PHOTO | किंग कोहलीला इंग्लंड विरुद्ध 5 मोठे विक्रम करण्याची संधी

कर्णधार विराट कोहलीला (Virat Kohli) इंग्लंड विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत (india vs england odi series 2021) अनेक विक्रम करण्याची संधी आहे.

  • Updated On - 9:42 am, Tue, 23 March 21 Edited By: Anish Bendre
1/6
IND vs ENG 1st ODI, cricket news, Virat Kohli, Team India, Records, Sachin Tendulkar, Sourav Ganguly, england tour india 2021,
टेस्ट आणि टी 20 सीरिजनंतर टीम इंडिया इंग्लंड विरुद्ध एकदिवसीय मालिकेत भिडण्यासाठी सज्ज आहे. आजपासून या वनडे सीरिजला सुरुवात होत आहे. या मालिकेत कर्णधार विराट कोहलीला 5 विक्रम करण्याची संधी आहे.
2/6
IND vs ENG 1st ODI, cricket news, Virat Kohli, Team India, Records, Sachin Tendulkar, Sourav Ganguly, england tour india 2021,
युवराज सिंहने टीम इंडियाकडून इंग्लंड विरुद्ध एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक 4 शतक झळकावले आहेत. विराटला युवराजच्या या विक्रमाची बरोबरी करण्याची संधी आहे. विराटने इंग्लंड विरुद्ध 3 शतकं झळकावले आहेत. यामुळे विराट या मालिकेत 1 शतक लगावताच युवराज सिंहच्या विक्रमाची बरोबरी साधेल.
3/6
IND vs ENG 1st ODI, cricket news, Virat Kohli, Team India, Records, Sachin Tendulkar, Sourav Ganguly, england tour india 2021,
विराटला सुरेश रैनाला पछाडत इंग्लंड विरुद्ध चौथा यशस्वी फलंदाज होण्याची संधी आहे. विराटने इंग्लंड विरुद्ध 30 सामन्यात 1 हजार 178 धावा केल्या आहेत. तसेच रैनाने इंग्लंड विरुद्ध 1 हजार 207 धावा केल्या आहेत. यामुळे विराटला रैनाला पछाडण्यासाठी विराटला 29 धावांची गरज आहे. विराट या मालिकेत 29 धावा करताच चौथा यशस्वी भारतीय फलंदाज ठरेल.
4/6
IND vs ENG 1st ODI, cricket news, Virat Kohli, Team India, Records, Sachin Tendulkar, Sourav Ganguly, england tour india 2021,
या मालिकेत शतक लगावताच विराट सर्वाधिक सेंच्युरी लगावणारा कर्णधार ठरेल. सध्या विराट आणि पॉन्टिंग 41 शतकांसह संयुक्तरित्या पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर आहेत.
5/6
IND vs ENG 1st ODI, cricket news, Virat Kohli, Team India, Records, Sachin Tendulkar, Sourav Ganguly, england tour india 2021,
विराटला एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारतात 5 हजार धावा करण्याची संधी आहे. यासाठी विराटला 135 धावांची संधी आहे. विराटने ही कामगिरी केल्यास तो सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि राहुल द्रविड यांच्यानंतर चौथा फलंदाज ठरेल.
6/6
IND vs ENG 1st ODI, cricket news, Virat Kohli, Team India, Records, Sachin Tendulkar, Sourav Ganguly, england tour india 2021,
विराटला सचिनच्या मायदेशातील सर्वाधिक वनडे शतकांच्या विक्रमाची बरोबरी करण्याची नामी संधी आहे. सचिनच्या नावे भारतात एकूण 20 एकदिवसीय शतकांची नोंद आहे. तर विराटने आतापर्यंत भारतात 19 वनडे सेंच्युरी लगावल्या आहेत.