AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PBKS vs RCB Score And Highlights IPL 2025 : आरसीबीची अंतिम फेरीत धडक, पंजाब किंग्सला 8 विकेटने लोळवलं

| Updated on: May 30, 2025 | 5:54 PM
Share

Punjab Kings vs Royal Challengers Bengaluru Score and IPL 2025 Qualifier 1 Match Highlights Updates in Marathi : आयपीएलच्या 18 व्या मोसमातील प्लेऑफमधील क्वालिफायर 1 सामन्यात पंजाब किंग्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुवर मात केली. आरसीबीने या विजयासह फायनलमध्ये धडक दिली. तर पराभवानंतरही पंजाबला फायनलसाठी आणखी एक संधी मिळणार आहे.

PBKS vs RCB Score And Highlights IPL 2025 : आरसीबीची अंतिम फेरीत धडक, पंजाब किंग्सला 8 विकेटने लोळवलं
PBKS vs RCB Qualifier 1 Live Score and Updates Ipl 2025Image Credit source: IPL/BCCI and Tv9

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने रजत पाटीदार याच्या नेतृत्वात पंजाब किंग्सवर धमाकेदार विजय मिळवत आयपीएल 2025 च्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. आरसीबीने पंजाबवर क्वालिफायर 1 सामन्यात एकतर्फी विजय मिळवला. आरसीबीच्या गोलंदाजांनी पंजाबला 20 ओव्हरही खेळू दिलं नाही. आरसीबीने पंजाबचं 14.1 ओव्हरमध्ये 101 धावांवर पॅकअप केलं. त्यानंतर पंजाबने फक्त 10 ओव्हरमध्ये 2 विकेट्स गमावून 106 धावा केल्या. पंजाबने यासह 2016 नंतर पहिल्यांदा आणि एकूण चौथ्यांदा अंतिम फेरीत धडक दिली. तर पंजाबला पराभवानंतरही अंतिम फेरीत पोहचण्यासाठी आणखी एक संधी मिळणार आहे. एलिमिनेटरमध्ये गुजरात विरुद्ध मुंबई यांच्यातील विजेत्या संघाविरुद्ध पंजाबचा क्वालिफायर 2 मध्ये लढत होणार आहे.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 29 May 2025 10:05 PM (IST)

    PBKS vs RCB Live Score, IPL 2025 : आरसीबीची अंतिम फेरीत धडक, पंजाब किंग्सला 8 विकेटने लोळवलं

    आरसीबीने क्वॉलिफायर 1 फेरीत पंजाब किंग्सचा 8 गडी राखून धुव्वा उडवला. प्रथम गोलंदाजी स्विकारली आणि पंजाब किंग्सला 101 धावांवर रोखलं. सोप आव्हान रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 2 गडी गमवून पूर्ण केलं. या सामन्यात फिल सॉल्टने जबरदस्त खेळी केली. त्याच्या खेळीच्या जोरावर हा विजय सोप झाला. या विजयासह आरसीबीने अंतिम फेरीत धडक मारली आहे. आता जेतेपदापासून एक विजय दूर आहे.

  • 29 May 2025 09:58 PM (IST)

    PBKS vs RCB Live Score, IPL 2025 : फिल सॉल्टची अर्धशतकी खेळी, आरसीबी विजयाच्या उंबरठ्यावर

    विराट कोहली बाद झाल्यानंतर सलामीला आलेल्या फिलिप सॉल्टने मोर्चा सांभाळला. त्याने 23 चेंडूत 5 चौकार आणि 3 षटकाराच्या मदतीने 50 धावा केल्या. त्यामुळे आरसीबीचा विजय निश्चित झाला आहे. पंजाब किंग्सचे गोलंदाज कमी धावा असल्याने विकेटसाठी हतबल झाले असून सामना हातून निसटला आहे.

  • 29 May 2025 09:56 PM (IST)

    PBKS vs RCB Live Score, IPL 2025 : मयंक अग्रवाल 19 धावा करून बाद

    आरसीबीला मयंक अग्रवालच्या रुपाने दुसरा धक्का बसला आहे. 19 धावा करून तंबूत परतला आहे. पण एका बाजूने फिल सॉल्ट फटकेबाजी करत असताना संघ विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. त्यामुळे विकेट गेली तर दडपण नाही.

  • 29 May 2025 09:46 PM (IST)

    PBKS vs RCB Live Score, IPL 2025 : पंजाब किंग्सला विकेटची गरज

    पंजाब किंग्सने विजयासाठी फक्त 101 धावांचं आव्हान दिलं आहे. त्यामुळे विकेटची खूपच गरज आहे. विराट कोहलीची विकेट पडल्यानंतर दुसऱ्या विकेटसाठी धडपड सुरु आहे. काइल जेमिसनने विकेटसाठी योग्य लेंथ शोधली आहे. तो त्याच्या नैसर्गिक टेस्ट मॅच लेंथ गोलंदाजी करत आहे. ज्यामुळे फलंदाज मयंक अग्रवालला षटकात पूर्णपणे गोंधळात टाकले आहे.

  • 29 May 2025 09:33 PM (IST)

    PBKS vs RCB Live Score, IPL 2025 : आरसीबीला पहिला धक्का, विराट कोहली धावा करून बाद

    पंजाब किंग्सने 101 धावांचं सोपं आव्हान दिलं आहे. हे आव्हान गाठताना विराट कोहली फक्त 12 धावा करून बाद झाला आहे. जेमिसनच्या गोलंदाजीवर विकेट टाकली.

  • 29 May 2025 09:17 PM (IST)

    PBKS vs RCB Live Score, IPL 2025 : विराट कोहली आणि फिल सॉल्ट जोडी मैदानात

    पंजाब किंग्सने विजयासाठी दिलेल्या 101 धावांचा पाठलाग करण्यासाठी विराट कोहली आणि फिल सॉल्ट ही जोडी मैदानात उतरली आहे. सोप स्कोअर असल्याने दोन्ही खेळाडूंवर फार काही दडपण दिसत नाही. पहिल्याच षटकात या दोघांनी 11 धावा काढल्या. त्यामुळे पंजाबच्या गोलंदाजांवर दडपण वाढलं आहे.

  • 29 May 2025 09:05 PM (IST)

    PBKS vs RCB Live Score, IPL 2025 : तीन विकेट घेतल्यानंतर सुयश शर्मा काय म्हणाला…

    सुयश शर्मा म्हणाला की, ‘आमच्या प्रशिक्षकाने सांगितलेली योजना प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न केला. आज गोलंदाजी करताना खूप चांगले वाटत होते. आज कोणीही माझे गुगली वाचू शकले नाही, असे मला वाटते. आम्ही फक्त तो एक सामान्य सामना मानण्याचा प्रयत्न केला, कधीही असे मानले नाही की आम्ही उपांत्य फेरीत खेळत आहोत. मी माझ्या गोलंदाजीवर खूप मेहनत घेतली आहे.’

  • 29 May 2025 08:55 PM (IST)

    PBKS vs RCB Live Score, IPL 2025 : पंजाब किंग्सच्या 101 धावांवर खेळ आटोपला

    पंजाब किंग्सच्या फलंदाजांनी आरसीबीच्या गोलंदाजांसमोर नांगी टाकली. 14.1 षटकं खेळत संपूर्ण संघ तंबूत परतला. पंजाब किंग्सला 101 धावा करता आल्या आणि विजयासाठी 102 धावांचं आव्हान दिलं आहे. पंजाब किंग्सकडून मार्कस स्टोयनिसने सर्वाधिक 26 धावा केल्या. जोश हेझलवूड आणि सुयश शर्माने प्रत्येकी 3 गडी बाद केले. कमी धावासंख्या असल्याने आरसीबीला अंतिम फेरी गाठण्याची सुवर्ण संधी आहे.

  • 29 May 2025 08:37 PM (IST)

    PBKS vs RCB Live Score, IPL 2025 : मार्कस स्टोयनिस आऊट, पंजाबला आठवा झटका

    आरसीबीने पंजाबला आठवा झटका दिला आहे. सूयश शर्मा याने मार्कस स्टोयनिस याला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला आहे. सूयशने मार्कसला क्लिन बोल्ड केलं. मार्कसने 17 बॉलमध्ये 2 सिक्स आणि 2 फोरसह 26 रन्स केल्या. स्टोयनिस मैदानात टिकून होता. त्यामुळे पंजाबला स्टोयनिसकडून अपेक्षा होती. मात्र सूयशने स्टोयनिसला आऊट करत त्याच्या खेळीचा द एन्ड केला.

  • 29 May 2025 08:25 PM (IST)

    PBKS vs RCB Live Score, IPL 2025 : पंजाबला सातवा झटका, मुशीर खान डक

    टीम इंडियाचा क्रिकेटर सर्फराज खान याचा भाऊ मुशीर खान आयपीएल पदार्पणात अपयशी ठरला आहे. मुशीर खान याला पंजाब अडचणीत सापडलेली असताना पंजाबकडून इमपॅक्ट प्लेअर म्हणून संधी मिळाली. मात्र मुशीरला पदार्पणात भोपळाही फोडता आला नाही. सूयश शर्मा याने मुशीरला एलबीडब्ल्यू आऊट केलं.

  • 29 May 2025 08:19 PM (IST)

    PBKS vs RCB Live Score, IPL 2025 : 6 आऊट 60, पंजाबला सहावा झटका, शशांक सिंह क्लिन बोल्ड,

    रॉयल चॅलेंजर्स बंगळुुरुने पंजाब किंग्सला सहावा झटका दिला आहे. सुयश शर्मा याने शशांक शर्मा याला नवव्या ओव्हरमधील दुसऱ्या बॉलवर क्लिन बोल्ड केलं. यासह पंजाबने सहावी विकेट गमावली. शशांकने 5 बॉलमध्ये 3 रन्स केल्या. त्यामुळे पंजाब आता 100 धावा तरी करेल का? अशी शंका उपस्थित केली जात आहे.

  • 29 May 2025 08:08 PM (IST)

    PBKS vs RCB Live Score, IPL 2025 : 5 आऊट 50, नेहल वढेरा आऊट, पंजाबची घसरगुंडी

    पंजाब किंग्सची क्वालिफायर 1 सामन्यात सपशेल घसरगुंडी झाली आहे. नेहल वढेरा आऊट झाल्याने पंजाबची 5 आऊट 50 अशी स्थिती झाली आहे. यश दयाल याने 7 व्या ओव्हरमधील तिसऱ्या बॉलवर नेहल वढेरा याला बोल्ड केलं. नेहलने 10 बॉलमध्ये 8 रन्स केल्या आणि मैदानाबाहेरचा रस्ता धरला.

  • 29 May 2025 08:02 PM (IST)

    PBKS vs RCB Live Score, IPL 2025 : पंजाबला चौथा धक्का, जोश इंग्लिस आऊट

    रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने पंजाब किंग्सला बॅकफूटवर ढकललं आहे. आरसीबीने पंजाबला पावरप्लेमध्ये चौथा झटका दिला आहे. जोश हेझलवूड याने पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यर याच्यानंतर जोश इंग्लिस याला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला आहे. जोश इंग्लिस याने 7 बॉलमध्ये 4 रन्स केल्या.

  • 29 May 2025 07:54 PM (IST)

    PBKS vs RCB Live Score, IPL 2025 : पंजाबला तिसरा झटका, कॅप्टन श्रेयस अय्यर आऊट

    रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या गोलंदाजांनी क्वालिफायर 1 सामन्यात अप्रतिम सुरुवात केली आहे. आरसीबीच्या गोलंदाजांनी प्रियांश आर्या आणि प्रभसिमरन सिंह या सलामी जोडीने झटपट आऊट केलं. त्यानंतर जोश हेझलवूड याने पंजाबला मोठा झटका दिला. हेझलवूड याने पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यर याला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. श्रेयस 2 रन्स करुन आऊट झाला.

  • 29 May 2025 07:51 PM (IST)

    PBKS vs RCB Live Score, IPL 2025 : प्रभसिमरन सिंह माघारी, पंजाबला दुसरा झटका

    पंजाब किंग्सची सलामी जोडी माघारी परतली आहे. प्रियांश आर्या आऊट झाल्यानंतर प्रभसिमरन सिंह हा देखील स्वस्तात आऊट झाला आहे. भुवनेश्वर कुमार याने प्रभसिमरनला विकेटकीपर जितेश शर्मा याच्या हाती कॅच आऊट केलं. प्रभसिमरन याने 10 बॉलमध्ये 18 रन्स केल्या. प्रभने या खेळीत 2 चौकार आणि 1 षटकार लगावला.

  • 29 May 2025 07:40 PM (IST)

    PBKS vs RCB Live Score, IPL 2025 : पंजाबला पहिला झटका, प्रियांश आर्या आऊट, आरसीबीची कडक सुरुवात

    प्रियांश आर्या आणि प्रभसिमरन सिंह ही सलामी जोडी पंजाबला चांगली सुरुवात करुन देण्यात अपयशी ठरले आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने पंजाबला दुसऱ्यचा ओव्हरमध्ये पहिला झटका दिला आहे. यश दयाल याने प्रियांश आर्याला आऊट केलं. प्रियांशने 5 बॉलमध्ये 7 रन्स केल्या आणि मैदानाबाहेरचा रस्ता धरला.

  • 29 May 2025 07:33 PM (IST)

    PBKS vs RCB Live Updates, IPL 2025 : सामन्याला सुरुवात, पंजाबची बॅटिंग, प्रभसिमरन आणि प्रियांश आर्या सलामी जोडी मैदानात

    पंजाब किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु क्वालिफायर 1 सामन्याला सुरुवात झाली आहे. आरसीबीने टॉस जिंकून पंजाबला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. पंजाबकडून प्रभसिमरन सिंह आणि प्रियांश आर्या ही सलामी जोडी मैदानात आली आहे. या सलामी जोडीकडून पंजाबला मोठ्या सलामी भागीदारीची आशा आहे. यात ही जोडी किती यशस्वी ठरते?  याकडे चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

  • 29 May 2025 07:25 PM (IST)

    PBKS vs RCB Live Updates, IPL 2025 : रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू इम्पॅक्ट सब्सटीट्यूड

    रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू इम्पॅक्ट सब्सटीट्यूड : मयंक अग्रवाल, रसिक सलाम, मनोज भंडागे, टीम सायफर्ट आणि स्वप्नील सिंग.

  • 29 May 2025 07:24 PM (IST)

    PBKS vs RCB Live Updates, IPL 2025 : पंजाब किंग्ज इम्पॅक्ट सब्सटीट्यूड

    पंजाब किंग्ज इम्पॅक्ट सब्सटीट्यूड : विजयकुमार वैशाख, प्रवीण दुबे, सूर्यांश शेडगे, मुशीर खान आणि झेवियर बार्टलेट.

  • 29 May 2025 07:08 PM (IST)

    PBKS vs RCB Live Updates, IPL 2025 : पंजाब किंग्सची प्लेइंग 11

    पंजाब किंग्स (प्लेइंग इलेव्हन): प्रियांश आर्य, प्रभसिमरन सिंग, जोश इंग्लिस (विकेटकीपर), श्रेयस अय्यर (कर्णधार), नेहल वढेरा, शशांक सिंग, मार्कस स्टॉइनिस, अजमतुल्ला ओमरझाई, हरप्रीत ब्रार, अर्शदीप सिंग, काइल जेमिसन.

  • 29 May 2025 07:07 PM (IST)

    PBKS vs RCB Live Updates, IPL 2025 : आरसीबीची प्लेइंग 11

    रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (प्लेइंग इलेव्हन): विराट कोहली, फिलिप सॉल्ट, रजत पाटीदार (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकीपर), रोमॅरियो शेफर्ड, क्रुणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, यश दयाल, जोश हेजलवुड, सुयश शर्मा.

  • 29 May 2025 07:06 PM (IST)

    PBKS vs RCB Live Updates, IPL 2025 : पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यर म्हणाला…

    श्रेयस अय्यर म्हणाला की, ‘मीही प्रथम गोलंदाजी केली असती. जर तुम्ही येथील रेकॉर्ड पाहिला तर, प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघांनी चांगली कामगिरी केली आहे, म्हणून मी आशावादी आहे. ते जबरदस्त आहेत आणि जेव्हा तुम्ही मैदानात प्रवेश करता तेव्हा तुम्हाला अशा प्रकारच्या कंपनाची आवश्यकता असते आणि ते आपल्याला खूप ऊर्जा देखील देते. मार्को बाहेर गेला असून त्याच्या जागी अझमतुल्लाह येतो.’

  • 29 May 2025 07:05 PM (IST)

    PBKS vs RCB Live Updates, IPL 2025 : आरसीबी कर्णधार रजत पाटीदार म्हणाला की..

    “आम्ही प्रथम गोलंदाजी करू. विकेट खूपच कठीण दिसत आहे, गवताने चांगले झाकलेले आहे आणि पहिल्या काही षटकांमध्ये जास्तीत जास्त खेळण्याचा प्रयत्न करू. गेल्या सामन्यात सर्वांनी 100 टक्के पेक्षा जास्त दिले, जितेश साल्ट आणि कोहली जबरदस्त होते. आमच्या संघात एक बदल आहे.”,  असं रजत पाटीदार म्हणाला.

  • 29 May 2025 07:03 PM (IST)

    PBKS vs RCB Live Updates, IPL 2025 : नाणेफेक जिंकत आरसीबीची गोलंदाजी, कर्णधार रजत पाटीदारचं कमबॅक

    आयपीएल क्वॉलिफायर 1 सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि पंजाब किंग्स यांच्यात होत आहे. नाणेफेकीचा कौल जिंकत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा कर्णधार रजत पाटीदारने प्रथम गोलंदाजी निवडली आहे. तर पंजाब किंग्सला प्रथम फलंदाजीचं निमंत्रण दिलं आहे.

  • 29 May 2025 06:51 PM (IST)

    PBKS vs RCB Live Updates, IPL 2025 : पंजाब आरसीबीला रोखणार का?

    रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने या मोसमात घराबाहेरील सर्व एकूण 7 सामने जिंकले आहेत. तर क्वालिफायर 1 सामना हा चंडीगढ येथे होत आहे. त्यामुळे पंजाबसमोर आरसीबीला या हंगामात घराबाहेरील आठवा सामना जिंकण्यापासून रोखण्याचं आव्हान असणार आहे. यात पंजाबला किती यश येतं? निकालानंतरच स्पष्ट होईल.

  • 29 May 2025 06:42 PM (IST)

    PBKS vs RCB Live Updates, IPL 2025 : कोण जिंकणार टॉस?

    पंजाब किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यातील सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. मात्र त्याआधी 7 वाजता होणारा टॉस कोण जिंकणार? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे. या सामन्यात टॉस फॅक्टर किती महत्त्वाचा ठरणार? कुणाच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

  • 29 May 2025 06:27 PM (IST)

    PBKS vs RCB Live Updates, IPL 2025 : विराटच्या कामगिरीकडे साऱ्यांचं लक्ष

    पंजाब किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु सामन्यात अनुभवी फलंदाज विराट कोहली याच्या कामगिरीकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे. आरसीबीला पहिल्या फेरीत अंतिम फेरी गाठायची असेल तर विराटची भूमिका निर्णायक ठरणार आहे. त्यामुळे विराट या सामन्यात किती धावा करतो? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. विराटने या 18 व्या मोसमातील 13 सामन्यांमध्ये 60.20 या सरासरीने आणि 147.91 स्ट्राईक रेटने 407 धावा केल्या आहेत.

  • 29 May 2025 06:12 PM (IST)

    PBKS vs RCB Live Updates, IPL 2025 : सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

    पंजाब किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर 7 वाजता टॉस होईल. सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल. तर जिओहॉटस्टार एपवर लाईव्ह मॅच पाहायला मिळेल.

  • 29 May 2025 05:59 PM (IST)

    PBKS vs RCB Live Updates, IPL 2025 : हेड टु हेड रेकॉर्ड्स

    आयपीएलच्या इतिहासात पंजाब किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आतापर्यंत एकूण 35 वेळा आमनेसामने आले आहेत. एका सामन्याचा अपवाद वगळता दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. पंजाबने 35 पैकी 18 सामने जिंकले आहेत. तर आरसीबीने 17 वेळा विजय मिळवला आहे. तसेच गेल्या 5 पैकी 4 सामन्यांमध्ये बंगळुरुने पंजाबवर विजय मिळवला आहे.

  • 29 May 2025 05:33 PM (IST)

    PBKS vs RCB Live Updates, IPL 2025 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू

    रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू टीम: फिलिप सॉल्ट, विराट कोहली, मयंक अग्रवाल, रजत पाटीदार (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकीपर), रोमॅरियो शेफर्ड, क्रुणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, यश दयाल, नुवान तुषारा, सुयश शर्मा, जोश हेजलवुड, टीम सेफर्ट, रसिक दार सलाम, मनोज भंडागे, स्वप्नील सिंग, ब्लेसिंग मुजारबानी, टीम डेव्हिड, मोहित राठी, स्वस्तिक चिकारा आणि अभिनंदन सिंग.

  • 29 May 2025 05:33 PM (IST)

    PBKS vs RCB Live Updates, IPL 2025 : पंजाब किंग्स संघ

    पंजाब किंग्स संघ: प्रियांश आर्य, प्रभसिमरन सिंग, जोश इंग्लिस (विकेटकीपर), श्रेयस अय्यर (कॅप्टन), नेहल वढेरा, शशांक सिंग, मार्कस स्टॉइनिस, हरप्रीत ब्रार, काइल जेमिसन, अर्शदीप सिंग, विजयकुमार वैशाख, युझवेंद्र चहल, सूर्यांश शेडगे, मुशीर खान, झेवियर बार्टलेट, प्रवीण दुबे, अजमतुल्ला ओमरझाई, विष्णू विनोद, यश ठाकूर, आरोन हार्डी, कुलदीप सेन, मिचेल ओवेन, हरनूर सिंग आणि पायला अविनाश.

  • 29 May 2025 05:28 PM (IST)

    PBKS vs RCB Live Updates, IPL 2025 : आरसीबी 2016 नंतर फायनलमध्ये पोहचणार?

    पंजाब किंग्सची 2014 नंतर प्लेऑफमध्ये पोहचण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे. श्रेयस अय्यर याच्या नेतृत्वात पंजाबने ही कामगिरी केली आहे. तर आरसीबीचा हा सामना जिंकून पहिल्याच झटक्यात अंतिम फेरीत पोहचण्याचा प्रयत्न असेल. आरसीबी याआधी 2016 साली अंतिम फेरीत पोहचली होती.

  • 29 May 2025 05:20 PM (IST)

    PBKS vs RCB Live Updates, IPL 2025 : पंजाब विरुद्ध बंगळुरु आमनेसामने, फायनलसाठी जोरदार चुरस

    पंजाब किंग्स विरुद्ध बंगळुरु यांच्यात आयपीएलच्या अंतिम फेरीत पोहचण्यासाठी जोरदार चुरस पाहायला मिळणार आहे. दोन्ही संघांना फायनलमध्ये पोहचण्यासाठी 2 संधी मिळणार आहेत. मात्र तरीही पहिल्याच प्रयत्नात अंतिम फेरीतील प्रवेश निश्चित करण्याचा दोन्ही संघांचा प्रयत्न असणार आहे. त्यामुळे आता पहिल्या फेरीत कोणता संघ अंतिम फेरीत पोहचतो? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Published On - May 29,2025 5:19 PM

Follow us
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.