नवीन लॅपटॉप खरेदी करायचा? फक्त 50 हजार बजेट आहे, हे पर्याय ठरतील सर्वोत्तम
तुमचं बजेट जर ₹50,000 च्या आत असेल, आणि तुम्हाला ऑफिस, शिक्षण किंवा बेसिक मल्टीमीडिया वापरासाठी चांगला लॅपटॉप हवा असेल, तर हे पाच लॅपटॉप्समध्ये तुमच्यासाठी योग्य पर्याय नक्कीच सापडेल.

2025 मध्ये जर तुम्ही बजेटमध्ये चांगल्या लॅपटॉपच्या शोधात असाल, तर 50 हजार रुपयांखाली अनेक उत्तम पर्याय उपलब्ध आहेत. या किंमत श्रेणीत तुम्हाला आधुनिक प्रोसेसर, SSD स्टोरेज, फुल HD डिस्प्ले आणि प्री-इन्स्टॉल्ड सॉफ्टवेअर्ससारखी महत्त्वाची वैशिष्ट्ये मिळतात. विद्यार्थी, वर्क फ्रॉम होम करणारे कर्मचारी किंवा सामान्य वापरकर्ते, सर्वांसाठी हे लॅपटॉप्स योग्य ठरतात. दीर्घकाळ टिकणारी बॅटरी, हलकं डिझाइन आणि विश्वासार्ह परफॉर्मन्स यामुळे हे मॉडेल्स 2025 साठी स्मार्ट निवड ठरतात.
2025 साठी टॉप 5 लॅपटॉप्सची यादी (₹50,000 खाली)
1. HP 15s (Intel Core i3-1215U, 12th Gen) — ₹36,490
- प्रोसेसर: Intel Core i3-1215U (12th Gen)
- RAM/Storage: 8GB RAM, 512GB SSD
- डिस्प्ले: 15.6″ Full HD
- बॅटरी: 7.75 तास बॅटरी + फास्ट चार्जिंग
- OS/सॉफ्टवेअर: Windows 11 + MS Office
- वैशिष्ट्ये: हलकं वजन, मजबूत डिझाइन, प्रवासात वापरण्यास योग्य
2. Dell 15 Thin & Light (Intel Core i5-1235U, 16GB RAM) — ₹50,000
- प्रोसेसर: Intel Core i5-1235U
- RAM/Storage: 16GB RAM, 512GB SSD
- डिस्प्ले: 15.6″ Full HD
- OS/सॉफ्टवेअर: Windows 11, MS Office, McAfee
- वैशिष्ट्ये: मल्टीटास्किंगसाठी योग्य, हलका आणि पातळ डिझाइन
3. Acer Aspire Lite (AMD Ryzen 7 5700U) — ₹46,990
- प्रोसेसर: AMD Ryzen 7 5700U
- RAM/Storage: 16GB RAM, 1TB SSD
- डिस्प्ले: 15.6″ Full HD
- OS/सॉफ्टवेअर: Windows 11, MS Office
- वैशिष्ट्ये: स्लिम मेटल बॉडी, स्टायलिश लूक, मोठं स्टोरेज
4. Dell 15 Thin & Light (Intel Core i5-1235U, 8GB RAM) — ₹44,990
- प्रोसेसर: Intel Core i5-1235U
- RAM/Storage: 8GB RAM, 512GB SSD
- डिस्प्ले: 15.6″ Full HD
- OS/सॉफ्टवेअर: Windows 11, MS Office, McAfee
- वैशिष्ट्ये: वर्क-फ्रॉम-होम आणि विद्यार्थ्यांसाठी योग्य, सहज वाहून नेता येण्याजोगा
5. Dell 3520 (Intel Core i3-1215U) — ₹33,990
- प्रोसेसर: Intel Core i3-1215U
- RAM/Storage: 8GB RAM, 512GB SSD
- डिस्प्ले: 15.6″ Full HD
- OS/सॉफ्टवेअर: Windows 11, MS Office, McAfee
- वैशिष्ट्ये: विद्यार्थ्यांसाठी परवडणारा, बेसिक टास्कसाठी योग्य
