4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 7 AM | 29 June 2021
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधातील सर्व पुरावे आता ईडीच्या हाती लागले आहेत. त्यामुळे त्यांनाही अटक होईल. देशमुख यांच्या दोन सहकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांनाही अटक होईल
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधातील सर्व पुरावे आता ईडीच्या हाती लागले आहेत. त्यामुळे त्यांनाही अटक होईल. देशमुख यांच्या दोन सहकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांनाही अटक होईल”, अशी प्रतिक्रिया देशमुख यांच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करणाऱ्या अॅड. जयश्री पाटील यांनी दिली आहे. तसेच या प्रकरणात पडू नका म्हणून धमकी देखील देण्यात आली, असा दावा त्यांनी केलाय. पण तरीही आपण घाबरणार नसून लढा सुरु ठेवणार, असंही जयश्री पाटील यांनी सांगितलं
मी ईडीच्या कारवाईवर समाधानी आहे. कारण सीबीआयने जो गुन्हा दाखल केला आहे तो माझ्या तक्रारीवर उच्च न्यायालयाने जे निर्देश दिले आहेत त्यानुसार दाखल केला आहे. ईडीने देखील माझ्या तक्रारीवर अनिल देशमुख यांच्यावर कारवाई केलेली आहे. मी दिलेली सगळी माहिती आहे. मी दिलेल्या पीडित लोकांची माहिती आहे जे अनिल देशमुखांच्या भ्रष्टाचाराने पिळले जात होते. त्यामुळे अनिल देशमुख यांना अटक केली पाहिजे, अशी माझी मागणी होती. कारण अटक केली नाही तर ते पुरावे नष्ट करु शकतात”, असं जयश्री पाटील म्हणाल्या.
