36 जिल्हे 72 बातम्या | 8.30 AM | 16 September 2021

| Updated on: Sep 16, 2021 | 10:25 AM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे येत्या 17 सप्टेंबर रोजी औरंगाबादच्या दौऱ्यावर असणार आहेत. मात्र या दौऱ्यादरम्यान औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील शहराच्या विकासाच्या मुद्द्यावर आक्रमक झाले आहेत. जलील यांच्या नेतृत्वात एमएयएमचे कार्यकर्ते विमानतळापासून ते कार्यक्रम स्थळापर्यंत शहराच्या न झालेल्या विकासाबद्दल धन्यवादाचे फलक घेऊन आंदोलन करणार आहेत.

Follow us on

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे येत्या 17 सप्टेंबर रोजी औरंगाबादच्या दौऱ्यावर असणार आहेत. मात्र या दौऱ्यादरम्यान औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील शहराच्या विकासाच्या मुद्द्यावर आक्रमक झाले आहेत. जलील यांच्या नेतृत्वात एमएयएमचे कार्यकर्ते विमानतळापासून ते कार्यक्रम स्थळापर्यंत शहराच्या न झालेल्या विकासाबद्दल धन्यवादाचे फलक घेऊन आंदोलन करणार आहेत. जलील यांच्या या भूमिकेमुळे ठाकरे यांचा औरंगाबाद दौरा चांगलाच चर्चेत आला आहे.

येत्या 17 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे औरंगाबादचा दौरा करणार आहेत. औरंगाबादमध्ये एका कार्यक्रमात ते सहभागी होणार आहेत. ठाकरे यांच्या दौऱ्यादरम्यान आंदोलन करण्याची परवानगी जलील प्रशासनाकडे मागितली होती. मात्र, कायदा व सुव्यस्थेच्या मुद्द्यामुळे ती नाकारण्यात आली. त्यानंतर जलील यांनी ठाकरे यांच्याविरोधात उपरोधिक आंदोलन करण्याची शक्कल लढवली. त्यानुसार जलील यांनी शहराच्या न झालेल्या विकासाबद्दल धन्यवाद अशा आशयाचे फलक लावून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. या उपरोधिक आंदोलनासाठी एमआयएमचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने अपस्थित असतील असे जलील यांनी सांगितले आहे.