LSG vs DC, Live Score, IPL 2022: आयुष बदोनीचा षटकार, लखनौची विजयाची Hattrick

| Updated on: Apr 08, 2022 | 12:18 AM

Lucknow super giants vs Delhi capitals in Marathi: दिल्लीचा कॅप्टन ऋषभ पंत आहे, तर लखनौची कॅप्टनशिप केएल राहुलकडे आहे.

LSG vs DC, Live Score, IPL 2022:  आयुष बदोनीचा षटकार, लखनौची विजयाची Hattrick
लखनौ सुपर जायंट्स वि दिल्ली कॅपिटल्स

IPL 2022 मध्ये आज दिल्ली कॅपिटल्स आणि लखनौ सुपर जायंट्समध्ये (DC VS LSG) सामना झाला. लखनौ सुपर जायंट्सने विजयाची हॅट्ट्रिक केली. चेन्नई सुपर किंग्स, सनरायजर्स हैदराबाद नंतर लखनौ सुपर जायंट्सने आज दिल्ली कॅपिटल्सला हरवलं. शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात आयुष्य बदोनीने (Ayush Badoni) षटकार ठोकून लखनौच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. शार्दुल ठाकूर अखेरच षटक टाकत होता. सामना रंगतदार स्थितीत असताना आयुषने चौकार-षटकार ठोकून लखनौला तिसरा विजय मिळवून दिला. 6 विकेट आणि दोन चेंडू राखून विजय मिळवला. दिल्लीने विजयासाठी 150 धावांचे लक्ष्य दिले होते. लखनौने चार बाद 155 धावा केल्या. या विजयामुळे लखनौचा आत्मविश्वास उंचावला आहे. दिल्लीच्या संघातून आज एनरिच नॉर्खिया आणि डेविड वॉर्नर हे मोठे खेळाडू खेळले.

Key Events

लखनौने जिंकला टॉस

लखनौ सुपर जायंट्सचा कॅप्टन के.एल.राहुलने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. दिल्ली कॅपिटल्सची टीम प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरणार आहे.

पॉइंटस टेबलची स्थिती काय?

दिल्ली कॅपिटल्सची टीम एक विजय आणि एका पराभवासह सातव्या स्थानावर आहे. लखनौची टीम तीन सामन्यात दोन विजयांसह पाचव्या स्थानावर आहे.

LIVE Cricket Score & Updates

The liveblog has ended.
  • 07 Apr 2022 11:37 PM (IST)

    लखनौची विजयाची Hattrick

    लखनौ सुपर जायंट्सने विजयाची हॅट्ट्रिक केली. चेन्नई सुपर किंग्स, SRH नंतर LSG ने आज दिल्ली कॅपिटल्सला हरवलं. शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात आयुष्य बदोनीने षटकार ठोकून लखनौच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. शार्दुल ठाकूर अखेरच षटक टाकत होता. सामना रंगतदार स्थितीत असताना आयुषने चौकार-षटकार ठोकून लखनौला तिसरा विजय मिळवून दिला. 6 विकेट आणि दोन चेंडू राखून विजय मिळवला. दिल्लीने विजयासाठी 150 धावांचे लक्ष्य दिले होते. लखनौने चार बाद 155 धावा केल्या.

  • 07 Apr 2022 11:29 PM (IST)

    दीपक हुड्डा आऊट

    6 चेंडूत 5 धावांची गरज असताना दीपक हुड्डा मोठा फटका खेळताना कॅच आऊट झाला. शार्दुल ठाकूरने त्याची विकेट काढली. दीपकने 11 धावा केल्या.

  • 07 Apr 2022 11:26 PM (IST)

    19 व्या ओव्हरमध्ये 14 धावा

    मुस्ताफिझूर रहमान टाकत असलेल्या 19 व्या ओव्हरमध्ये 14 धावा काढल्या. कृणाल पंड्याने एक षटकार ठोकला.

  • 07 Apr 2022 11:21 PM (IST)

    शार्दुलची टिच्चून गोलंदाजी

    शार्दुल ठाकूरने 18 व्या षटकात पाच धावा दिल्या. 12 बॉलमध्ये 19 रन्सची गरज

  • 07 Apr 2022 11:12 PM (IST)

    क्विंटन डि कॉक अखेर 80 धावांवर आऊट

    दमदार फलंदाजी करणारा क्विंटन डि कॉक अखेर 80 धावांवर आऊट झाला. कुलदीप यादवने त्याची विकेट काढली. 17 षटकात लखनौच्या तीन बाद 126 धावा झाल्या आहेत.

  • 07 Apr 2022 10:59 PM (IST)

    15 षटकात दोन बाद 111

    लखनौ सुपर जायंट्सच्या 15 षटकात दोन बाद 111 धावा झाल्या आहेत. क्विंटन डि कॉक 71 धावांवर आणि दीपक हुड्डा 6 धावांवर खेळतोय.

  • 07 Apr 2022 10:59 PM (IST)

    धोकादायक इविन लुइस आऊट

    धोकादायक इविन लुइस आऊट झाला आहे. पाच धावांवर ललित यादवने त्याला कुलदीप यादवकरवी झेलबाद केलं. क्विंटन डि कॉकने अर्धशतक पूर्ण केलं आहे. तो 53 धावांवर खेळतोय. दीपक हुड्डा मैदानात आला आहे. 13 षटकात दोन बाद 90 धावा झाल्या आहेत.

  • 07 Apr 2022 10:26 PM (IST)

    लखनौला पहिला झटका

    लखनौला पहिला झटका बसला आहे. कॅप्टन केएल राहुल OUT झाला आहे. कुलदीप यादवने राहुलला 24 धावांवर पृथ्वी शॉ करवी झेलबाद केलं. 10.2 षटकात लखनौच्या एक बाद 76 धावा झाल्या आहेत.

  • 07 Apr 2022 10:13 PM (IST)

    केएल राहुल - क्विंटन डि कॉकची दमदार फलंदाजी

    लखनौ सुपर जायंट्सच्या आठ ओव्हरमध्ये 62 धावा झाल्या आहेत. केएल राहुल 22 आणि क्विंटन डि कॉक 38 धावांवर खेळतोय.

  • 07 Apr 2022 10:00 PM (IST)

    पावरप्लेमध्ये लखनौच्या बिनबाद 48 धावा

    पावरप्लेमध्ये लखनौच्या बिनबाद 48 धावा झाल्या आहेत. राहुल 10 आणि क्विंटन डि कॉक 36 धावांवर खेळतो.

  • 07 Apr 2022 09:54 PM (IST)

    पाच षटकात लखनौच्या बिनबाद 44 धावा

    लखनौच्या डावाला सुरुवात झाली आहे. पाच षटकात लखनौच्या बिनबाद 44 धावा झाल्या आहेत. क्विंटन डि कॉक 35 आणि केएल राहुल 9 धावांवर खेळतोय. एनरिच नॉर्खियाच्या एका ओव्हरमध्ये 19 धावा निघाल्या. यात तीन चौकार आणि एक षटकार लगावला.

  • 07 Apr 2022 09:13 PM (IST)

    लखनौला विजयासाठी 150 धावांचे लक्ष्य

    डेथ ओव्हर्समध्ये लखनौच्या बॉलर्सनी चांगली गोलंदाजी केली. शेवटच्या दोन-तीन षटकात ऋषभ पंत आणि सर्फराझ खान या जोडीला मुक्तपणे फलंदाजी करु दिली नाही. निर्धारीत 20 षटकात दिल्लीच्या तीन बाद 149 धावा झाल्या आहेत. दिल्लीकडून सलामीवीर पृथ्वी शॉ ने सर्वाधिक 61 धावा केल्या. ऋषभने नाबाद 39 आणि सर्फराझने 36 नाबाद धावा केल्या.

  • 07 Apr 2022 09:08 PM (IST)

    19 व्या षटकात निघाल्या फक्त सहा धावा

    आवेश खानने टाकलेल्या 19 व्या षटकात फक्त सहा धावा. दिल्लीच्या तीन बाद 142 धावा. ऋषभ पंत 36 आणि सर्फराझ खान 33 धावांवर खेळतोय.

  • 07 Apr 2022 09:03 PM (IST)

    18 षटकात दिल्लीच्या तीन बाद 136 धावा

    18 षटकात दिल्लीच्या तीन बाद 136 धावा झाल्या आहेत. ऋषभ पंत 31 आणि सर्फराझ खान 32 धावांवर खेळतोय.

  • 07 Apr 2022 08:52 PM (IST)

    ऋषभ पंतची 16 व्या षटकात फटकेबाजी

    ऋषभ पंतने 16 व्या षटकात फटकेबाजी केली. दिल्लीच्या तीन बाद 117 धावा झाल्या आहेत. पंत 28 आणि सर्फराझ खान 21 धावांवर खेळतोय.

  • 07 Apr 2022 08:45 PM (IST)

    ऋषभ पंत-सर्फराज खानची जोडी मैदानात

    15 षटकात दिल्लीच्या तीन बाद 99 धावा झाल्या आहेत. ऋषभ पंत 12 आणि सर्फराज खान 16 धावांवर खेळतोय.

  • 07 Apr 2022 08:23 PM (IST)

    दिल्लीला तिसरा झटका, आक्रमक रोव्हमॅन पॉवेल बोल्ड

    दिल्लीची तिसरी विकेट गेली आहे. आक्रमक रोव्हमॅन पॉवेलला रवी बिश्नोईने तीन धावांवर बोल्ड केलं. 10.4 षटकात तीन बाद 74 धावा झाल्या आहेत.

  • 07 Apr 2022 08:12 PM (IST)

    दिल्लीला दुसरा झटका

    दिल्लीला दुसरा झटका बसला आहे. लखनौला मोठी विकेट मिळाली आहे. रवी बिश्नोईने अवघ्या चार रन्सवर डेविड वॉर्नरला आयुष बदोनीकरवी झेलबाद केलं. दिल्लीच्या 8.3 ओव्हर्समध्ये दोन बाद 69 धावा झाल्या आहेत.

  • 07 Apr 2022 08:08 PM (IST)

    अर्धशतक झळकावल्यानंतर पृथ्वी शॉ आऊट

    अर्धशतक झळकावल्यानंतर पृथ्वी शॉ आऊट झाला. 34 चेंडूत त्याने 61 धावा फटकावल्या. यात नऊ चौकार आणि दोन षटकार होते. फिरकी गोलंदाज कृष्णाप्पा गौतमने विकेटकिपर क्विंटन डि कॉक करवी पृथ्वीला झेलबाद केलं.

  • 07 Apr 2022 08:03 PM (IST)

    पृथ्वी शॉ ची हाफ सेंच्युरी

    लखनौ विरुद्ध पृथ्वी शॉ ने अर्धशतक झळकावलं आहे. त्याने 30 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. पृथ्वीने 8 चौकार आणि एक षटकार लगावला. दिल्लीच्या सात षटकात बिनबाद 57 धावा झाल्या आहेत.

  • 07 Apr 2022 08:00 PM (IST)

    पावरप्लेमध्ये दिल्लीची दमदार फलंदाजी

    पावरप्लेमध्ये दिल्लीच्या बिनाबाद 52 धावा झाल्या आहेत. पृथ्वी शॉ 47 आणि वॉर्नर तीन धावांवर खेळतोय.

  • 07 Apr 2022 07:51 PM (IST)

    पृथ्वी शॉ ची फटकेबाजी

    पृथ्वी शॉ फटकेबाजी करत आहे. दिल्लीला चांगली सुरुवात मिळाली आहे. चार षटकात दिल्लीच्या बिनबाद 40 धावा झाल्या आहेत. पृथ्वी शॉ 35 आणि वॉर्नर 3 धावांवर खेळतोय. पृथ्वी शॉ ने सहा चौकार आणि एक षटकार लगावला आहे.

  • 07 Apr 2022 07:44 PM (IST)

    जेसन होल्डरला लगावला चौकार आणि षटकार

    जेसन होल्डरच्या दुसऱ्याषटकात पृथ्वी शॉ ने एका चौकार आणि एक षटकार लगावला. तीन षटकात दिल्लीच्या 27 बिनबाद धावा झाल्या आहेत.

  • 07 Apr 2022 07:40 PM (IST)

    पृथ्वी शॉ-डेविड वॉर्नरची जोडी मैदानात

    दोन षटकात दिल्ली कॅपिटल्सच्या बिनाबाद 13 धावा झाल्या आहेत. पृथ्वी शॉ आणि डेविड वॉर्नरची जोडी मैदानात आहे. कृष्णाप्पा गौतमच्या दुसऱ्या षटकात दोन चौकार लगावले.

  • 07 Apr 2022 07:23 PM (IST)

    अशी आहे लखनौची Playing - 11

    केएल राहुल (कॅप्टन), क्विंटन डि कॉक, इविन लुइस, कृष्णप्पा गौतम, दीपक हुड्डा, आयुष बदोनी, कृणाल पंड्या, जेसन होल्डर, अँड्यू टाय, रवी बिश्नोई आणि आवेश खान,

  • 07 Apr 2022 07:17 PM (IST)

    अशी आहे दिल्ली कॅपिटल्सची Playing - 11

    ऋषभ पंत (कॅप्टन), पृथ्वी शॉ, डेविड वॉर्नर, सरफराज खान, रोव्हमॅन पॉवेल, ललित यादव, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, एनरिक नॉर्खिया आणि मुस्तफिजुर रहमान,

  • 07 Apr 2022 07:07 PM (IST)

    दिल्ली कॅपिटल्सच्या संघात आज तीन बदल

    दिल्ली कॅपिटल्सच्या संघात आज तीन बदल करण्यात आले आहेत. सायफर्ट, मनदीप आणि खलील यांच्याजागी डेविड वॉर्नर, सर्फराज आणि नॉर्खिया यांचा समावेश करण्यात आला आहे.

Published On - Apr 07,2022 7:04 PM

Follow us
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला.
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग.
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट.
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न.
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप.
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला.
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?.
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?.
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?.
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका.