AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फ्लिपकार्टवर स्वातंत्र्य दिन सेलमध्ये आयफोन 16 सह ‘या’ 5 जी फोनवर मिळणार मोठी सूट

फ्लिपकार्टवर स्वातंत्र्य दिन सेल सुरू झाले आहे. ज्यामध्ये स्मार्टफोन, टॅब्लेट आणि लॅपटॉपवर उत्तम डील मिळतील. पहिल्या फ्रीडम सेलनंतर, फ्लिपकार्ट पुन्हा एकदा मोबाईलच्या ब्रँडवर सवलत देत आहे. ग्राहकांना iPhone 16 सारख्या लोकप्रिय स्मार्टफोनवर आकर्षक सवलती देखील मिळू शकतात. चला तर मग आजच्या या लेखात सेलबद्दल अधिक ऑफर्स जाणून घेऊयात.

फ्लिपकार्टवर स्वातंत्र्य दिन सेलमध्ये आयफोन 16 सह 'या' 5 जी फोनवर मिळणार मोठी सूट
Apple Iphone 16Image Credit source: Tv9 Bharatvarsh
| Edited By: | Updated on: Aug 14, 2025 | 1:30 AM
Share

ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर स्वातंत्र्य दिन सेल सुरू झालेला आहे. गेल्या काही दिवसांत ई-कॉमर्स दिग्गज कंपनीचा हा दुसरा स्वातंत्र्य दिन-थीम सेल इव्हेंट आहे. याआधी 1 ऑगस्ट ते 8 ऑगस्ट दरम्यान कंपनीने आपल्या कोट्यावधी ग्राहकांसाठी फ्रीडम सेल सुरू केला होता. त्यात आता कंपनी पुन्हा एकदा आपल्या नवीन सेल ग्राहकांसाठी सुरू केले आहे, ज्यामध्ये स्मार्टफोन, टॅब्लेट, वेअरेबल्स, लॅपटॉप, घरगुती उत्पादनांसह अनेक गोष्टींवर सर्वात मोठे डील उपलब्ध असतील.

एवढेच नाही तर सेल दरम्यान, Apple च्या iPhone, Motorola, Nothing, Oppo आणि Vivo सारख्या ब्रँडचे डिव्हाइस सर्वात कमी किमतीत उपलब्ध असतील. सेलच्या अगदी आधी, Flipkart ने काही स्मार्टफोन डील देखील जाहीर केल्या आहेत. सेल पेजनुसार, एप्रिलमध्ये भारतात 17,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लाँच झालेला Oppo K13 5G सेलमध्ये फक्त 15,999 रुपयांना उपलब्ध असेल. याशिवाय, तुम्ही Oppo K13x 5G फक्त 10,999 रुपयांना खरेदी करू शकाल.

फ्लिपकार्ट सेल स्मार्टफोन डील्स

ई-कॉमर्स दिग्गज कंपनीचे म्हणणे आहे की सेलमध्ये अनेक लोकप्रिय डिव्हाइसेस अतिशय स्वस्त किमतीत उपलब्ध असतील. तथापि त्यांच्या विक्री किंमती अद्याप जाहीर केलेल्या नाहीत. अशातच फ्लिपकार्टच्या या सेलमध्ये खरेदीदारांना Samsung Galaxy S24, Vivo T4 5G, Realme P3 5G, iPhone 16, Motorola Edge 60 Fusion, Samsung Galaxy S24 FE, Nothing Phone 2 Pro सारख्या अनेक स्मार्टफोनवर मोठी सूट मिळू शकेल.

आयफोन 16 वरही सूट

गेल्या फ्लिपकार्ट फ्रीडम सेलमध्ये सेल बारमध्ये उपलब्ध असलेले अनेक हँडसेट सवलतींसह उपलब्ध होते. आयफोन 16 हा हँडसेट 69,999 रुपयांना सूचीबद्ध करण्यात आला होता, जो त्याच्या लाँच किमतीपेक्षा कमी आहे. तर मोटोरोला एज 60 फ्यूजन गेल्या सेलमध्ये 20,999 रुपयांना उपलब्ध होता. तर सॅमसंग गॅलेक्सी एस24 हा फोन 46,999 रूपयांना तर गॅलेक्सी एस24 एफई सेल दरम्यान 49,999 रूपयांना खरेदीसाठी उपलब्ध होते. तर आताच्या स्वातंत्र्य दिनाच्या या सेलमध्येही त्यांची किंमत सारखीच दिसून येत आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.