SRH vs RR Live Score, IPL 2021 : हैद्राबाद संघ अखेर विजयी, 7 विकेट्सनी राजस्थानचा पराभव

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Sep 27, 2021 | 11:12 PM

दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर आज आयपीएल 2021 मधील 40 वा सामना खेळवला जात आहे. या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स हे दोन संघ भिडतील.

SRH vs RR Live Score, IPL 2021 : हैद्राबाद संघ अखेर विजयी, 7 विकेट्सनी राजस्थानचा पराभव
जेसन रॉय

IPL 2021 मधील 40 वा सामना आज दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे. या सामन्यात गुणतालिकेत 6 व्या क्रमांकावर असलेल्या राजस्थानचा सामना गुणतालिकेत तळाशी असलेल्या सनरायझर्स हैदराबादशी होणार आहे. राजस्थानने 9 पैकी 4 सामने जिंकल्याने अद्याप त्यांच्या प्ले ऑफच्या आशा जिवंत आहेत. मात्र आजचा सामना त्यांच्यासाठी करो या मरो असाच असणार आहे. दुसऱ्या बाजूला सनरायजर्स हैद्राबाद संघासाठी (SRH) यंदाची आयपीएल अत्यंत खराब गेली आहे. त्यांनी यंदाच्या हंगामात 9 पैकी 8 सामने गमावल्याने उर्वरित सामने जिंको अथवा हरो त्यामुळे ते काही प्ले ऑफ साठी पात्र ठरणार नाहीत. मात्र हा सामना त्यांच्यासाठी अस्तित्वाची लढाई असेल.

सामन्यात नाणफेक जिकत राजस्थानने फलंदाजीचा निर्णय घेतला. पहिला विकेट त्वरीत गेल्यानंतर कर्णधार संजूने यशस्वीसोबत अर्धशतकी भागिदारी केली. त्यानंतर कर्णधार संजू शेवटच्या ओव्हरपर्यंत मैदानात होता. त्याने 82 धावांची दमदार खेळी केली. ज्यामुळे राजस्थानने 164 धावांपर्यंत मजल मारली होती. ज्यानंतर फलंदाजीला आलेल्या हैद्राबाद संघाकडून आधी सलामीवीर जेसन रॉयने दमदार 60 धावांची खेळी केल्यानंतर अखेरच्या षटकात क्लासिक फलंदाजी करत कर्णधार केनने नाबाद 51 धावांच्या मदतीने सामना हैद्राबादला जिंकवून दिला.

LIVE Cricket Score & Updates

The liveblog has ended.
 • 27 Sep 2021 10:59 PM (IST)

  RR vs SRH: हैद्राबाद अखेर विजयी

  संपूर्ण हंगामात एकच सामना जिंकलेल्या हैद्राबद संघाने आणखी एक विजय खिशात घातला आहे. अखेरच्या काही षटकात क्लासिक फलंदाजी करत कर्णधार केनने नाबाद 51 धावांच्या मदतीने सामना हैद्राबादला 7 विकेट्सनी जिंकवून दिला.

 • 27 Sep 2021 10:54 PM (IST)

  RR vs SRH: हैद्राबाद विजयाच्या उंबरठ्यावर

  कर्णधार केनच्या जोडीने युवा फलंदाज अभिषेक शर्माने हैद्राबाद संघाला विजयाजवळ आणून ठेवले आहे. 12 चेंडूत हैद्राबादला 6 धावांची गरज आहे.

 • 27 Sep 2021 10:42 PM (IST)

  RR vs SRH: कर्णधार केनने सांभाळला डाव

  सेट फलंदाज जेसन रॉय बाद झाल्यानंतर जागतिक क्रिकेटमधील अव्वल दर्जाचा फलंदाज आणि हैद्राबादचा कर्णधार केन विल्यमसनने संघाचा डाव सांभाळला आहे. आता अखेरच्या 4 षटकात हैद्राबादला 26 धावांची गरज आहे.

 • 27 Sep 2021 10:26 PM (IST)

  RR vs SRH: जेसन रॉयपाठोपाठ प्रियम गार्गही बाद

  हैद्राबादचा धाकड फलंदाज जेसन रॉयला चेतन सकारियाला बाद करताच प्रियम गार्गला मुस्तफिजूर रेहमानला बाद केलं आहे.

 • 27 Sep 2021 10:17 PM (IST)

  RR vs SRH: जेसन रॉयचं अर्धशतक

  उशीरा संघात दाखल झालेल्या जेसन रॉयकडून जी अपेक्षा होती तशीच धमाकेदार कामगिरी त्याने केली आहे. नुकतचं त्याने त्याचं अर्धशतक पूर्ण केलं आहे.

 • 27 Sep 2021 09:56 PM (IST)

  RR vs SRH: माहिपालला भागिदारी तोडण्यात यश

  हैद्राबाद संघाकडून उत्तम सुरुवात झाली असताना राजस्थानचा अष्टपैलू खेळाडू माहिपालने रिद्धीमान साहाला बाद करत एक उत्तम भागिदारी संपवली आहे.

 • 27 Sep 2021 09:41 PM (IST)

  RR vs SRH: 165 धावांचा पाठलाग करण्यासाठी हैद्राबाद मैदानात

  राजस्थानने दिलेल्या 165 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी हैद्राबादचे फलंदाज मैदानात उतरले आहेत. सध्या सलामीवीर जेसन रॉय, रिद्धीमन साहाबरोबर फलंदाजी करत आहे.

 • 27 Sep 2021 09:12 PM (IST)

  RR vs SRH: कौलची भेदक ओव्हर, राजस्थानची 164 धावांपर्यंतच मजल

  19 ओव्हरमध्ये 160 धावा केल्या असताना अखेरच्या ओव्हरमध्ये हैद्राबादच्या सिद्धार्थ कौलने दमदार ओव्हर टाकत केवळ चार धावा देत दोन विकेटही घेतल्या. त्यामुळे राजस्थानने 164 धावा केल्या असून हैद्राबादला विजयासाठी 165 धावांच आव्हान आहे.

 • 27 Sep 2021 09:05 PM (IST)

  RR vs SRH: कर्णधार संजूची मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल

  राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन इंडियन ख्रिस गेल म्हणून प्रसिद्ध महिपाल लोमरोरसह दमदार फलंदाजी करत एका मोठ्या धावसंख्येच्या दिशेने संघाला घेऊन जात आहे. 19 ओव्हरनंतर राजस्थानचा स्कोर 160 धावा आहे.

 • 27 Sep 2021 08:46 PM (IST)

  RR vs SRH: कर्णधार संजूचं अर्धशतक

  राजस्थान रॉयल्स संघाचा कर्णधार संजू सॅमसनला अखेर सूर गवसला आहे. त्याने उत्तम अर्धशतक ठोकत डाव सावरला आहे.

 • 27 Sep 2021 08:21 PM (IST)

  RR vs SRH: लियम लिव्हिंगस्टोन बाद

  यशस्वी बाद होताच काही वेळातच लियम लिव्हिंगस्टोनही बाद झाला आहे. राशिद खानच्या चेंडूवर समदने त्याचा झेल घेतला आहे.

 • 27 Sep 2021 08:13 PM (IST)

  RR vs SRH: भागिदारी तोडण्यात संदीप शर्माला यश

  राजस्थान रॉयल्स संघाचा कर्णधार संजू आणि सलामीवर यशस्वी यांची उत्तम भागिदारी तोडण्यात संदीप शर्माला यश आलं आहे. त्याने यशस्वीला बाद केलं आहे.

 • 27 Sep 2021 08:09 PM (IST)

  RR vs SRH: कर्णधार संजूने यशस्वीसह सांभाळला डाव

  सलामीवीर लुईस लवकर बाद होताच कर्णधार संजू सॅमसन आणि यशस्वी जैस्वाल यांनी राजस्थानचा डाव सांभाळला आहे. 8 षटकानंतर त्याचा स्कोर 60 धावा इतका आहे.

 • 27 Sep 2021 07:38 PM (IST)

  राजस्थानला पहिला झटका, दुसऱ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर सलामीवर झेलबाद

  राजस्थानला पहिला झटका बसला आहे. दुसऱ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर सलामीवर लुईस झेलबाद झाला. त्याने 4 चेंडूत 6 धावा केल्या. लुईसने चौकार मारत संघाची चांगली सुरुवात करुन दिली. पण हैदराबादचा गोलंदाज भुवनेश्वर कुमारच्या फिरकीचा तो शिकार ठरला. भुवनेश्वरच्या चेंडूवर तो झेलबाद झाला.

 • 27 Sep 2021 07:37 PM (IST)

  राजस्थानच्या डावाला सुरुवात, पहिल्याच षटकात 11 धावा

  राजस्थानच्या डावाला सुरुवात, पहिल्याच षटकात 11 धावा

 • 27 Sep 2021 07:04 PM (IST)

  टी नटराजनच्या जागी नवीन खेळाडू दाखल

  कोरोना महामारीने पुन्हा आयपीएलमध्ये शिरकाव केला सनरायजर्स हैद्राबाद संघाचा (SRH) खेळाडू आणि भारताचा गोलंदाजा टी नटराजन (T Natrajan Corona Positive) याला कोरोनाची बाधा झाली. त्यामुळे आधीच गुणतालिकेत सर्वात खाली असणाऱ्या हैद्राबादची संकटं आणखी वाढली होती. त्यामुळे त्यांनी एका नव्या खेळाडूला संघात सामिल केलं आहे. उम्रान मलिक (Umran Malik) असं या खेळाडूचं नाव असून तो टी नटराजनच्या जागी संघातून खेळणारा आहे. उम्रान हा जम्मू आणि काश्मीर संघातील खेळाडू आहे. त्याने आतापर्यंत एक टी20 आणि लिस्ट A सामने खेळले असून त्यामध्ये 4 विकेट्स घेतले

 • 27 Sep 2021 07:02 PM (IST)

  नाणेफेक जिंकून राजस्थानचा फलंदाजीचा निर्णय

  राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

Published On - Sep 27,2021 6:57 PM

Follow us

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI