AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Asia Cup 2025 : संजू सॅमसन आशिया कप स्पर्धेत खेळण्यास उत्सूक, भारत-पाकिस्तान सामन्यांच्या वादादरम्यान म्हणाला…, पाहा व्हीडिओ

IND vs PAK Asia Cup 2025 : बहुप्रतिक्षित आशिया कप 2025 स्पर्धेचे क्रिकेटपटूंसह चाहत्यांना वेध लागले आहेत. या स्पर्धेला 9 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. भारताचा अनुभवी फलंदाज संजू सॅमसन या स्पर्धेत खेळण्यासाठी उत्सूक आहे.

Asia Cup 2025 : संजू सॅमसन आशिया कप स्पर्धेत खेळण्यास उत्सूक, भारत-पाकिस्तान सामन्यांच्या वादादरम्यान म्हणाला..., पाहा व्हीडिओ
Sanju Samson Team IndiaImage Credit source: PTI
| Updated on: Jul 31, 2025 | 5:47 PM
Share

वर्ल्ड चॅम्पियन्स ऑफ लिजेंड्स 2025 (WCL 2025) स्पर्धेतील उपांत्य फेरीत भारताने पाकिस्तान विरुद्ध खेळण्यास नकार दिला. भारतीय खेळाडूंनी या सामन्यावर बहिष्कार घातला. त्यामुळे पाकिस्तान अंतिम फेरीत पोहचली. भारताने याआधी याच स्पर्धेतील साखळी फेरीत पाकिस्तान विरुद्ध खेळण्यास नकार दिला होता. त्यामुळे वर्ल्ड चॅम्पियन्स ऑफ लिजेंड्स 2025 स्पर्धेनंतर आगामी आशिया कप 2025 स्पर्धेतील भारत-पाकिस्तान सामन्यावर टांगती तलवार आहे. आशिया कप स्पर्धेतील भारत-पाकिस्तान यांच्यातील सामना रद्द करण्यात यावा, अशी मागणी केली जात आहे. या दरम्यान भारतीय विकेटकीपर बॅट्समन संजू सॅमसन याने प्रतिक्रिया दिली आहे. संजू आशिया कप स्पर्धेत खेळण्यासाठी उत्सूक आहे. संजू नक्की काय म्हणाला हे सविस्तर जाणून घेऊयात.

संजू सॅमसन काय म्हणाला?

आशिया कप 2025 स्पर्धेचं यजमानपद हे भारताकडे आहे. मात्र या स्पर्धेतील सर्व सामने हे यूएईमध्ये खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेत एकूण 8 संघ सहभागी होणार आहेत. स्पर्धेला 9 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. संजू या स्पर्धेत खेळण्यासाठी फार उत्साही आहे. “मी गेल्यावेळेस इथे अंडर 19 वर्ल्ड कप आणि आयपीएलमध्ये खेळलो होतो. इथल्या चाहत्यांकडून मला कायम समर्थन मिळालं आहे. मला पुन्हा तसंच समर्थन मिळेल”, असा विश्वास संजूने व्यक्त केला.

आशिया कप स्पर्धेतील भारत-पाक सामन्यांना विरोध

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान या शेजारी देशांमधील संघर्ष आणखी वाढला. भारताने या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानसोबतचे अनेक व्यवहार बंद केले. क्रीडा क्षेत्रातही भारताने पाकिस्तान विरुद्ध न खेळण्याची भूमिका घेतली. त्यानुसार भारताने डबल्यूसीएल 2025 स्पर्धेत साखळी आणि उपांत्य फेरीत पाकिस्तान विरुद्ध न खेळण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता भारताने आशिया कप 2025 स्पर्धेतही पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यांवरही बहिष्कार घालावा, अशी मागणी केली जात आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात 14 सप्टेंबर रोजी आशिया कप स्पर्धेतील साखळी फेरीत हा सामना होणार आहे.

संजू सॅमसन आशिया कप स्पर्धेसाठी उत्सूक

दोन्ही संघांना आशिया कप स्पर्धेसाठी एकाच गटात ठेवण्यात आले आहे. त्यामुळे या दोन्ही संघात साखळी फेरीनंतर सुपर 4 आणि फायनल असे 2 सामने होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नेटकऱ्यांकडून भारत विरुद्ध पाकिस्तान विरूद्ध सामन्यांना तीव्र विरोध केला जात आहे. त्यामुळे वाढता विरोध पाहता हे सामने रद्द केले जाऊ शकतात. आता याबाबत काय निर्णय होतो? याकडे क्रिकेट विश्वाचं लक्ष असणार आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.