4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 7 AM | 23 October 2021

| Updated on: Oct 23, 2021 | 8:27 AM

मुख्यमंत्र्यांबरोबरच केंद्रीय कायदे व न्याय मंत्री किरण रीजीजू , सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश एन.व्ही रमण्णा, पालकमंत्री सुभाष देसाई, खासदार इम्तियाज जलील, मंत्री अब्दुल सत्तार, आमदार अंबादास दानवे, तसंच विविध लोकप्रतिनिधी आणि महत्त्वाचे वरिष्ठ अधिकारी या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत.

Follow us on

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या नव्या इमारतीचं आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. 36 दिवसानंतर मुख्यमंत्री आज पुन्हा औरंगाबाद दौऱ्यावर येत आहेत. सकाळी पावणे दहाच्या सुमारास औरंगाबाद खंडपीठाच्या नव्या इमारतीचं उद्घाटन होईल.

मुख्यमंत्र्यांबरोबरच केंद्रीय कायदे व न्याय मंत्री किरण रीजीजू , सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश एन.व्ही रमण्णा, पालकमंत्री सुभाष देसाई, खासदार इम्तियाज जलील, मंत्री अब्दुल सत्तार, आमदार अंबादास दानवे, तसंच विविध लोकप्रतिनिधी आणि महत्त्वाचे वरिष्ठ अधिकारी या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत.

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानंतरचा मुख्यमंत्र्यांचा दूसरा औरंगाबाद दौरा आहे. गेल्या 17 सप्टेंबर रोजी उद्धव ठाकरे औरंगाबाद दौऱ्यावर आले होते. त्यानंतर आज बरोबर 36 दिवसांनी मुख्यमंत्री औरंगाबादला येत आहेत. मागील औरंगाबाद दौऱ्यावेळी मुख्यमंत्र्यांनी मराठवाड्यासाठी विविध घोषणा केल्या होत्या. आज मुख्यमंत्री उद्घाटनानंतरच्या भाषणात काय बोलणार, याकडे लक्ष असेल.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं सकाळी 9 च्या सुमारास औरंगाबाद विमानतळावर आगमन होईल. त्याच पार्श्वभूमीवर विमानतळावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. विमानतळावरच मुख्यमंत्र्यांना गार्ड ऑफ ऑनर दिला जाणार आहे.