Congressचे 27 नगरसेवक Ajit Pawar यांच्या उपस्थितीत NCPमध्ये प्रवेश करणार

Congressचे 27 नगरसेवक Ajit Pawar यांच्या उपस्थितीत NCPमध्ये प्रवेश करणार

| Edited By: | Updated on: Jan 25, 2022 | 6:51 PM

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मुंबईला प्रवेश करणार आहेत. या अगोदर माजी आमदार असिफ शेख यांनी देखील काँग्रेसमधून बाहेर पडून राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला हा मोठा धक्का आहे.

मालेगाव : मालेगावात काँग्रेसला मोठे खिंडार पडले आहे. माजी आमदार रशीद शेख, महापौर ताहेरा शेख यांच्यासह 27 नगरसेवक यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. हे सर्व जण 27 जानेवारीला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मुंबईला प्रवेश करणार आहेत. या अगोदर माजी आमदार असिफ शेख यांनी देखील काँग्रेसमधून बाहेर पडून राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला हा मोठा धक्का आहे.