रशियाच्या हल्ल्यानंतर सर्वत्र आगीचे, धुराचे लोट, युक्रेनमधील शहरे उद्ध्वस्त

| Updated on: Mar 07, 2022 | 9:43 AM

रशिया आणि युक्रेमध्ये भीषण युद्ध सुरू आहे. दोनही देश मागे घेण्यास तयार नाहीत. युक्रेनने शस्त्रे खाली ठेवून आमच्या मागण्या मान्य कराव्यात अशी मागणी रशियाने केली आहे. दरम्यान आज देखील रशियाने युक्रेनवर हल्ले सुरूच ठेवले आहेत.

Follow us on

रशिया आणि युक्रेमध्ये भीषण युद्ध सुरू आहे. दोनही देश मागे घेण्यास तयार नाहीत. युक्रेनने शस्त्रे खाली ठेवून आमच्या मागण्या मान्य कराव्यात अशी मागणी रशियाने केली आहे. दरम्यान आज देखील रशियाने युक्रेनवर हल्ले सुरूच ठेवले आहेत. सुरुवातीपासूनच रशियन सैनिक युक्रेनमधील कीव आणि खार्किव ही दोन शहरे टारगेट करत आहेत. रशियन सैनिकांकडून करण्यात आलेल्या मीसाईल हल्ल्यात रशियातील अनेक शहरे उद्ध्वस्त झाली आहेत. प्रचंड प्रमाणात मनुष्य व वित्तहानी झाली आहे. तरी देखील युक्रेन रशियाविरोधात निकराचा लढा देत असल्याचे पहायला मिळत आहे. रशियाविरोधात आता युक्रेनमधील सामान्य माणूस देखील रस्त्यावर उतरला आहे.