BIRTHDAY SPECIAL: 30 व्या वर्षी पदार्पण, सचिनला शेवटच्या वने-डेमध्ये बाद करत नंतर स्वत:च झाला बॅन

पाकिस्तानचा हा गोलंदाज ऑस्ट्रेलिया, इंग्लंड अशा दिग्गज संघाना त्याच्या एका प्रकारच्या चेंडूवर नाचवत असे. त्याने कमी काळात बरचं यश मिळवलं होतं.

1/5
30 वर्ष हे वय शक्यतो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचं वय. पण पाकिस्तानच्या एका खेळाडूने 30 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. सईद अजमल (Saeed Ajmal) असं त्याचं नाव असून आज त्याचा वाढदिवस आहे. पाकिस्तानचा हा माजी फिरकीपटू त्याच्या दुसरा या चेंडूसाठी फार प्रसिद्ध होता. त्याच चेंडूने त्याला टॉप रँकला नेलं, तर बॅन देखील केलं.

2/5
सईद अजमलने 2008 साली आशिया कपमधून  भारतविरुद्धच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. पहिल्या सामन्यात त्याने फक्त एकचं विकेट मिळवला. त्यानंतर 2009 मध्ये मात्र ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याने धमाकेदार खेळी करत दुसरा बॉल या त्याच्या स्पेशल डिलेव्हरीने ऑस्ट्रेलिया संघाला सळो की पळो केलं. त्याचवर्षी 2009 च्या टी20 वर्ल्ड कपमध्ये त्याने तब्बल 13 विकेट्स घेतले. त्याच्या या कामगिरीच्या जोरावर पाकिस्तान स्पर्धेत विजेता ठरला.

3/5
टी20 वर्ल्ड कप जिंकल्यावर काही महिन्यांतच श्रीलंका विरुद्ध तीन सामन्यांच्या मालिकेत त्याने टेस्ट डेब्यू केला. यावेळीही त्याने 14 विकेट्स टिपले. अशाप्रकारे तिन्ही क्रिकेट प्रकारात तो पाकिस्तानचा मुख्य गोलंदाज बनला. 2011 साली श्रीलंकेविरुद्ध युएईत 18, इंग्लंडविरुद्ध  24 विकेट घेत सर्वत्र दहशत निर्माण केली.

4/5
2011 मध्ये सईद अजमल टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा खेळाडू बनला. त्याने आठ सामन्यात 50 विकेट्स घेतले. त्यामुळे तो आयसीसी रँकिगमध्येही आला. तिन्ही प्रकारात टॉप 10 मध्ये असणाऱ्या सईदने  35 टेस्टमध्ये 178, 113 वनडेमध्ये 184 आणि 64 टी20 सामन्यातं 85 विकेट्स घेतले. विशेष म्हणजे महान क्रिकेटर सचिनला त्याच्या शेवटच्या सामन्यातही सईदनेच बाद केलं होतं.

5/5
2014 मध्ये पुन्हा सईद अजमलच्या गोलंदाजी अॅक्शनची तपासणी झाली. यावेळी ती चूकीची असल्याने त्याला बॅन करण्यात आलं. त्यानंतर सकलैन मुश्ताक यांच्या मदतीने सईदने सुधारणा करत 2017 मध्ये पुनरागमन केलं. पण तोवर त्याची जादू कमी झाल्याने तो केवळ 3 सामने खेळून निवृत्त झाला.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI