उदय सामंतांच्या हल्ल्यावर अब्दुल सत्तार यांची प्रतिक्रिया

उदय सामंतांच्या हल्ल्यावर अब्दुल सत्तार यांची प्रतिक्रिया

| Edited By: | Updated on: Aug 03, 2022 | 2:58 PM

"अशा पद्धतीने भ्याड हल्ले करणं किंवा कोणाच्याही जिवाशी खेळणं हे चुकीचं आहे. अशी घटना पुन्हा घडणार नाही याची काळजी त्या पक्षाच्या नेत्यांनी घ्यावी," अशी प्रतिक्रिया अब्दुल सत्तार यांनी दिली.

“कोर्टाची लढाई ही कोर्टाच्या पद्धतीनेच लढायला हवी, यात तिळमात्र शंका नाही. परंतु अशा पद्धतीने भ्याड हल्ले करणं किंवा कोणाच्याही जिवाशी खेळणं हे चुकीचं आहे. अशी घटना पुन्हा घडणार नाही याची काळजी त्या पक्षाच्या नेत्यांनी घ्यावी,” अशी प्रतिक्रिया अब्दुल सत्तार यांनी दिली. उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली. एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदार उदय सामंत  यांच्या गाडीवर पुण्यात  मंगळवारी हल्ला झाल्याची घटना घडली होती. कात्रज परिसरात हा हल्ला झाला होता. या हल्ल्यामध्ये उदय सामंत यांच्या गाडीची काच फुटली.