Sambhajinagar News : संभाजीनगर दरोडा प्रकरणी मोठी कारवाई; आरोपीच्या बहिणीचा जबाब अन्..
Sambhajinagar Crime : अनेक दिवसांपासून गाजत असलेल्या संभाजीनगरमधील दरोडा प्रकरणी एक मोठी कारवाई आता पोलिसांनी केली आहे.
उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरावरील दरोडा प्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली आहे. संतोष लड्डा यांच्या घरातील चोरीला गेलेली 30 किलो चांदी अखेर पोलिसांनी जप्त केलेली आहे. पडेगाव परिसरातील बंद कारमध्ये ही 30 किलो चांदी सापडली आहे. आरोपी अमोल खोतकरच्या बहिणीने दिलेल्या जबाबानंतर ही चांदी सापडली आहे.
संभाजीनगरमधील उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरावर काही दिवसांपूर्वी दरोडा पडला होता. यात 5.5 किलो सोनं आणि तब्बल 32 किलो चांदीची भांडी लांपास केली होती. गेल्या 15 ते 20 दिवसांपासून संभाजीनगरचे पोलीस ही चांदी आणि सोनं जप्त करण्यासाठी प्रयत्न करत होते. अखेर काल या कारवाईत यश आलेलं असून पोलिसांनी 30 किलो चांदीची भांडी आता जप्त केलेली आहेत. 32 पैकी 30 किलो चांदी सापडली आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात एन्काउंटर करण्यात आलेला आरोपी अमोल खोतकर याच्या बहिणीने दिलेल्या जबाबानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
