
तिढा सुटला,रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या उमेदवारीवर सामंतांकडून मोठा निर्णय.
राणा दाम्पत्य अडसूळ कुटुंबीयांच्या घरी, नवनीत राणांना पाठिंबा मिळणार?
राणा दाम्पत्य अडसूळ कुटुंबीयांच्या घरी, नवनीत राणांना पाठिंबा मिळणार?.
महायुतीत जागांचा तिढा सुटला, कुणाला कुठं मिळणार लोकसभेचं तिकीट?
महायुतीत जागांचा तिढा सुटला, कुणाला कुठं मिळणार लोकसभेचं तिकीट?.