4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 7 AM | 6 July 2021

| Updated on: Jul 06, 2021 | 8:39 AM

उद्या म्हणजेत 7 जुलै रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची जोरदार चर्चा आहे. भाजपसह अन्य सहयोगी पक्षातील 17 ते 20 राज्यसभा आणि लोकसभा खासदार संभाव्य मंत्रिमंडळ विस्तारात केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे.

Follow us on

भाजपचे राज्यसभा खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांना तातडीने दिल्लीला बोलावण्यात आलं आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या कार्यालयातून राणेंना फोन करण्यात आला होता. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात (Union Cabinet Expansion) नारायण राणे यांना स्थान मिळणं जवळपास निश्चित मानलं जात आहे. दिल्लीतील सूत्रांनी ‘टीव्ही9 मराठी’ला यासंदर्भात माहिती दिली आहे.

 

उद्या म्हणजेत 7 जुलै रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची जोरदार चर्चा आहे. भाजपसह अन्य सहयोगी पक्षातील 17 ते 20 राज्यसभा आणि लोकसभा खासदार संभाव्य मंत्रिमंडळ विस्तारात केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. नारायण राणे यांचं नाव केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात सुरुवातीपासूनच चर्चेत होतं. दिल्लीत राणेंची जे पी नड्डा यांच्याशी भेट झाल्यानंतर यावर अधिकृत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

2019 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा सत्तेत आले. मात्र, दुसऱ्या टर्ममध्ये त्यांनी एकदाही मंत्रिमंडळाचा विस्तार केलेला नाही. परंतु, आता मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आसामचे माजी मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल, ज्योतिरादित्य शिंदे, नारायण राणे आणि हिना गावित यांचाही मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या विस्तारात भाजपमधील नेत्यांसह एनडीएच्या मित्र पक्षांनाही स्थान मिळणार असल्याचं सांगितलं जात आहे.