VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 1 PM | 30 March 2022
नाणार प्रकल्पावरून महाराष्ट्रात पुन्हा एकदा घमासान सुरू आहे. नाणार प्रकल्प व्हावा म्हणून नाणार समर्थकांनी जोर लावला असून विरोधकांनी निदर्शने सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली आहे. कोणत्याही प्रकल्पाला किंवा विकासकामाला खिळ घालण्याची भूमिका शिवसेनेने घेतलेली नाही, असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.
नाणार प्रकल्पावरून महाराष्ट्रात पुन्हा एकदा घमासान सुरू आहे. नाणार प्रकल्प व्हावा म्हणून नाणार समर्थकांनी जोर लावला असून विरोधकांनी निदर्शने सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली आहे. कोणत्याही प्रकल्पाला किंवा विकासकामाला खिळ घालण्याची भूमिका शिवसेनेने घेतलेली नाही, असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं. तसेच हा प्रकल्प विदर्भात व्हावा म्हणून काँग्रेसचा एक नेता आपल्याला भेटला होता. या नेत्याने विदर्भात प्रकल्प आल्यास त्याचं स्वागत करू असं सांगितलं. तसेच या नेत्याने नाणार प्रकल्प विदर्भात नेण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडेही मागणी केली आहे. हा प्रकल्प कुठेही होत असेल आणि त्याला कुणाचा विरोध नसेल तर आमचा त्याला पाठिंबाच राहील, असं राऊत यांनी स्पष्ट केलं. मीडियाशी संवाद साधताना राऊत यांनी ही भूमिका स्पष्ट केली.
