4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 7 AM | 5 November 2021
कथित 100 कोटी रुपयांच्या घोटाळ्याच्या आरोपाप्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख तुरुंगात आहेत. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्याचे आरोप केले होते. याच घोटाळ्यावरुन त्यांना ईडीने अटक केलीय.
तुरुंगात दिवाळी साजरी करत असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे पुत्र ऋषिकेश देशमुख यांना अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडीने समन्स बजावलं आहे. काल रात्री उशिरा त्यांना ईडीने समन्स बजावलं आहे. आज दिपावली पाडव्याच्या दिवशी त्यांना चौकशीसाठी बोलविण्यात आलं आहे. आज सकाळी 11 वाजता त्यांना ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
कथित 100 कोटी रुपयांच्या घोटाळ्याच्या आरोपाप्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख तुरुंगात आहेत. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्याचे आरोप केले होते. याच घोटाळ्यावरुन त्यांना ईडीने अटक केलीय. पण या प्रकरणी आता मोठा ट्विस्ट आला आहे. देशमुख यांच्याविरोधात माझ्याकडे कुठलाही पुरावा नाहीय, असं चांदीवाल आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात परमबीर सिंह यांनी म्हटलं आहे.
