Pune | इंदापूर-बारामती रोडवर अपघात, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडून अपघातग्रस्तांना मदत

| Updated on: Dec 05, 2021 | 8:40 PM

अपघात झाल्याचं समजताच दत्तात्रय भरणे यांनी त्यांचा ताफा थांबवला. अपघातात जखमी झालेल्यांची चौकशी करून त्याला ताफ्यातील पोलिसांच्या गाडीत बसवून रुग्णालयात पाठवून दिलं. इंदापूर बारामती रस्त्यावर अपघात झाल्याचं पाहून दत्तात्रय भरणे यांनी त्यांचा ताफा थांबवला.

Follow us on

YouTube video player

पुणे: राज्याचे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे (Dattatray Bharane) यांची संवेदनशीलता पुन्हा एकदा दिसून आली आहे. दत्तात्रय भरणे काल त्यांचा विधानसभा मतदारसंघ इंदापूरच्या (Indapur) दौऱ्यावर होते. काल रात्री राज्यमंत्री दत्तात्रय भरणे इंदापूरहून जात असताना त्यांच्या समोर इंदापूर बारामती (Indapur Barmati Road) रस्त्यावर एका दुचाकी स्वार आणि टेंपोचा अपघात झाला. अपघात झाल्याचं समजताच दत्तात्रय भरणे यांनी त्यांचा ताफा थांबवला. अपघातात जखमी झालेल्यांची चौकशी करून त्याला ताफ्यातील पोलिसांच्या गाडीत बसवून रुग्णालयात पाठवून दिलं. इंदापूर बारामती रस्त्यावर अपघात झाल्याचं पाहून दत्तात्रय भरणे यांनी त्यांचा ताफा थांबवला. राज्यमंत्री भरणे, त्यांचा स्वीय सहायक आणि पोलीस अधिकारी यांनी अपघातग्रस्ताला मदत केली. अपघात ग्रस्ताला पोलिसांच्या गाडीतून उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आलं. अपघातात जखमी झालेल्या युवकाला पोलिसांनी इंदापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं. दत्तात्रय भरणे आणि त्यांच्या सोबत असलेल्या पोलिसांनी दाखवलेल्या माणुसकीचं कौतुक होत आहे.