100 Super Fast News | सुपरफास्ट 100 न्यूज | 15 October 2021
भाजपच्या नेत्यांची सध्याची बेताल वक्तव्ये ऐकून लोकांची खूप करमणूक सुरु आहे. पुन्हा ‘धाड’ प्रयोगही सुरुच आहेत. त्या सगळ्यांना चोख उत्तर देण्यासाठी महाराष्ट्राला शमीच्या झाडावरील शस्त्रे काढावीच लागतील, असा इशारा अग्रलेखातून देण्यात आला आहे. त्यामुळे शिवसेनेच्या आजच्या दसरा मेळाव्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जोरदार राजकीय फटकेबाजी करणार, असा अंदाज बांधला जात आहे.
राज्यात महाविकासआघाडीचे सरकार आल्यापासून आणि शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्यापासून भाजपची अवस्था कळपात वाघ शिरल्यामुळे भेदरलेल्या मेंढरांसारखी झालेय, असे वक्तव्य शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तील अग्रलेखातून करण्यात आले आहे. दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर लिहलेल्या अग्रलेखात भाजपवर चांगलेच आसूड ओढण्यात आले आहेत. भाजपच्या नेत्यांची सध्याची बेताल वक्तव्ये ऐकून लोकांची खूप करमणूक सुरु आहे. पुन्हा ‘धाड’ प्रयोगही सुरुच आहेत. त्या सगळ्यांना चोख उत्तर देण्यासाठी महाराष्ट्राला शमीच्या झाडावरील शस्त्रे काढावीच लागतील, असा इशारा अग्रलेखातून देण्यात आला आहे. त्यामुळे शिवसेनेच्या आजच्या दसरा मेळाव्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जोरदार राजकीय फटकेबाजी करणार, असा अंदाज बांधला जात आहे.
