पुण्यातील थरारक! बैलगाडा शर्यतीत घोड्यानं तुडवलं मात्र बैलाने मुलाला वाचवलं

| Updated on: May 28, 2023 | 7:46 AM

एका गाड्याला लावलेल्या बैलाच्या पायात जर एखादं लहान मुलगा आला तर... काय झालं असेल त्याचं. पण काही नाही झालं. बैलानं आपलं प्रेम आणि क्षणात घेतलेल्या उडीमुळं तो मुलगा बचावला.

Follow us on

खेड : सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीला मान्यता दिल्या पासून राज्यातील अनेक भागात आता शर्यतींना चांगलाच जोर आला आहे. जत्रा, यात्रा आणि पुढाऱ्यांच्या वाढदिवसाच्यानिमित्ताने लाखोंची बक्षीस असणाऱ्या बैलगाडा शर्यती होताना दिसत आहेत. यानिमित्ताने काही अपघात झाल्याचे व्हिडीओ देखील यमोर आले आहेत. मात्र एका गाड्याला लावलेल्या बैलाच्या पायात जर एखादं लहान मुलगा आला तर… काय झालं असेल त्याचं. पण काही नाही झालं. बैलानं आपलं प्रेम आणि क्षणात घेतलेल्या उडीमुळं तो मुलगा बचावला. खेड तालुक्यातील निमगाव खंडोबा घाटात बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी शर्यत पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली. एका वळणावर बघ्यांची गर्दी झाली अन् घोडा आणि बैलगाडा जवळ येताच पळताभूई झाली. यातच एक लहान मुलगा थेट घोड्याच्या पायात सापडला. घोड्याने तुडवलच. मात्र मागून येणाऱ्या बैलाणं त्यावरून उडी घेतली. ज्यामुळे तो त्याच्या पायात आला नाही. सोबतच बैसगाडा ही पडलेल्या मुलाच्या बाजुने गेला. यामुळे तो फक्त जखमी झाला. आता त्याच्यावर उपचार सुरू आहेत. पहा पुण्यातील बैलगाडा शर्यतीत हे थरारक दृश्य